अमृतानुभव
आकार
मांडणी
प्रकरण पहिले
शिवशक्तिसमावेशन
यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् ।
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ 1॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी ।
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ 2॥
सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ।
ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ 3॥
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् ।
तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ 4॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ 5॥
प्रकरण 1
ऐशी ही निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ 1-1॥
जो प्रीयुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एकाहारी । एकाआंगाची ॥ 1-2॥
आवडीचेनि वेगें । एकएकातें गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाति ॥ 1-3॥
जि एकचि नव्हे एकसरें । दोघा दोपण नाहीं पुरें ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ 1-4॥
कैशी स्वसुखाची अळुकी । जे दोनीपण मिळोनि एकीं ।
नेदितीच कवतुकीं । एकपण फुटों ॥ 1-5॥
हा ठावोवरी वियोगभेडे । जें बाळ जगायेवढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ 1-6॥
आपुलिये आंगीं संसारा । देखलिया चराचरा ।
परी नेदितीच तिसरा । झोक लागों ॥ 1-7॥
जया एके सत्तेचें बैसणें । दोघां एका प्रकाशाचें लेणें ।
जें अनादि एकपणें । नांदती दोघें ॥ 1-8॥
भेदु लाजौनि आवडी । एकरसीं देत बुडी ।
जो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथें ॥ 1- 9॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहींना तो गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकएकांची ॥ 1-10॥
कैसा मेळु आला गोडिये । दोघे न माती जगीं इये ।
कीं परमाणूहि माजी उवाये । मांडिलीं आहाती ॥ 1-11॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ।
जिये दोघे जीवप्राण । जिया दोघा ॥ 1-12॥
घरवातें मोटकी दोघे । जैं गोसावी सेजे रिघे ।
तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ 1-13॥
जया दोघांमाजीं एकादें । विपायें उमजलें होय निदे ।
तरी घरवात गिळुनी नुसधें । कांहीं ना कीं ॥ 1-14॥
दोन्ही आंगांची आटणी । गिंवसीत आहाती एकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाधी जियें ॥ 1-15॥
विषो एकमेकांची जिये । जिये एकमेकांची विषयी इयें ।
जिहीं दोघीं सुखियें । जिये दोघे ॥ 1-16॥
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण एकलें नांदे ।
जग सकळ अधाधे- । पणें जिहीं ॥ 1-17॥
दो दांडीं एक श्रुती । दोहों फुलीं एक दृति ।
दोहों दिवीं दीप्ती । एकीची जेवीं ॥ 1-18॥
दो ओठीं एकी गोष्टी । दो डोळां येकी दृष्टी ।
तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । एकीचि जेवीं ॥ 1-19॥
दाऊनि दोनीपण । एकरसाचें आरोगण ।
करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ 1-20॥
जे स्वामीचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता ।
जियेवीण सर्वकर्ता । कांही ना जो ॥ 1-21॥
जे कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें असणें ।
नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ 1-22॥
गोडी आणि गुळु । कापुर आणि परिमळु ।
निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ 1-23॥
समग्र दीप्ती घेतां । जेवि दीपचि ये हाता ।
तेवी जियेचिया तत्त्वता । शिवूचि लाभे ॥ 1-24॥
जैशी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा ।
तैशी भेद गिळित शोभा । एकचि जे ॥ 1-25॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ 1-26॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्त विशेषु । शक्ती जाली ॥ 1-27॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींहि शिवपण ।
थारो न शके ते आपण । शिवे घडली ॥ 1-28॥
ऐश्वर्येशी ईश्वर । जियेचें अंग संसारा ।
आपण होऊनी उभारा । आपणचि जे ॥ 1-29॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि अंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥ 1-30॥
ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा ।
जिये सदैवोचिया लिळा । दाखविला ॥ 1-31॥
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ 1-32॥
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्टत्वाचिया क्षोभा ।
जियेतें न देखतुचि उभा ॥ आंगचि सांडी ॥ 1-33॥
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेवढा ।
अंगविला उघडा । जियेवीण ॥ 1-34॥
जो हा ठाव मंदरूपें । उवाइलेपणें हारपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥ 1-35॥
जिया चेवविला शीवु । वेद्याचे बोणें बहु ।
वाढीतेणेंसि जेउ । धाला जो ॥ 1-36॥
निदेलेनि भातारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसावला नुरे । आंबुलेपणही ॥ 1-37॥
जंव कांत लपो बैसें । तंव नेणिजे जियोद्देशें ।
जिये दोघे आरिसे । जिया दोघा ॥ 1-38॥
जियेचेनि अंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ 1-39॥
जया प्रियेचें जें आंग । जो प्रियु जियेचें चांग ।
कालवूनि दोन्ही भाग । जेविते आहाति ॥ 1-40॥
जैशि कां समीरेसकट गति । कां सोनियासकट कांती ।
तैसे शिवेशी शक्ति । अवघीच जे ॥ 1-41॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तीशी केवळु । श्रीशिवूचि जो ॥ 1-42॥
राति आणि दिवो । पातली सूर्याचा ठावो ।
तैसा आपुलिया साचीं वावो । दोघे जिये ॥ 1-43॥
किंबहुना तिये । प्रणवाक्षरीं विरुढतिये ।
दशेचीही वैरिये । शिवशक्ति ॥ 1-44॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळित एकार्थाचा उजिरा ।
नमो तया शिववोहरा । ज्ञानदेवो म्हणे ॥ 1-45॥
जयाच्या दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।
आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ 1-46॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।
सिंधूशीं प्रलयनिरीं । गंगा जैशी ॥ 1-46॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनी गेलीं दोनी ।
अघवीयाचिं रजनी । दिठीच जे ॥ 47॥
प्रकरण 1
वायु चळबळेंशीं । जिराला व्योमाचिये कुशीं ।
अटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ 1-48॥
तेवीं निहाळितां ययातें । गेले पाहणेंनशी पाहते ।
पुढती घरौतें वरौतें । वंदिलीं तियें ॥ 1-49॥
जयाच्या वाहणीं । वेदकु वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचीही करी ॥ 1-50॥
तेथ मी नमस्करा- । लागीं उरों दुसरा ।
तरी लिंगभेद पर्क्ष्हा । जोडूं जावों ॥ 1-51॥
परि सोनेनसी दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ 1-52॥
सांगतां वाचेतें वाचा । ठावो वाच्यवाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ॥ 1-53॥
सिंधु आणि गंगेची मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ 1-54॥
पाहें पा भास्य भासकता । आपुलां ठाई दाविता ।
एकपण काय सविता । मोडीतसे ? ॥ 1-55॥
चांदाचिया दोंदावरी । होता चांदणियाची विखुरी ।
काय उणें दीप्तीवरी । गिंवसो पा दीपु ॥ 1-56॥
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ।
अगळें निर्मळ । रूपा ये कीं ? ॥ 1-57॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवू काय केला चिरटिया ? ।
कीं 'णकार' ती रेघटिया । भेदवला काई ? ॥ 1-58॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ 1-59॥
म्हणोनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करोनि सिनानीं ।
मी निघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ 1-60॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।
कां बुडी दीजे तरंगें । वायूचा ठेला ॥ 1-61॥
नातरी नीदजात खेवो । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवी देवो । वंदिली मिया ॥ 1-62॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेवी अहं देऊनि मी शंभु । शांभवी झालों ॥ 1-63॥
शिवशक्ति समावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशे । रिघाला जैसा । 1-64॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनमन नाम प्रथमं
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 2
प्रकरण दुसरें
श्रीगुरुस्तवन
आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ 2-1॥
मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरू ।
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदू ॥ 2-3॥
अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।
तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो की ॥ 2-3॥
जयाचेनि आपांगपातें । बद्ध मोक्षपणीं आते ।
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ 2-4॥
कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ 2-5॥
सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।
आत्मा आत्मसुख देखे । आरसां जिये ॥ 2-6॥
बोधचंद्राचिया कळा । विखुरल्या एकवळा ।
कृपापुनीव लीळा । करी जयाची ॥ 2-7॥
जो भेटलियाचि सवे । पुरति उपायाचे धांवे ।
प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ 2-8॥
जयाचेनि अनवसरें । द्रष्टा ले दृश्याचें मोहिरें ।
जो भेटतखेव सरे । बहुरुपचि हें ॥ 2-9॥
अविद्येचें काळवखें । कीं स्वबोधसुदिनीं फांके ।
सीतलें प्रसादार्कें । जयाचेनि ॥ 2-10॥
जयाचेनि कृपासलिलें । जीवू हा ठाववरी पाखाळे ।
जे शिवपणही वोविळें । अंगी न लवी ॥ 2-11॥
राखों जातां शिष्यातें । गुरुपणही धाडिलें थितें ।
तरी गुरूगौरव जयातें । सांडीचिना ॥ 2-12॥
एकपण नव्हे सुसास । म्हणूनि गुरु-शिष्याचे करुनि मिस ।
पाहणेचि आपली वास । पाहतचि असे ॥ 2-13॥
जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें ।
परिणमे अपारें । बोधामृतें ॥ 2-14॥
वेद्या देतां मिठी । वेदकूही सुये पोटीं ।
तर्क्ष्ही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ 2-15॥
जयाचेनि सावायें । जीवू ब्रह्मौपर लाहे ।
ब्रह्म तृणातळीं जाये । उदासें जेणें ॥ 2-16॥
उपास्तीवरी राबतिया । उपायफळीं येती मोडूनिया ।
वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा का ॥ 2-17॥
जयाचा दिठिवा वसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु ।
तंव आपुलिये फळीं हातु । न घेपती ही ॥ 2-18॥
पुढें दृष्टीचेनि आलगें । खोची की निवटे मागें ।
येवढेया जैता नेघे । आपणपें जो ॥ 2-19॥
लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले ।
नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ 2-20॥
नाहीं तें जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे ।
जेणें तारिलियाहि नुरिजे । कवणी ठायीं ॥ 2-21॥
आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव ।
ऐसें कोणी एक भरीव । आकाश जो ॥ 2-22॥
चंद्रादि सुशीतळें । घडली जयाचेनि मेळें ।
सूर्य जयाचेनि उजाळे । कडवसेनी ॥ 2-23॥
जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलीये दशे ।
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ 2-24॥
चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें ।
तर्क्ष्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ 2-25॥
जो उघड कीं न दिसे । प्रकाश की न प्रकाशे ।
असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ 2-26॥
आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळवूं अनुमानाची मांदी ।
हा प्रमाणाही वो नेदी । कोणाही मा ॥ 2-27॥
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंशीं चावळों बैसे ।
दुजयाच्या रागीं रुसे । एकपणा जो ॥ 2-28॥
प्रमाणाची परी सरे । तैं प्रमेयेची आविष्करे ।
नवल मेचु ये धुरे । नाहींपणाची ॥ 2-29॥
कांहीबाही अळुमाळु । देखिजे येखादे वेळू ।
तरी देखे तेंही विटाळू । जयां गांवीं ॥ 2-30॥
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें ।
आंगीं लावुनि नाडिलें । नांवचि येणें ॥ 2-31॥
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां के निवृत्ती ? ।
या नामाचि वाय बुंथी । सांडीचिना ॥ 2-32॥
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? ।
तरि कैशी बैसे ठाईं । निवृत्तिनामाच्या ? ॥ 2-33॥
परी सूर्यासी अंधकारु । कै जाहला होता गोचरू ? ।
तरी तमारी हा डगरू । आलाचि कीं ॥ 2-34॥
तैसें लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे ।
न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ 2-35॥
हां गा मायावशें दाविशी । तें मायिक म्हणूनी वाळिशी ।
अमायिक तंव नव्हशी । कवणाहि विषयो ॥ 2-36॥
शिव शिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? ।
एकाही निर्धार करूं । देतासी कां ? ॥ 2-37॥
नामें रूपें बहुवसें । उभारुनि पाडिलीं वोसें ।
सत्तेचेनि आवेशे । तोषलासी ना ? ॥ 2-38॥
जिवु घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें ।
मृत्यु उरे स्वामीपणें । तेंही नव्हे ॥ 2-39॥
विशेषाचेनि नांवें । आत्मत्वही न साहवे ।
किंबहुना नव्हे । कोण्ही या ॥ 2-40॥
राती नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।
नुरेचि जेवि चेइलिया । नीद जैशी ॥ 2-41॥
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ 2-42॥
याच्या हाता पाया पडे । तंव वंद्यत्वें पुढें न मंडे ।
न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ 2-43॥
आपणाप्रति रवि । उदो न करी जेवीं ।
हा वंद्य नव्हें तेवी । वंदनासी ॥ 2-44॥
कां समोरपण आपुलें । न लाहिजे कांहीं केलें ।
तैसें वंद्यत्व घातलें । हिरोनी येणें ॥ 2-45॥
आकाशाचा अरिसा । नुठी प्रतिबिंबाचा ठसा ।
हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासि ॥ 2-46॥
परी नव्हे तरी न हो । हे वेखासि कां घेवों ।
परी वंदीतयाही ठावो । उरों नेदी ॥ 2-47॥
आंगौनि एकुणा झोलु । फेडितांचि तरी तो बाहिरीलु ।
कडु फिटे आतुलु । न फेडीतांचि ॥ 2-48॥
नाना बिंबपणासरिसे । घेउनि प्रतिबिंब नासे ।
नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदतेनसी ॥ 2-49॥
नाहीं रूपाची जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींच नव्हे ।
आम्हा फळले हे पाये । ऐशिया दशा ॥ 2-50॥
गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका ।
ते कां होईल पुळिका । कापुराचिया ॥ 2-51॥
तया दोहो परस्परें । होय ना जंव मैल्हेरे ।
तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ 2-52॥
तेवि देखेना मी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें ।
चेइलिया कांते । स्वप्नींचि जेवी ॥ 2-53॥
किंबहुना इया भाषा । द्वैताचा जेथें उपखा ।
फेडुनियां स्वसखा । श्रीगुरू वंदिला ॥ 2-54॥
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपणा रूप नाहीं ।
आणि गुरु-शिष्य दुवाळीही । पवाडु केला ॥ 2-55॥
कैसा आपणया आपण । दोंवीण सोयरेपण ।
हा याहूनि विलक्षण । नाहीं ना नोहे ॥ 2-56॥
जग अवघें पोटीं माये । गगनायेवढें होऊनि ठाये ।
कीं तेचि निसी साहे । नाहींपणाची ॥ 2-57॥
कां पूर्णते तरि आधारू । सिंधु जैसा दुर्भरू ।
तैसा विरुद्धा पाहुणेरू । याच्या घरीं ॥ 2-58॥
तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परी सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ 2-59॥
एक म्हणतां भेदे । ते कीं नानात्वें नांदे ? ।
विरुद्धे आपणया विरुद्धे । होती काई ? ॥ 2-60॥
म्हणोनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ 2-61॥
कां सुवर्ण आणि लेणें । वसतें एकें सुवर्णें ।
वसते चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ 2-62॥
नाना कापुर आणि परिमळु । कापूरचि केवळु ।
गोडी आणि गुळु । गूळचि जेवीं ॥ 2-63॥
तैसा गुरुशिष्यमिसें । हाचि एकु उल्हासे ।
जरी कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ 2-64॥
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।
हे आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ 2-65॥
पहा पा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद एकला ।
परी चेता चेवविता जाला । दोनी तोचि ॥ 2-66॥
ते तोचि चेता तोचि चेतवी । तेवी हाचि बुझे हाचि बुझावी ।
गुरु-शिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ 2-67॥
दर्पणेंवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगितो तरी लीळा । सांगतों हें ॥ 2-68॥
एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्याशी विसकुसो ।
सोइरिकीचा अतिसो । पोखीतसे ॥ 2-69॥
निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।
जया निवृत्तीचि राणीव । निवृत्तिची ॥ 2-70॥
वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें ।
आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ 2-71॥
आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति ।
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ 2-72॥
वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ ।
तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ 2-73॥
गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ।
तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ 2-74॥
तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।
घेयावया फूलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ 2-75॥
दिठी मुखाचिये बरवे । पाठीकडूनि जैं पावे ।
तैं आरिसे धांडोळावे । लागती काई ? ॥ 2-76॥
कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ 2-77॥
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधूनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ 2-78॥
ऐसें करणयावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ 2-79॥
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरुप्रणामें येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ 2-80॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे सद्गुरुस्तवननाम द्वितीय प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 3
प्रकरण तिसरें
वाचाऋणोत्तीर्ण
ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।
पूर्ण तर्क्ष्ही ऋण न फिटे । जे चेणेंचि नीद कीं ॥ 3-1॥
येर्क्ष्हवीं परादिका चौघी । जीव मोक्षाच्या उपेगी ।
अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ 3-2॥
देहासवे हातपाये । जाती मनासवें इंद्रियें ।
कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ 3-3॥
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।
तेवीं अविद्येचे संबंधी । अटती इया ॥ 3-4॥
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।
जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ 3-5॥
लवण आंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।
नीद मरोनि जागरें । जीइये निदे ॥ 3-6॥
तेवि अविद्येसवें । चौघीं वेचिती जीवें ।
तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि इया ॥ 3-7॥
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।
तरी हाही शीण लेवा । बोधरूपेंची ॥ 3-8॥
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।
दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ 3-9॥
जिती अविद्या ऐशी । अन्यथा बोधातें गिंवशी ।
तेचि यथाबोधेंसी । निमाली उठी ॥ 3-10॥
परी जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।
बंधमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ 3-11॥
मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? ।
अज्ञाना घरी त्राये । वाउगी यांची ॥ 3-12॥
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ 3-13॥
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।
मानितसे तें जाण । म्हणो ये कीं ॥ 3-14॥
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? ।
परी मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ 3-15॥
आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितलें असे । सदाशिवें ॥ 3-16॥
आणि वैकुंठींचेनिहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।
बांधिजे हें निरोपण । बहु केलें ॥ 3-17॥
परी शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।
मानूं तें हें लाभे । न बोलतांही ॥ 3-18॥
जें आत्मज्ञान निखळ । तेंही घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोहे ? ॥ 3-19॥
ज्ञानें श्लाघतु आहे । तैं ज्ञानपण धाडिलें वाये ।
दीप वांचोनि दिवा लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ 3-20॥
आपणपें आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।
आपणपें गिंवशी । हें कीरू होये ? ॥ 3-21॥
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ 3-22॥
तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि आपली प्रमा ।
करितसे सोहमा । ऐसा बंधु ॥ 3-23॥
जें ज्ञान स्वये बुडे । म्हणोनी भारी नावडे ।
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ 3-24॥
म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ आंगाचा ।
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ 3-25॥
आंगाचेनि इंधने उदासु । उठोनि ज्ञानाग्नी प्रवेशु ।
करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ 3-26॥
आंगीं लाविलिया विभूति । तैं परमाणूही झडती ।
परि पांडुरत्वें कांती । राहे जैशी ॥ 3-27॥
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।
परी होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ 3-28॥
ना वोहळला आंगीं जैसे । पाणी पाणीपणें नसे ।
तर्क्ष्हीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ 3-29॥
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।
असे पायातळीं । रिगौनियां ॥ 3-30॥
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।
आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ 3-31॥
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।
तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ 3-32॥
म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींची ॥ 3-33॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे वाचाऋणोत्तीर्णनाम तृतीय प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 4
प्रकरण चवथें
ज्ञान अभेदकथन
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवी ॥ 4-1॥
कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला ।
मुख भोगी आपुला । आपणचि ॥ 4-2॥
ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ।
तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जाहलें ॥ 4-3॥
लावी आंत ठाउनि कोपट । तो साधी आपणया सकट ।
का बांधलेया चोरट । मोटेमाजी ॥ 4-4॥
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।
ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जाहलें ॥ 4-5॥
अज्ञानाचा टेका । नसतांही ज्ञान अधिका ।
फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ 4-6॥
वात दशाही ते निमालियां । येणें जें ये उवाया ।
तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ 4-7॥
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणें ।
कां फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ 4-8॥
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।
कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ 4-9॥
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान ।
जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ 4-10॥
जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळां जळां दोहींतें ।
बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ 4-11॥
कीं विश्वाही वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ।
तैं तेजमत निखळ । तेंचि होय ॥ 4-12॥
नाना नीद मारोनी । आपणपें हिरोनी ।
जागणें ठाके होउनी । जागणेंचि ॥ 4-13॥
तैसें अज्ञान आटोनिया । ज्ञान ये तें उवाया ।
ज्ञानाज्ञान गिळोनिया । ज्ञानचि होय ॥ 4-14॥
ते वेळीं पुनिवां भरे । ना आवसा सरे ।
तें चंद्रंचि उरे । सतरावी जैशी ॥ 4-15॥
कां तेजांतरे नाटोपे । कोणे तमें न शिंपे ।
तें उपमेचें जाउपे । सूर्यचि होय ॥ 4-16॥
म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।
तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जे ॥ 4-17॥
परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें ।
काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ 4-18॥
आकाश आपणपया रिघे ? । कायी आगी आपणया लागे ? ।
आपला माथा वळघें । आपण कोण्ही ? ॥ 4-19॥
दिठी आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? ।
नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ 4-20॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? ।
परिमळु परिमळें । घेपत असे ? ॥ 4-21॥
तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।
म्हणोनी ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ 4-22॥
आणि ज्ञान ऐशी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।
तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ 4-23॥
जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।
मा तेज तरी होये । तेजासी काईं ? ॥ 4-24॥
तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।
आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ 4-25॥
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासी पां ? ॥ 4-26॥
शून्यसिद्धांतबोधु । कोणी सत्ता होय सिद्धु ? ।
नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ 4-27॥
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कवणासी पा ॥ 4-28॥
कीं निदेचेनि आलेपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । कोणासी पा ? ॥ 4-29॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगु आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ 4-30॥
म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।
नोहोनी असणेनवीण । असणें जें ॥ 4-31॥
परी आणिका कां आपणया । न पुरे विखो होआवया ।
म्हणोनी न असावया । कारण कीं ॥ 4-32॥
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाही निमाला । आठवु तया ॥ 4-33 ।
परी जीवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।
हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ 4-34॥
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणही मोडे ।
परी नाहीं नोहे हें फुडे । जाणेचि ते ॥ 4-35॥
कां काळा राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।
न चोजवे तर्क्ष्ही आसिका । हा मी बाणे ॥ 4-36॥
तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानूसवाणें ।
नसोनि असणें । ठायें ठावो ॥ 4-37॥
निर्मळपणीं आपुला । आकाशाचा संचु विराला ।
तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ 4-38॥
कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारतलिया पोखरणी ।
हें आणिका वांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ 4-39॥
आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे ।
आहे नाहीं ऐसें । सांडूनियां ॥ 4-40॥
निदेचें नाहींपण । निमालियाही जागेंपण ।
असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ 4-41॥
कां भूमी कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।
तो नेलिया म्हणिजे । तेणेंवीण ॥ 4-42॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ 4-43॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे ज्ञान अभेदकथननाम चतुर्थ
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 5
प्रकरण पांचवे
सच्चिदानंदपदत्रयविवरण
सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीहीं उणे लेख ।
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ 5-1॥
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ 5-2॥
उजाळ दृति मार्दव । या तिहीं तिहीं उणीव ।
हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ 5-3॥
आंगें कीर उजाळ । कीं उजाळताचि मवाळ ।
कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ 5-4॥
ऐसें एके कापूरपणीं । तिन्ही इये तिहीं उणी ।
इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ 5-5॥
येर्क्ष्हवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें ।
परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ 5-6॥
सत्ताचि कीं सुखप्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु ।
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ 5-7॥
शुक्लपक्षीच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।
परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ 5-8॥
थेंबीं पडतां उदक । थेंबां धरूं ये लेख ।
परी पडिलाठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ 5-9॥
तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ 5-10॥
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ 5-11॥
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें ।
लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ 5-12॥
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनव्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ 5-13॥
सूर्याचेनि प्रकाशें । जें कांहीं जड आभासें ।
तेणें तो गिवसें । सूर्यु काई ? ॥ 5-14॥
तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्य सुजें ।
ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ 5-15॥
विषो नाहीं कोणाही । जया प्रमेयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होये ॥ 5-16॥
प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें काई स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ 5-17॥
एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्त्वता ।
मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ 18॥
प्रकरण 5
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हें शेष । विचाराचें ॥ 5-19॥
ऐसेनि इयें प्रसिद्धें । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ 5-20॥
ते वेळीं वरषोनि मेघु । समुद्र होऊनि वोघु ।
सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ 5-21॥
फळ विउनी फूल सुके । फळनाशे रसपाकें ।
तोही रस उपखें । तृप्तीदानीं ॥ 5-22॥
कां आहुति अग्नीआंतु । घालूनि वोसरे हातु ।
सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥ 5-23॥
नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निघोनि ।
कां निदैलें चेववुनी । चेवितें जैसें ॥ 5-24॥
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ 5-25॥
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ 5-26॥
मग आपुलियाकडे । मवितया से पडे ।
तैं लाजलाजों आखुडे । मविते जैसें ॥ 5-27॥
तैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ।
मा सत्तात्व संभवे । सत्तेसि कायि ? ॥ 5-28॥
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं ये ॥ 5-29॥
नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे तैसें जागणेंही ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं ये ? ॥ 5-30॥
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ 5-31॥
म्हणोनी सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ 5-32॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक ।
सुखामात्रचि एक । स्वयें आथी ॥ 5-33॥
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ 5-34॥
तैसें सुखा आतोनि निघणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ 5-35॥
जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे ।
मां डंकूचि तैं भरे । कोण कोणा ? ॥ 5-36॥
तैसें आपुलेनि सुखपणें । जया नाहीं सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ 5-37॥
आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ 5-38॥
सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडूनिया निदसुरिया ।
आपुलिया हात चोरिया । आपणचि जें ॥ 5-39॥
न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ 5-40॥
कां न सज्जिता विणा । तो नादु जो अबोलपणा ।
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ 5-41॥
नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।
आपणचि भंवरा । होआवें पडे ॥ 5-42॥
नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे ।
हें पाहणें तैसें नोहे । आणिका जोगें ॥ 5-43॥
तैसें सुखपणा येवों । लाजें आपुलें सुख पावों ।
तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ 5-44॥
दिहाचिया दुपारीं । चांदू जैसा अंबरीं ।
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ 5-45॥
रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य ।
क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ 5-46॥
जैं मनाचा अंकुर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।
तोचि हन माजे । तरीच घडे ॥ 5-47॥
कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।
तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ 5-48॥
नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलियाही अनळा ।
लागणें तैं केवळा । अंगासीचि ॥ 5-49॥
दर्पणाचेनि नेमें- । विणचि मुख प्रेमे ।
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ 5-50॥
न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें ।
ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ 5-51॥
एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य ।
तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ 5-52॥
आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।
जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ 5-53॥
एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण ।
दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ 5-54॥
आंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।
येथें उठली पांती । लक्षणांची ॥ 5-55॥
उपाय मागिला पाये । घेऊन जाले वाये ।
प्रतीति सांडिली सोये । प्रत्ययाची ॥ 5-56॥
येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि जाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ 5-57॥
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिन्नला ।
नुसधेपणें थोटावला । अनुभवु जेथे ॥ 5-58॥
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ 5-59॥
कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैचा कीजे ? ॥ 5-60॥
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासीचि ॥ 5-61॥
अनुभवा हा ठावोवरी । आपुलीचि अनवसरी ।
तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ 5-62॥
कां परेसी पडे मिठी । तेथें नादा सळु नुठी ।
मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ 5-63॥
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी ।
कीं धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ 5-64॥
उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती ।
वांचुनि पिकलां शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ 5-65॥
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जरी ॥ 5-66॥
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ 5-67॥
येतुलियाही परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जर्ही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ 5-68॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम
पंचम प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 6
प्रकरण सहावें
शब्दखंडण
बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ 6-1॥
पाहतें आरिसा पाहें । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें पाहतें ॥ 6-2॥
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें एके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ 6-3॥
आपण तंव खपुष्प । परी फळ ते जगद्रूप ।
शब्द मवी तैं अमुप । कोण आहे ? ॥ 6-4॥
विधिनिषेधाचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ।
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ 6-5॥
हा अविद्येच्या आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ 6-6॥
शुद्धा शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी ।
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ 6-7॥
जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला ।
आत्मा बोलें भेटला । आपणपयां ॥ 6-8॥
दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।
म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ 6-9॥
जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती ।
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ 6-10॥
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।
गोमटे काय शब्दाचें । एकैक वानूं ॥ 6-11॥
किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
परी ययाही समंधु । नाहीं येथें ॥ 6-12॥
आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे ।
स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ 6-13॥
आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे ।
तरी वस्तूशीं वस्तू दुसरें । असेना कीं ॥ 6-14॥
आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? ।
काय जीभ जिभेतें । चाखे न चाखे ? ॥ 6-15॥
जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? ।
स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ 6-16॥
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? ।
तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ 6-17॥
एवं स्मरणास्मरण नाहीं । तरी स्मारकें काज काई ? ।
म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ 6-18॥
आणिक एक शब्दें । काज कीर भलें सिद्धें ।
परि धिवसा न बंधे । विचारू येथें ॥ 6-19॥
कां जे बोलें अविद्या नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे ।
हें म्हणतखेव पिसें । आलेंचि कीं ॥ 6-20॥
सूर्यो रात्रि मारील । मा आपणया उदो करील ।
हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ 6-21॥
चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? ।
कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ 6-22॥
म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाहीं निरुती ।
नाहीं आत्मा आत्मस्थिती । रिगे ऐसा ॥ 6-23॥
अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें ।
मा तर्कांचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ 6-24॥
इंद्रधनुष्या सितें । कवण धनवई न लाविजेतें ।
तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ 6-25॥
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।
तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ 6-26॥
साहे बोलाची वळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।
तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ 6-27॥
नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे ।
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ 6-28॥
नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।
तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ 6-29॥
जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें ।
मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ 6-30॥
दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।
तेंवि अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ 6-31॥
वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।
नागवें नागविलिया । विशेषु काई ? ॥ 6-32॥
मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।
परि उपवासा वेगळ । आनु आथी ? ॥ 6-33॥
मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें ।
मा उमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ 6-34॥
हें दिसे तैसें असे । तरी चित्रींचेनि पाउसें ।
वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ 6-35॥
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें ।
तरी मसीचिया वोरबारें । कां सिणावें ? ॥ 6-36॥
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? ।
तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ 6-37॥
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे ।
हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ 6-38॥
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।
आपुलां अभावीं आपण । साधीतसे ॥ 6-39॥
कांहीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? ।
वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ 6-40॥
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।
सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ 6-41॥
हे अविद्या तरी मायावी । परी मायावीपणचि लपवी ।
हे साचा आली अभावी । आपुलां हे ॥ 6-42॥
बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं ।
आतां बोलू हात वसी । कवणावरी ॥ 6-43॥
साउलि येतें साबळें । हालया भोय आडळे ।
कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ 6-44॥
कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं ।
नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाच्या ॥ 6-45॥
उठावला वोथरे तवका । तो सुनाथा पडे असिका ।
अविद्यानाशीं तर्का । तैसें होय ॥ 6-46॥
ऐसी अविद्या नासावी । हें वाहेल जो जीवीं ।
तेणें साली काढावी । आकाशाची ॥ 6-47॥
तेणें शेळी गळां दोहावीं । गुडगाडोळां वास पाहावी ।
वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ 6-48॥
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू ।
कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । 6-49॥
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।
वारयाचे तांथु । वळू सुखें ॥ 6-50॥
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरूं ।
तळहातींचे विंचरू । केस सुखें ॥ 6-51॥
घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू ।
सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ 6-52॥
तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू ।
वांझेचें लेंकरूं । परणू सुखें ॥ 6-53॥
तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें ।
मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ 6-54॥
अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।
आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ 6-55॥
नाहीं तयाचेनि नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।
अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ 6-56॥
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती ।
जेवी दुपारीं कां वाती । अंगणींचिया ॥ 6-57॥
न पेरितां शेती । जे कीं संवगणिया जाती ।
तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ 6-58॥
खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा ।
तो न करितांचि उगा । घरी होता ॥ 6-59॥
पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु ।
अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ 6-60॥
माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे ।
तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ 6-61॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगुं जाये ।
मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ 6-62॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे ।
खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ 6-63॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।
परी रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ 6-64॥
दिठी पाहतां काय न फावे । परी निदेतें तंव न देखवे ।
चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ 6-65॥
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ।
जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ 6-66॥
नुसधियेचि साच्या । मुका होय वाचरुकाचा ।
अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ 6-67॥
तैसीं अविद्येसीं सन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।
उठलींचि निरर्थकें । जल्पें होतीं ॥ 6-68॥
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? ।
अविद्यानाशीं विचारु । तैसा होये ॥ 6-69॥
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें ।
निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ 6-70॥
कैसीनि ही वस्तु नसे । तेथें जै शब्दाचा अर्थ हों बैसे ।
तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ 6-71॥
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई ।
परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ 6-72॥
यालागीं अविद्येचिया मोहरां । उठलियाही विचारा ।
आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ 6-73॥
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।
हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ 6-74॥
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया ।
येईल हें साविया । विरुद्धचि ॥ 6-75॥
आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे दिवशीं ।
कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ 6-76॥
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? ।
तळहात काय वळघे । आपणपयां ? ॥ 6-77॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? ।
परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ 6-78॥
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल एके क्षणीं ।
परि पाणियासि पाणी । पाजवे कायी ? ॥ 6-79॥
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा होय ऐसा ।
जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ 6-80॥
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।
वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ 6-81॥
आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया ।
समोर होआवया । ठाकीं आहे ? ॥ 6-82॥
दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? ।
कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ 6-83॥
चंदन चंदनपणा लावी ? । रंगु रंगपणा लावी ।
मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैसें ? ॥ 6-84॥
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।
रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ 6-85॥
आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।
परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ 6-86॥
तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव ।
आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ 6-87॥
आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे ।
डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ 6-88॥
आरसा आपुलिये । आंगीं आपणा पाहे ।
तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ 6-89॥
दिगंता पैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।
मा तिये कां तियेचें । आंग फुटे ? ॥ 6-90॥
रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें ।
परि कायी कीजे नेणे । आपणपें चाखों ॥ 6-91॥
तरि जिव्हे काय आपलें । चाखणें हन ठेलें ? ।
तैसे नव्हे संचलें । तेंचि ते कीं ॥ 6-92॥
तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।
आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ 6-93॥
कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें ।
जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ 6-94॥
म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदवूनि शब्द शोभे ।
येईल ऐसा न लभे । उमसु घेवों ॥ 6-95॥
एवं माध्यान्हींची दिवा । तम धाडी ना दिवो दावी ।
तैसी उभयतां पदवी । शब्दा जाली ॥ 6-96॥
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तये नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ 6-97॥
ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी ।
हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ 6-98॥
आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं ।
अर्थता तरी नाहीं । निपटूनियां ॥ 6-99॥
बागुल आला म्हणतें । बोलणें जैसें रितें ।
कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ 6-100॥
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें ।
शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ 6-101॥
एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।
साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ 6-102॥
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।
अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ 6-103॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 7
प्रकरण सातवें
अज्ञानखंडण
येर्क्ष्हवीं तर्क्ष्ही अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा ।
तैं तरी काना- । खालींच दडे ॥ 7-1॥
आडसूनि अंधारीं । खद्योत दीप्ती शिरी ।
तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ 7-2॥
जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा ।
तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ 7-3॥
कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं ।
नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ 7-4॥
हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी ।
काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ 7-5॥
आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें ।
येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ 7-6॥
असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ।
मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानही लटिकें ॥ 7-7॥
या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें ।
तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ 7-8॥
अज्ञाने जेथ असावें । तेणें सर्व नेण होआवें ।
ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ 7-9॥
तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे ।
आणि तेणेंचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ 7-10॥
तरी नुठितां दुजें । जैं अज्ञान आहे बीजें ।
तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ 7-11॥
अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें ।
आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ 7-12॥
या लागीं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान ।
हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ 7-13॥
आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख ।
तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ 7-14॥
अहो आपणयाही पुरता । नेणू न करवे जाणता ।
तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ 7-15॥
आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? ।
सुषुप्ती सुषुप्तेया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ 7-16॥
तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें ।
तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ 7-17॥
ना तरी अज्ञान एक घडे । हें जयास्तव निवडे ।
तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ 7-18॥
पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा ।
तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ 7-19॥
इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी ।
तें न जळे तैं वाउगी । शक्तीच ते ॥ 7-20॥
आंधारु कोंडूनि घरीं । घरा पडसायी न करी ।
तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ 7-21॥
वोजावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे ।
दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ 7-22॥
तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके ।
तैं अज्ञानशब्द लटिलें । आलेंच कीं ॥ 7-23॥
येर्क्ष्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया ।
कारण म्हणतां न्याया । चुकी येईल कीं ॥ 7-24॥
अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी ।
आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ 7-25॥
स्वप्न आणि जागरु । आठवु आणि विसरु ।
इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ 7-26॥
शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट ।
कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ 7-27॥
नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों ।
तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ 7-28॥
हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे ।
तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ 7-29॥
अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनशी नांदे ? ।
ऐसीं कायसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ 7-30॥
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज ।
जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । 7-31॥
दुलांकुडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें ।
तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ 7-32॥
का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो ।
सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ 7-33॥
तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे ।
येर्क्ष्हवीं अज्ञान होये । लागलेंचि ॥ 7-34॥
आत्मेनशी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ।
वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ 7-35॥
लवणाची मासोळी । जरी जाली जिव्हाळी ।
तरी जळीं ना जळावेगळी । न जिये जेवीं ॥ 7-36॥
जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ।
म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ 7-37॥
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? ।
ना दवडणें न साहे । जयापरी ॥ 7-38॥
नाना पुनिवेचेनि आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें ।
कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ 7-39॥
तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा ।
हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ 7-40॥
तरी अज्ञान स्वरूपें कैसें । काय कार्यानुमेय असे ।
कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥ 7-41॥
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी ।
ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ 7-42॥
जैसी अंकुरेंसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ ।
तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होये ॥ 7-43॥
कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टी आरोपें ।
तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥ 7-44॥
नाना चांदु एकु असे । तो व्योमीं दुजा दिसे ।
तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे पैं ॥ 7-45॥
तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ।
तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥ 7-46॥
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्यविशेखीं ।
नेघे तें असे ये विखीं । आनु नाहीं ॥ 7-47॥
अज्ञान कार्यपणें । घेइजे तें अज्ञान म्हणणे ।
तरी घेताही करणें । तयाचेंची ॥ 7-48॥
स्वप्नीं दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन ।
तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥ 7-49॥
तरी चाखिला गूळ गूळें । माखिलें काजळ काजळें ।
कां घेपे देपे शुळें । हालया सुळें ॥ 7-50॥
तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ।
तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ 7-51॥
आतां घेतें घेइजे तें ऐसा । विचारु नये मानसा ।
तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ 7-52॥
तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा ।
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ 7-53॥
मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी ।
येणें बोलें ही जाणावी । अज्ञान उखी ॥ 7-54॥
एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणां भाजन ।
नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ 7-55॥
ना स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ।
मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥ 7-56॥
आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहू ।
परी ठायें ठाऊ । निदेजों नेणें ॥ 7-57॥
हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें ।
आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥ 7-58॥
जैसें न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान ।
जैसें कां हुताशन । सामर्थ्यांचें ॥ 7-59॥
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव ।
तैं कांहीं अज्ञान हांव । बांधतें कां ? ॥ 7-60॥
काइ दीप जैं न लाविजे । तैंचि काजळी फेडिजे ।
कां नुगवतीया वाळिजे । रुखाची छाया ॥ 61॥
नाना नुठितां देहदशा । कालवूनि लाविजे चिकसा ।
न घडितां आरिसा । उटिजे काई ॥ 62॥
प्रकरण 7
कां वोहाच्या दुधीं । सायचि असावी आधीं ।
मग ते फेडूं इये बुद्धी । पवाडु कीजे ॥ 7-63॥
तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मेपणा ठावो नाहीं ।
तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ 7-64॥
म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे । हें जालेंचि असे आपैसें ।
आतां रिकामेंचि काइसें । नाहीं म्हणो ॥ 7-65॥
ऐसाही आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा ।
अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ 7-66॥
जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण ।
कीं सर्वांपरी मरण । मारवलें कीं ॥ 7-67॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली ।
कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ 7-68॥
कां अभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला ।
चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ 7-69॥
कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख ।
नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ 7-70॥
तैसें अज्ञान आपुलिये वेळ । भोगी हेचि टवाळ ।
आतां तरी केवळ । वस्तू होऊनि असे ॥ 7-71 ॥
देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? ।
कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ 7-72॥
तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ।
घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ 7-73॥
जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें ।
ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ 7-74॥
नाना नीद धरावया हातीं । चेऊनी उठिला झडती ।
ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ 7-75॥
तेवीं पाहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं पिसें काइसें ।
न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ 7-76॥
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी ।
न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ 7-77॥
अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें ।
विचाराचे डोळे । देखते कां ? ॥ 7-78॥
ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नाइके ।
कीं निरुती हन मुके । अनसाईपणा ॥ 7-79॥
इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु ।
निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ 7-80॥
अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये सभे ।
कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ 7-81॥
नाना गगनौलाचिया माळा । वांझेचिया जालिया गळा ।
घापती तो सोहळा । पाविजेत असे ॥ 7-82॥
आणूनि कासवीचें तूप । भरू आकाशाचें माप ।
तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ 7-83॥
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती ।
तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ 7-84॥
म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें ।
परी आन एक स्फुरे । इयेविषयीं ॥ 7-85॥
आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें ।
वस्तू ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ 7-86॥
तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हढें ।
आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ 7-87॥
जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हढें ।
आणि उठिलें तरी रोकडें । देखत असों ॥ 7-88॥
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ।
यया दृश्या अनुमान । प्रमाण जालें ॥ 7-89॥
ना तरी चंद्रु एक असे । तो व्योमीं दुणावला दिसे ।
तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ 7-90॥
भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ।
न दिसती आणि अपाडें । साजीं असती ॥ 7-91॥
तरी भरंवसेनि मूळें । पाणी घेती हें न टळें ।
तैसें अज्ञान कळें । दृश्यास्तव ॥ 7-92॥
चेइलेया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे ।
परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ 7-93॥
म्हणोन वस्तूमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके ।
तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ 7-94॥
अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें ।
काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ 7-95॥
अगा चंद्रापासूनि उजळ । जेणें राविले वस्तू धवळ ।
तयातें काजळ । म्हणिजेत असे ॥ 7-96॥
आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी ।
अज्ञान इया वाहणी । मानूं तरी तें ॥ 7-97॥
कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी आमा ।
तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ 7-98॥
वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे ।
ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ 7-99॥
तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु ।
तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ 7-100॥
तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? ।
येर्क्ष्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ 7-101॥
कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे ।
तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ 7-102॥
असे म्हणावया जोगें । नाचरे कीर आंगें ।
परी नाहीं हें न लगे । जोडावेंचि ॥ 7-103॥
कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे ।
हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ 7-104॥
मिथ्या वादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली ।
विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ 7-105॥
जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येव्हढें काय चुके ? ।
परी दृश्याचिये न टेके । सोइ जो ॥ 7-106॥
वेदु काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें ।
ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ 7-107॥
सूर्यो कोणा न पाहे ? । परी आत्मा दाविला आहे ? ।
गगनें व्यापिता ठाये । ऐशी वस्तू ॥ 7-108॥
देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी ।
तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ 7-109॥
बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके ।
मना संकल्प निके । याहीहूनी ॥ 7-110॥
विषयाचिया बरडी । अखंड घासती तोंडीं ।
तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ 7-111॥
परी नाहींपणा सकट । खाऊनी भरलें पोट ।
ते कोणाही सकट । कां फावेल ? ॥ 7-112॥
जो आपणासी नव्हे विखो । तो कोण लाहे देखो ।
जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ 7-113॥
हें असो नामें रूपें । पुढासूनि अमूपें ।
जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ 7-114॥
म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक ।
न बाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ 7-115॥
नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेरी सवडे ।
तैसा निर्णो सुसुथा पडे । केला येथें ॥ 7-116॥
कां मस्तकांत निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली ।
तयाची फाकावली । बुद्धि जैशी ॥ 7-117॥
तैसें टणकोनी सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था ।
करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ 7-118॥
आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें ।
दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ 7-119॥
जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें ।
फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ 7-120॥
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण ।
द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ 7-121॥
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? ।
ऐक्या सकट पोटें । आटोनि गेलीं ॥ 7-122॥
येव्हढें ही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे ।
उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ 7-123॥
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी ।
उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ 7-124॥
दर्शनरिद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा ।
जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ 7-125॥
क्षणक्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी ।
दिठीकरवीं वेढवी । उदार जे ॥ 7-126॥
मागिलीये क्षणीचीं अंगें । पारसी म्हणोनियां वेगें ।
सांडूनि दृष्टि रिघे । नवीया रूपा ॥ 7-127॥
तैशीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं ।
लेऊनि आणी । जाणतेपणा ॥ 7-128॥
तया परमात्मपदीचें शेष । ना काहीं तया सुसास ।
आणि होय येव्हढी कास । घातली जेणें ॥ 7-129॥
सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचे तोंडवरी ।
परी तें आन घरीं । जाणिजेना ॥ 7-130॥
एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी ।
दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ 7-131॥
तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे ।
तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ 7-132॥
तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे ।
जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें । 7-133॥
आंगें आंगावरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।
तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ 7-134॥
पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणापें वेल्हावे जैसें ।
वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ 7-135॥
गुंफी ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा ।
भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥ 7-136॥
किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें ।
तर्क्ष्ही सूर्यासि दुसरें । बोलों येईल ॥ 7-137॥
चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडलिया बहुवसु ।
काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ 7-138॥
दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी ।
परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ 7-139॥
सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रार्जुना राया ।
तरी तो काय तिया । एकोत्तरावा ? ॥ 7-140॥
सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा ।
परी ताथुवींण दुजा । भाव आहे ? ॥ 7-141॥
कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा ।
मीनला तर्क्ष्ही वाचा । मात्र कीं ते ॥ 7-142॥
तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।
उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ 7-143॥
गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा ।
जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ 7-144॥
तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको ।
परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ 7-145॥
तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा ।
जरी विश्वा अशेखा । भरला आहे ॥ 7-146॥
दुबंधा क्षीरोदकीं । वाणें परी अनेकीं ।
दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ 7-147॥
पातयाचि मिठी । नुकलितां दिठी ।
अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ 7-148॥
न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका ।
तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ 7-149॥
मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें ।
तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ 7-150॥
पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी ।
आपुलियेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ 7-151॥
कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु ।
ना कूर्मी गिळी विस्तारु । आपेंआप ॥ 7-152॥
अवसेचिये दिवशीं । सतराविये अंशीं ।
स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ 7-153॥
तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे ।
तया नांव वावटे । आपणपेयां ॥ 7-154॥
सहजें आवघेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? ।
तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ 7-155॥
नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो ।
तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ 7-156॥
जें अनादीच दृश्यपणें । अनादीचि देखणें ।
हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ 7-157॥
अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना ।
कीं दीप्तीशीं तपना । संबंधु कीजे ? ॥ 7-158॥
विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे पुढें ।
ना तें नाहीं तेव्हढें । नाहींचि देखे ॥ 7-159॥
विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही ।
तर्क्ष्ही दशा ऐशीही । देखतचि असे ॥ 7-160॥
कापुराही आथी चांदिणें । कीं तोचि न माखे तेणें ।
तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥ 7-161॥
किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे ।
देखतचि असे । आपणपयातें ॥ 7-162॥
मनोरथांचीं देशांतरें । मनीं प्रकाशूनि नरें ।
मग तेथें आदरें । हिंडे जैसा ॥ 7-163॥
कां दाटला डोळा डोळ्यां । डोळाचि तारा होऊनियां ।
स्फुरे चोख म्हणौनियां । विस्मो नाहीं ॥ 7-164॥
यालागीं एकें चिद्रूपें । आपणयां आपणपें ।
देखिजे कां आरोपे । काय काज ? ॥ 7-165॥
किळेचें पांघरुण । आपजवी रत्ना कोण ? ।
कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ 7-166॥
चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? ।
कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ 7-167॥
कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? ।
कीं ताऊनि ऊन केलें । आगीतें काई ? ॥ 7-168॥
नाना ते लता । आपुले वेली गुंडाळितां ।
घर करी न करितां । जयापरी ॥ 7-169॥
कां प्रभेचा उभळा । दीप प्रकाशे संचला ।
तैसा चैतन्यें गिंवसिला । चिद्रूप स्फुरे ॥ 7-170॥
ऐसें आपणया आपण । आपुलें निरीक्षण ।
करावें येणेंवीण । करीतुचि असे ॥ 7-171॥
ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधारें चांदिणें ।
मा चंद्रासि उणें । स्फुरतें का ? ॥ 7-172॥
म्हणोनि हें न व्हावे । ऐसेंही करूं पावे ।
तरी तैसाचि स्वभावें । आइता असे ॥ 7-173॥
द्रष्टा दृश्य ऐसें । अळुमाळु दोनी दिसे ।
तेंही परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥ 7-174॥
तेथें दृश्य द्रष्टां भरे । । द्रष्टेपण दृश्यीं न सरे ।
मा दोन्ही न होऊनि उरे । दोहींचें साच ॥ 7-175॥
मग भलतेथ भलतेव्हां । माझारीले दृश्य-द्रष्ट भावा ।
आटणी करीत खेंवा । येती दोन्ही ॥ 7-176॥
कापुरीं अग्नीप्रवेशु । कीं अग्नि घातला पोतासु ।
ऐसें नव्हे संसरीसु । वेंचु जाला ॥ 7-177॥
एका एकु वेंचला । शून्य बिंदु शून्यें पुसिला ।
द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥ 7-178॥
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया ।
झोंबीसकट आटोनियां । जाइजे जेवीं ॥ 7-179॥
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी ।
येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ 7-180॥
सिंधु पूर्वापर । न मिळती तंवचि सागर ।
मग एकवट नीर । जैसें होय ॥ 7-181॥
बहु ये हें त्रिपुटी । सहजें हो तया राहटी ।
प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ? ॥ 7-182॥
दोनी विशेषें गिळी । ना निर्विशिष्टातें उगळी ।
उघडी झांपी येकेंच डोळीं । वस्तुचि हे ॥ 7-183॥
पातया पातें मिळे । कीं दृष्ट्त्वें सैंघ पघळे ।
तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥ 7-184॥
द्रष्टा दृश्याच्या ग्रासी । मध्यें लेखु विकाशी ।
योगभूमिका ऐसी । आंगीं वाजे ॥ 7-185॥
उठिला तरंगु बैसे । पुढें अनुही नुमसे ।
ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ 7-186॥
कां नीद सरोनि गेली । जागृती नाहीं चेयिली ।
तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ 7-187॥
नाना एका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी ।
हे गमे तैशिया दृष्टी । दिठी सूतां ॥ 7-188॥
कां मावळो सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो ।
तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ 7-189॥
घेतला श्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला ।
तैसा दोहींसि सिवतला । नव्हे जो अर्थु ॥ 7-190॥
कीं अवघवियांचि करणीं । विषयांची घेणी ।
करितांचि एके क्षणीं । जें कीं आहे ॥ 7-191॥
तया सारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो ।
येणें कां पाहों । न पाहों लाभे ? ॥ 7-192॥
कायी आपुलिये भूमिके । आरिसा आपुलियें निकें ।
पाहों न पाहों शके । हें कें आहे ? ॥ 7-193॥
कां समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया ।
वांचूनि तयाप्रति तया । होआवें कां ? ॥ 7-194॥
सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे केवीं ।
जे उदो वस्तूचीं चवी । स्वयें घेपे ? ॥ 7-195॥
कीं रसु आपणया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? ।
हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ 7-196॥
तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हो नेणे ।
आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ 7-197॥
जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां ।
तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ 7-198॥
आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? ।
तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ 7-199॥
हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें ।
बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ 7-200॥
पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे ।
म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ 7-201॥
एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें ।
ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ 7-202॥
दिसल्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें ।
तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ 7-203॥
दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे ।
आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ 7-204॥
मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं ।
तरी जाली ते वायाणी । प्रतीती कीं ॥ 7-205॥
देखतांची आपणयातें । आलिये निदेचेनि हातें ।
तया स्वप्ना ऐसा येथें । निहाळितां ॥ 206॥
प्रकरण 7
निद्रिस्तु सुखासनीं । वाहिजे अनुवाहणीं ।
तो साच काय तेसणी । दशा पावे ? ॥ 7-207॥
कीं सिसेंवीण एकएकें । दाविलीं राज्य करिती रंकें ।
तैशीं तियें सतुकें । आथी काई ? ॥ 208॥
प्रकरण 7
ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाई ।
तैसाची स्वप्नी कांहीं । न पविजेचि कीं ॥ 7-209॥
तान्हेलिया मृगतृष्णा । न भेटलिया शिणु जेसणा ।
मा भेटलेया कोणा । काय भेटलें ॥ 7-210॥
कीं साउलियेचेचि व्याजें । मेळविलें जेणें दुजे ।
तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ 7-211॥
तैसें दृश्य करूनियां । द्रष्टयातें द्रष्टया ।
दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ 7-212॥
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? ।
न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ 7-213॥
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? ।
तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ 7-214॥
तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया ।
तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि ते कीं ना ? ॥ 7-215॥
म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां ।
आतां जालाचि दिठा । कां करावा ॥ 7-216॥
नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त तेंचि जालें ।
येणें ही बोलें गेलें । दावणें वृथा ॥ 7-217॥
दोरा सर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा ।
द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ 7-218॥
दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके ।
परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ 7-219॥
तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो ।
म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जर्ही ॥ 7-220॥
वावो कीर होये । तर्क्ष्ही दिसत तंव आहे ।
येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ 7-221॥
तरी आन आनातें । देखोन होय देखतें ।
तरी मानूं येतें । देखिलें ऐसें ॥ 7-222॥
येथें देखोनि कां न देखोनी । ऐक्य कां नाना होऊनि ।
परी हा येणें वाचूनि । देखणें असे ? ॥ 7-223॥
आरिशानें हो कां दाविलें । तर्क्ष्ही मुखचि मुखें देखिलें ।
तो न दावी तर्क्ष्ही संचलें । मुखचि मुखीं ॥ 7-224॥
तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाच्या ठाईं ।
ना दाविला तर्क्ष्हीही । हाचि यया ॥ 7-225॥
जागृती दाविला । कां निदा हारविला ।
परी जैसा येकला । पुरुष पुरुषीं ॥ 7-226॥
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।
तर्क्ष्ही ठायें ठावो । राजाचि असे ॥ 7-227॥
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।
तर्क्ष्ही कांहीं उणें तया- । माजी असे ? ॥ 7-228॥
तैसें दावितां न दावितां । हा यया परौता ।
चढे न तुटे आइता । असतचि असे ॥ 7-229॥
तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें ।
देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ 7-230॥
दीपु दावी तयातें रची । कीं तेणेंची सिद्धी दीपाची ।
तैसी सत्ता निमित्ताची । येणें साच ॥ 7-231॥
वन्हीतें वन्ही शिखा । प्रकाशी कीर देखा ।
परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ? ॥ 7-232॥
आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें ।
देखिलें तरी स्वभावें । दृश्यही हा ॥ 7-233॥
म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणापें देखावया ।
निमित्त हा वांचुनियां । नाहींच मा ॥ 7-234॥
भलतेन विन्यासें । दिसत तेणेंची दिसे ।
हा वांचूनि नसे । येथें कांहीं ॥ 7-235॥
लेणें आणि भांगारें । भांगारचि एक स्फुरे ।
कां जे येथें दुसरें । नाहींचि म्हणोनि ॥ 7-236॥
जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं ।
म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ 7-237॥
हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो ।
लाभो कां दिठी पाहों । भलतैसा ॥ 7-238॥
परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि नाहीं ।
तैशा रीती भलतेयाही । हाचि यया ॥ 7-239॥
आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो ।
परी हा वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ 7-240॥
गंगा गंगापणें वाहो । कीं सिंधु होऊनि राहो ।
परी पाणीपणा नवलावो । हें न देखो कीं ॥ 7-241॥
थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें ।
घृतपण नव्हे । अनारिसें ॥ 7-242॥
ज्वाळा आणि वन्ही । न लेखिजती दोन्ही ।
वन्हिमात्र म्हणोनि । आन नव्हेचि कीं ॥ 7-243॥
तैसें द्रश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा ।
पाहतां एकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥ 7-244॥
इये स्फूर्तीकडोनी । नाहीं स्फुर्तिमात्र वांचुनि ।
तरी काय देखोनी । देखतु असे ? ॥ 7-245॥
पुढें फरकें ना दिसतें । ना मागें डोकावी देखतें ।
पाहतां येणें ययातें । स्फुरद्रुपेंचि ॥ 7-246॥
कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनि सोनें पांघुरलें ।
दिठीचे पाय गुंतले । दिठीसीची ॥ 7-247॥
श्रुतीसी मेळविली श्रुती । दृतीसि मेळविली दृती ।
कां जे तृप्तीसीचि तृप्ती । वोगरिली ॥ 7-248॥
गुळें गुळें परिवाडिला । मेरु सुवर्णें मढिला ।
कां ज्वाळा गुंडाळिला । अनळु जैसा ॥ 7-249॥
हें बहु काय बोलिजे । कीं नभ नभाचिया रिगे सेजे ।
मग कोणें निदिजे । जागे तें कोणें ॥ 7-250॥
हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा ।
आणि न पाहतांही आपैसा । पाहणेंचि हा ॥ 7-251॥
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये ।
अनुभव न लाहे । आंगी मिरौ ॥ 7-252॥
म्हणोनी ययातें येणें । ये परीचें पाहणें ।
पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ 7-253॥
किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे ।
न चेतुचि चेऊं बैसे । तयासि तो ॥ 7-254॥
स्वयें दर्शनाचिया सवा । अवघीयाची जातसे फावां ।
परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ 7-255॥
न पाहतां आरिसा असो पाहे । तरी तेंचि पाहणें होये ।
आणि पाहणेन तरी जाये । न पाहणें पाहणें ॥ 7-256॥
भलतैसा फांके । परी एकपणा न मुके ।
नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥ 7-257॥
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ।
मग प्रकाशाची कथा । आइकता का ? ॥ 7-258॥
अंधारु कां उजिवडु । हा एकला एकवडु ।
जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ 7-259॥
तैसा आवडतिये भूमिके । आरूढलीयाही कौतुकें ।
परि ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ 7-260॥
सिंधूची सींव न मोडे । पाणीपणा सळु न पडे ।
जरी मोडुतु कां गाडे । तरंगांची ॥ 7-261॥
रश्मी सूर्याची आथी । परी बिंबा बहेरी जाती ।
म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥ 7-262॥
आणि पल्हेचा दोडा । न पडतां तढा ।
जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥ 7-263॥
सोनयाचा रवा । रवेपणाचा ठेवा ।
आवघेयाचि अवयवा । लेणें नोहे ॥ 7-264॥
न फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो ।
न ये मा पावों । उपमा काई ? ॥ 7-265॥
म्हणौनि इये आत्मलीळे । नाहीं आन कांटाळें ।
आतां येयाचिये तुळे । हाचि यया ॥ 7-266॥
स्वप्रकाशाचा घांसीं । जेवितां बहु वेगेंसी ।
वेंचेना परी कुशीं । वाखही न पडे ॥ 7-267॥
ऐसा निरुपमा परी । आपुलिये विलासवरी ।
आत्मा राणीव करी । आपुला ठाईं ॥ 7-268॥
तयातें म्हणिपें अज्ञान । तरी न्याया भरलें रान ।
आतां म्हणे तयाचें वचन । उपसावों आम्ही ॥ 7-269॥
प्रकाशितें अज्ञान । ऐसें म्हणणें हन ।
तरी निधि दावितें अंजन । न म्हणिजे काई ? ॥ 7-270॥
सुवर्णगौर अंबिका । न म्हणिजे कय काळिका ? ।
तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥ 7-271॥
येर्क्ष्हवीं शिवोनि पृथ्वीवरी । तत्त्वाच्या वाणेपरी ।
जयाचा रश्मिकरीं । उजाळा येती ॥ 7-272॥
जेणें ज्ञान सज्ञान होये । दृण्मात्र दृष्टीतें विये ।
प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासी ॥ 7-273॥
तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें ।
ना तमें सूर्या मोटे । बांधितां निकें ॥ 7-274॥
`अ` पूर्वी ज्ञानाक्षरी । वसतां अज्ञानाची थोरी ।
शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ? ॥ 7-275॥
लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ? ।
आंतु बाहेरी सरिसें । करूनि घाली ॥ 7-276॥
म्हणोनि जग ज्ञानें स्फितें । बोलतां अज्ञानवादातें ।
विखुरली होती आतें । वाचेचिये ॥ 7-277॥
अखरीं तंव गोवधु । पुढारां अनृतवादु ।
मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ? ॥ 7-278॥
आणि अज्ञान म्हणणें । स्फुरत्से अर्थपणें ।
आतां हेंचि ज्ञान कोणे । मानिजे ना ? ॥ 7-279॥
असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें ।
आपणचि देखिजे । बहुये परी ॥ 7-280॥
निर्वचितां जें झावळे । तेंचि कीं लाहे डोळे ? ।
डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥ 7-281॥
ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणें मी वियें ।
येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥ 7-282॥
तंव अज्ञान त्रिशुद्धी नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई ।
जे धर्म धर्मित्वें केंहीं । ज्ञानाज्ञान असे ? ॥ 7-283॥
काजळां मोतीं वियें ? । राखोंडिया दीपु जिये ? ।
तरी ज्ञान धर्मु होये । अज्ञानाचा ॥ 7-284॥
चंद्रमा निगती ज्वाळा ? । आकाश आते शिळा ? ।
तरी अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥ 7-285॥
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट ।
परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ 7-286॥
ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें ।
पुढती ज्ञान एकलें । अज्ञान नाहीं ॥ 7-287॥
म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा ।
ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपू ॥ 7-288॥
प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वंचे घेईं चुकी ।
म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ 7-289॥
विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा ।
श्रुति काय वायसा । ढेंकर देती ॥ 7-290॥
यालागीं वस्तुप्रभा । वस्तूचि पावे शोभा ।
जात असे लाभा । वस्तुचिया ॥ 7-291॥
वांचून वस्तु यया । आपणपें प्रकाशावया ।
अज्ञान हेतु वांया । अवघेंचि ॥ 7-292॥
म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोणे परी न लाहों ।
अज्ञान कीर वावो । पाहों ठेलियाही ॥ 7-293॥
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा ।
रात्रीचिया घरा । गेलियाही ॥ 7-294॥
कां नीद खोळे भरिता । जागणें ही न ये हाता ।
येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ 7-295॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे अज्ञानखंडन नाम सप्तम प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 8
प्रकरण आठवें
ज्ञानखण्डन
तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ 8-1॥
परी आम्हा आम्ही आहों । तें कैसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥ 8-2॥
हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥ 8-3॥
अहो आत्मपणीं न संठो । स्वसंविति न घसवटो ।
आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥ 8-4॥
आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥ 8-5॥
आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो ।
तैं आमुतें न देखों । आम्हीपणा ॥ 8-6॥
प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलाहो ।
परी कैसेनिही विपावो । असणेयाचा ॥ 8-7॥
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ 8-8॥
तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडु कासया ।
केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ॥ 8-9॥
अज्ञानाचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥ 8-10॥
राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांचुनि सूर्यासवें । शिणणें होये ॥ 8-11॥
म्हणोनि अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ 8-12॥
येर्क्ष्हवीं तर्क्ष्ही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लाविलीं ॥ 8-13॥
जैसीं दंपत्तें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें ।
तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ 8-14॥
कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये ।
दिठी आंधारें पाहे । तैं तेचि वृथा ॥ 8-15॥
तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे ।
आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥ 8-16॥
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ 8-17॥
आणि जाणे तोचि नेणें । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असेणे जिणें । ज्ञाना अज्ञाना ? ॥ 8-18॥
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ 8-19॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 9
प्रकरण नववें
जीवन्मुक्तदशाकथन
आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठले । लोचनेसी ॥ 9-1॥
आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें ।
कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ 9-2॥
जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ 9-3॥
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर ।
जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ 9-4॥
दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा ।
घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ 9-5॥
चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ ।
रस झाले सकळ । रसनावंत ॥ 9-6॥
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ 9-7॥
सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी ।
पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ 9-8॥
तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी ।
अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ 9-9॥
म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे ।
सैंघ घेती धांवे । समोरही ॥ 9-10॥
परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे ।
तैसे झाले धांवे । वृत्तीचिया ॥ 9-11॥
नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण ।
घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ 9-12॥
वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ ।
तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ 9-13॥
हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु ।
जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ 9-14॥
तर्ही परिमळा परौतें । मिरवणें नाहीं कापुरातें ।
तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ 9-15॥
म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात ।
घ्यावया जेथ । उजू होती ॥ 9-16॥
तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे ।
मग असतचि आहे । संबंधु ना ॥ 9-17॥
जिये पेरीं दिसती उसीं । तिये लाभती कीं रसीं ।
कांति जेवीं शशीं । पुनवेचिया ॥ 9-18॥
पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं जालें वरषणें ।
विषयां करणें । भेटती तैशीं ॥ 9-19॥
म्हणोन तोंडा आड पडे । तेंहि वाचा वावडे ।
परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ 9-20॥
व्यापाराचे गाडे । मोडतांहि आपाडे ।
अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥ 9-21॥
पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें ।
परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥ 9-22॥
तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया ।
शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥ 9-23॥
स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा ।
उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ 9-24॥
तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? ।
तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ 9-25॥
चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ।
विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ 9-26॥
प्रत्याहारादि आंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं ।
तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ 9-27॥
येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी बाधावणें ।
आतां प्रत्यण्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ 9-28॥
द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ 9-29॥
कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा ।
झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ 9-30॥
घरामाजीं पायें । चालतां मार्गूही तोचि होये ।
ना बैसे तर्क्ष्ही आहे । पावणेंचि ॥ 9-31॥
तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ।
ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ 9-32॥
आठवू आणि विसरू । तयातेंही घेऊं नेदी पसरु ।
दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ 9-33॥
जाली स्वेच्छाचि विधि । स्वैर जाली समाधी ।
दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ 9-34॥
जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ 9-35॥
भलतेउतेनि देवें । भलतेन भक्त होआवें ।
बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ 9-36॥
देवाचिया दाटणी । देऊळा जाली आटणी ।
देशकाळादि वाहाणीं । येईचिना ॥ 9-37॥
देवीं देवोचि न माये । मा देवी कें अन्वयो आहे ? ।
येथ परिवारु बहुये । अघडता कीं ॥ 9-38॥
ऐसाहि स्वामीभृत्यसंबंधा- । लागीं उठलीं श्रद्धा ।
तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ 9-39॥
अवघियाचि उपचारा । जपध्यान निर्धारा ।
नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ 9-40॥
आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें ।
अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ 9-41॥
पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया ।
परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥ 9-42॥
देव देऊळ परिवारू । कीजे कोरूनि डोंगरु ।
तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥ 9-43॥
अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे ।
केलें देवपण तैसें । दोहींपरी ॥ 9-44॥
अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां ।
मा अखतीं काय आतां । पुजो जावो ॥ 9-45॥
दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी ।
हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥ 9-46॥
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं ले कां ।
तर्क्ष्ही तो असिका । तियाचि कीं ना ॥ 9-47॥
आगीपण आगी । असतचि असे आंगीं ।
मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥ 9-48॥
म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां काय नव्हे ? ।
ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवूचि असे ॥ 9-49॥
अतां भक्ति अभक्ति । जालें ताट एकी पांती ।
कर्माकर्माचिया वाती । माल्हावूनियां ॥ 9-50॥
म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ 9-51॥
ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती ।
मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ 9-52॥
घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होत जाय ।
शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ 9-53॥
चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ।
नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ 9-54॥
येर्क्ष्हवीं आडोळिलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।
भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ 9-55॥
ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं ।
देवा भक्ता दोही । एकचि पाडू ॥ 9-56॥
आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे ।
तेणें उंदळता दाटे । आपणपांचि ॥ 9-57॥
ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं ।
तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥ 9-58॥
कर्माचा हातु न लगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे ।
ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥ 9-59॥
निफजे ना निमे । आंगें आंग घुमे ।
सुखा सुख उपमे । देववेल इया ॥ 9-60॥
कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म ।
योगज्ञानादिविश्राम । भूमिका हे ॥ 9-61॥
आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले ।
होते तेही आटले । हरिहर येथें ॥ 9-62॥
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।
ग्रहण जालें एकसरें । सर्वग्रासें ॥ 9-63॥
वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी ।
टाकली निदैजौनी । परा येथें ॥ 9-64॥
शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि ।
घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥ 9-65॥
चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें ।
आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ 9-66॥
आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें ।
हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ 9-67॥
कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी ।
कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ 9-68॥
गुरुत्वें जेवढा चांगू । तेवढाचि तारूनि लघू ।
गुरु लघु जाणे जो पांगू । तुझा करी ॥ 9-69॥
शिष्या देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे ।
तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ 9-70॥
किंबहुना ये दातारा । मी तूं याचा संसारा ।
वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ 9-71॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 10
प्रकरण दहावें
ग्रंथपरिहार
परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तुया ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ 10-1॥
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सूति ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ 10-2॥
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि काई येतुलें ।
कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागू ॥ 10-3॥
दिवा जो उजेडू । तो घराचाची सुरवाडू ।
गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ 10-4॥
अगाधें ही उचंबळती । ते चंद्रीची ना शक्ती ? ।
वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ 10-5॥
म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य ।
वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥ 10-6॥
आणि हा येवढा ऐसा । परिहारु देऊं कायसा ।
प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥ 10-7॥
आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रगटची असे ठाईं ।
मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥ 10-8॥
नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ।
तरी काय जनीं जन । दिसते ना ? ॥ 10-9॥
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां ।
कोण्ही नहोनि आइता । सिद्धांतचि हा ॥ 10-10॥
यया परौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं ।
आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ 10-11॥
तर्क्ष्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो ।
तर्ही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ 10-12॥
पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची ।
म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ 10-13॥
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलोनियां ।
ऐसें नाहीं आपसया । प्रकाशूचि ॥ 10-14॥
आणि पूर्णाहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों ।
मा लोपलों ना प्रगटलों । कोण्ही होऊनी । 10-15॥
आपणया आपणपें । निरूपण काय वोपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥ 10-16॥
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंही मौन करी ।
हे पाणियावरी मकरी । रेखिलीयां ॥ 10-17॥
एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ।
देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ 10-18॥
ज्ञानदेव म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत ।
सेंवूनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ 10-19॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ ।
परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥ 10-20॥
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे ।
हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ 10-21॥
प्रिया सावायिली होये । तै आंगीचे आंगीं न समाये ।
येर्क्ष्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ 10-22॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला ।
गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ 10-23॥
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ 10-24॥
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद ।
अनुभवामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ 10-25॥
गंगावगहना आली । पाणीयें गंगा झालीं ।
कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ 10-26॥
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी ।
मग पंधरावियाच्या पटीं । बैसावें कीं ॥ 10-27॥
तैसें जें या अक्षरा । भेटती गाभारां ।
ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ 10-28॥
जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ 10-29॥
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी ।
किंबहुना सरोभरीं । श्रीशिवेंशीचि ॥ 10-30॥
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें । विश्वाचेनि ॥ 10-31॥
॥ इति अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं
संपूर्णम्॥
पद 1
प्रकरण पहिले
शिवशक्तिसमावेशन
यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् ।
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ 1॥
पद 2
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी ।
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ 2॥
पद 3
सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ।
ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ 3॥
पद 4
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् ।
तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ 4॥
पद 5
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ 5॥
प्रकरण 1
प्रकरण 1 पद 1
ऐशी ही निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ 1-1॥
प्रकरण 1 पद 2
जो प्रीयुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एकाहारी । एकाआंगाची ॥ 1-2॥
प्रकरण 1 पद 3
आवडीचेनि वेगें । एकएकातें गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाति ॥ 1-3॥
प्रकरण 1 पद 4
जि एकचि नव्हे एकसरें । दोघा दोपण नाहीं पुरें ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ 1-4॥
प्रकरण 1 पद 5
कैशी स्वसुखाची अळुकी । जे दोनीपण मिळोनि एकीं ।
नेदितीच कवतुकीं । एकपण फुटों ॥ 1-5॥
प्रकरण 1 पद 6
हा ठावोवरी वियोगभेडे । जें बाळ जगायेवढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ 1-6॥
प्रकरण 1 पद 7
आपुलिये आंगीं संसारा । देखलिया चराचरा ।
परी नेदितीच तिसरा । झोक लागों ॥ 1-7॥
प्रकरण 1 पद 8
जया एके सत्तेचें बैसणें । दोघां एका प्रकाशाचें लेणें ।
जें अनादि एकपणें । नांदती दोघें ॥ 1-8॥
प्रकरण 1 पद 9
भेदु लाजौनि आवडी । एकरसीं देत बुडी ।
जो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथें ॥ 1- 9॥
प्रकरण 1 पद 10
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहींना तो गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकएकांची ॥ 1-10॥
प्रकरण 1 पद 11
कैसा मेळु आला गोडिये । दोघे न माती जगीं इये ।
कीं परमाणूहि माजी उवाये । मांडिलीं आहाती ॥ 1-11॥
प्रकरण 1 पद 12
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ।
जिये दोघे जीवप्राण । जिया दोघा ॥ 1-12॥
प्रकरण 1 पद 13
घरवातें मोटकी दोघे । जैं गोसावी सेजे रिघे ।
तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ 1-13॥
प्रकरण 1 पद 14
जया दोघांमाजीं एकादें । विपायें उमजलें होय निदे ।
तरी घरवात गिळुनी नुसधें । कांहीं ना कीं ॥ 1-14॥
प्रकरण 1 पद 15
दोन्ही आंगांची आटणी । गिंवसीत आहाती एकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाधी जियें ॥ 1-15॥
प्रकरण 1 पद 16
विषो एकमेकांची जिये । जिये एकमेकांची विषयी इयें ।
जिहीं दोघीं सुखियें । जिये दोघे ॥ 1-16॥
प्रकरण 1 पद 17
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण एकलें नांदे ।
जग सकळ अधाधे- । पणें जिहीं ॥ 1-17॥
प्रकरण 1 पद 18
दो दांडीं एक श्रुती । दोहों फुलीं एक दृति ।
दोहों दिवीं दीप्ती । एकीची जेवीं ॥ 1-18॥
प्रकरण 1 पद 19
दो ओठीं एकी गोष्टी । दो डोळां येकी दृष्टी ।
तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । एकीचि जेवीं ॥ 1-19॥
प्रकरण 1 पद 20
दाऊनि दोनीपण । एकरसाचें आरोगण ।
करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ 1-20॥
प्रकरण 1 पद 21
जे स्वामीचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता ।
जियेवीण सर्वकर्ता । कांही ना जो ॥ 1-21॥
प्रकरण 1 पद 22
जे कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें असणें ।
नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ 1-22॥
प्रकरण 1 पद 23
गोडी आणि गुळु । कापुर आणि परिमळु ।
निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ 1-23॥
प्रकरण 1 पद 24
समग्र दीप्ती घेतां । जेवि दीपचि ये हाता ।
तेवी जियेचिया तत्त्वता । शिवूचि लाभे ॥ 1-24॥
प्रकरण 1 पद 25
जैशी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा ।
तैशी भेद गिळित शोभा । एकचि जे ॥ 1-25॥
प्रकरण 1 पद 26
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ 1-26॥
प्रकरण 1 पद 27
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्त विशेषु । शक्ती जाली ॥ 1-27॥
प्रकरण 1 पद 28
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींहि शिवपण ।
थारो न शके ते आपण । शिवे घडली ॥ 1-28॥
प्रकरण 1 पद 29
ऐश्वर्येशी ईश्वर । जियेचें अंग संसारा ।
आपण होऊनी उभारा । आपणचि जे ॥ 1-29॥
प्रकरण 1 पद 30
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि अंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥ 1-30॥
प्रकरण 1 पद 31
ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा ।
जिये सदैवोचिया लिळा । दाखविला ॥ 1-31॥
प्रकरण 1 पद 32
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ 1-32॥
प्रकरण 1 पद 33
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्टत्वाचिया क्षोभा ।
जियेतें न देखतुचि उभा ॥ आंगचि सांडी ॥ 1-33॥
प्रकरण 1 पद 34
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेवढा ।
अंगविला उघडा । जियेवीण ॥ 1-34॥
प्रकरण 1 पद 35
जो हा ठाव मंदरूपें । उवाइलेपणें हारपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥ 1-35॥
प्रकरण 1 पद 36
जिया चेवविला शीवु । वेद्याचे बोणें बहु ।
वाढीतेणेंसि जेउ । धाला जो ॥ 1-36॥
प्रकरण 1 पद 37
निदेलेनि भातारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसावला नुरे । आंबुलेपणही ॥ 1-37॥
प्रकरण 1 पद 38
जंव कांत लपो बैसें । तंव नेणिजे जियोद्देशें ।
जिये दोघे आरिसे । जिया दोघा ॥ 1-38॥
प्रकरण 1 पद 39
जियेचेनि अंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ 1-39॥
प्रकरण 1 पद 40
जया प्रियेचें जें आंग । जो प्रियु जियेचें चांग ।
कालवूनि दोन्ही भाग । जेविते आहाति ॥ 1-40॥
प्रकरण 1 पद 41
जैशि कां समीरेसकट गति । कां सोनियासकट कांती ।
तैसे शिवेशी शक्ति । अवघीच जे ॥ 1-41॥
प्रकरण 1 पद 42
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तीशी केवळु । श्रीशिवूचि जो ॥ 1-42॥
प्रकरण 1 पद 43
राति आणि दिवो । पातली सूर्याचा ठावो ।
तैसा आपुलिया साचीं वावो । दोघे जिये ॥ 1-43॥
प्रकरण 1 पद 44
किंबहुना तिये । प्रणवाक्षरीं विरुढतिये ।
दशेचीही वैरिये । शिवशक्ति ॥ 1-44॥
प्रकरण 1 पद 45
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळित एकार्थाचा उजिरा ।
नमो तया शिववोहरा । ज्ञानदेवो म्हणे ॥ 1-45॥
प्रकरण 1 पद 46
जयाच्या दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।
आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ 1-46॥
प्रकरण 1 पद 46
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।
सिंधूशीं प्रलयनिरीं । गंगा जैशी ॥ 1-46॥
पद 47
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनी गेलीं दोनी ।
अघवीयाचिं रजनी । दिठीच जे ॥ 47॥
प्रकरण 1
प्रकरण 1 पद 48
वायु चळबळेंशीं । जिराला व्योमाचिये कुशीं ।
अटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ 1-48॥
प्रकरण 1 पद 49
तेवीं निहाळितां ययातें । गेले पाहणेंनशी पाहते ।
पुढती घरौतें वरौतें । वंदिलीं तियें ॥ 1-49॥
प्रकरण 1 पद 50
जयाच्या वाहणीं । वेदकु वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचीही करी ॥ 1-50॥
प्रकरण 1 पद 51
तेथ मी नमस्करा- । लागीं उरों दुसरा ।
तरी लिंगभेद पर्क्ष्हा । जोडूं जावों ॥ 1-51॥
प्रकरण 1 पद 52
परि सोनेनसी दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ 1-52॥
प्रकरण 1 पद 53
सांगतां वाचेतें वाचा । ठावो वाच्यवाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ॥ 1-53॥
प्रकरण 1 पद 54
सिंधु आणि गंगेची मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ 1-54॥
प्रकरण 1 पद 55
पाहें पा भास्य भासकता । आपुलां ठाई दाविता ।
एकपण काय सविता । मोडीतसे ? ॥ 1-55॥
प्रकरण 1 पद 56
चांदाचिया दोंदावरी । होता चांदणियाची विखुरी ।
काय उणें दीप्तीवरी । गिंवसो पा दीपु ॥ 1-56॥
प्रकरण 1 पद 57
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ।
अगळें निर्मळ । रूपा ये कीं ? ॥ 1-57॥
प्रकरण 1 पद 58
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवू काय केला चिरटिया ? ।
कीं 'णकार' ती रेघटिया । भेदवला काई ? ॥ 1-58॥
प्रकरण 1 पद 59
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ 1-59॥
प्रकरण 1 पद 60
म्हणोनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करोनि सिनानीं ।
मी निघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ 1-60॥
प्रकरण 1 पद 61
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।
कां बुडी दीजे तरंगें । वायूचा ठेला ॥ 1-61॥
प्रकरण 1 पद 62
नातरी नीदजात खेवो । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवी देवो । वंदिली मिया ॥ 1-62॥
प्रकरण 1 पद 63
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेवी अहं देऊनि मी शंभु । शांभवी झालों ॥ 1-63॥
प्रकरण 1 पद 64
शिवशक्ति समावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशे । रिघाला जैसा । 1-64॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनमन नाम प्रथमं
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 2
प्रकरण 2 पद 1
प्रकरण दुसरें
श्रीगुरुस्तवन
आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ 2-1॥
प्रकरण 2 पद 3
मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरू ।
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदू ॥ 2-3॥
प्रकरण 2 पद 3
अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।
तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो की ॥ 2-3॥
प्रकरण 2 पद 4
जयाचेनि आपांगपातें । बद्ध मोक्षपणीं आते ।
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ 2-4॥
प्रकरण 2 पद 5
कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ 2-5॥
प्रकरण 2 पद 6
सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।
आत्मा आत्मसुख देखे । आरसां जिये ॥ 2-6॥
प्रकरण 2 पद 7
बोधचंद्राचिया कळा । विखुरल्या एकवळा ।
कृपापुनीव लीळा । करी जयाची ॥ 2-7॥
प्रकरण 2 पद 8
जो भेटलियाचि सवे । पुरति उपायाचे धांवे ।
प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ 2-8॥
प्रकरण 2 पद 9
जयाचेनि अनवसरें । द्रष्टा ले दृश्याचें मोहिरें ।
जो भेटतखेव सरे । बहुरुपचि हें ॥ 2-9॥
प्रकरण 2 पद 10
अविद्येचें काळवखें । कीं स्वबोधसुदिनीं फांके ।
सीतलें प्रसादार्कें । जयाचेनि ॥ 2-10॥
प्रकरण 2 पद 11
जयाचेनि कृपासलिलें । जीवू हा ठाववरी पाखाळे ।
जे शिवपणही वोविळें । अंगी न लवी ॥ 2-11॥
प्रकरण 2 पद 12
राखों जातां शिष्यातें । गुरुपणही धाडिलें थितें ।
तरी गुरूगौरव जयातें । सांडीचिना ॥ 2-12॥
प्रकरण 2 पद 13
एकपण नव्हे सुसास । म्हणूनि गुरु-शिष्याचे करुनि मिस ।
पाहणेचि आपली वास । पाहतचि असे ॥ 2-13॥
प्रकरण 2 पद 14
जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें ।
परिणमे अपारें । बोधामृतें ॥ 2-14॥
प्रकरण 2 पद 15
वेद्या देतां मिठी । वेदकूही सुये पोटीं ।
तर्क्ष्ही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ 2-15॥
प्रकरण 2 पद 16
जयाचेनि सावायें । जीवू ब्रह्मौपर लाहे ।
ब्रह्म तृणातळीं जाये । उदासें जेणें ॥ 2-16॥
प्रकरण 2 पद 17
उपास्तीवरी राबतिया । उपायफळीं येती मोडूनिया ।
वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा का ॥ 2-17॥
प्रकरण 2 पद 18
जयाचा दिठिवा वसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु ।
तंव आपुलिये फळीं हातु । न घेपती ही ॥ 2-18॥
प्रकरण 2 पद 19
पुढें दृष्टीचेनि आलगें । खोची की निवटे मागें ।
येवढेया जैता नेघे । आपणपें जो ॥ 2-19॥
प्रकरण 2 पद 20
लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले ।
नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ 2-20॥
प्रकरण 2 पद 21
नाहीं तें जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे ।
जेणें तारिलियाहि नुरिजे । कवणी ठायीं ॥ 2-21॥
प्रकरण 2 पद 22
आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव ।
ऐसें कोणी एक भरीव । आकाश जो ॥ 2-22॥
प्रकरण 2 पद 23
चंद्रादि सुशीतळें । घडली जयाचेनि मेळें ।
सूर्य जयाचेनि उजाळे । कडवसेनी ॥ 2-23॥
प्रकरण 2 पद 24
जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलीये दशे ।
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ 2-24॥
प्रकरण 2 पद 25
चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें ।
तर्क्ष्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ 2-25॥
प्रकरण 2 पद 26
जो उघड कीं न दिसे । प्रकाश की न प्रकाशे ।
असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ 2-26॥
प्रकरण 2 पद 27
आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळवूं अनुमानाची मांदी ।
हा प्रमाणाही वो नेदी । कोणाही मा ॥ 2-27॥
प्रकरण 2 पद 28
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंशीं चावळों बैसे ।
दुजयाच्या रागीं रुसे । एकपणा जो ॥ 2-28॥
प्रकरण 2 पद 29
प्रमाणाची परी सरे । तैं प्रमेयेची आविष्करे ।
नवल मेचु ये धुरे । नाहींपणाची ॥ 2-29॥
प्रकरण 2 पद 30
कांहीबाही अळुमाळु । देखिजे येखादे वेळू ।
तरी देखे तेंही विटाळू । जयां गांवीं ॥ 2-30॥
प्रकरण 2 पद 31
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें ।
आंगीं लावुनि नाडिलें । नांवचि येणें ॥ 2-31॥
प्रकरण 2 पद 32
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां के निवृत्ती ? ।
या नामाचि वाय बुंथी । सांडीचिना ॥ 2-32॥
प्रकरण 2 पद 33
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? ।
तरि कैशी बैसे ठाईं । निवृत्तिनामाच्या ? ॥ 2-33॥
प्रकरण 2 पद 34
परी सूर्यासी अंधकारु । कै जाहला होता गोचरू ? ।
तरी तमारी हा डगरू । आलाचि कीं ॥ 2-34॥
प्रकरण 2 पद 35
तैसें लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे ।
न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ 2-35॥
प्रकरण 2 पद 36
हां गा मायावशें दाविशी । तें मायिक म्हणूनी वाळिशी ।
अमायिक तंव नव्हशी । कवणाहि विषयो ॥ 2-36॥
प्रकरण 2 पद 37
शिव शिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? ।
एकाही निर्धार करूं । देतासी कां ? ॥ 2-37॥
प्रकरण 2 पद 38
नामें रूपें बहुवसें । उभारुनि पाडिलीं वोसें ।
सत्तेचेनि आवेशे । तोषलासी ना ? ॥ 2-38॥
प्रकरण 2 पद 39
जिवु घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें ।
मृत्यु उरे स्वामीपणें । तेंही नव्हे ॥ 2-39॥
प्रकरण 2 पद 40
विशेषाचेनि नांवें । आत्मत्वही न साहवे ।
किंबहुना नव्हे । कोण्ही या ॥ 2-40॥
प्रकरण 2 पद 41
राती नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।
नुरेचि जेवि चेइलिया । नीद जैशी ॥ 2-41॥
प्रकरण 2 पद 42
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ 2-42॥
प्रकरण 2 पद 43
याच्या हाता पाया पडे । तंव वंद्यत्वें पुढें न मंडे ।
न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ 2-43॥
प्रकरण 2 पद 44
आपणाप्रति रवि । उदो न करी जेवीं ।
हा वंद्य नव्हें तेवी । वंदनासी ॥ 2-44॥
प्रकरण 2 पद 45
कां समोरपण आपुलें । न लाहिजे कांहीं केलें ।
तैसें वंद्यत्व घातलें । हिरोनी येणें ॥ 2-45॥
प्रकरण 2 पद 46
आकाशाचा अरिसा । नुठी प्रतिबिंबाचा ठसा ।
हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासि ॥ 2-46॥
प्रकरण 2 पद 47
परी नव्हे तरी न हो । हे वेखासि कां घेवों ।
परी वंदीतयाही ठावो । उरों नेदी ॥ 2-47॥
प्रकरण 2 पद 48
आंगौनि एकुणा झोलु । फेडितांचि तरी तो बाहिरीलु ।
कडु फिटे आतुलु । न फेडीतांचि ॥ 2-48॥
प्रकरण 2 पद 49
नाना बिंबपणासरिसे । घेउनि प्रतिबिंब नासे ।
नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदतेनसी ॥ 2-49॥
प्रकरण 2 पद 50
नाहीं रूपाची जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींच नव्हे ।
आम्हा फळले हे पाये । ऐशिया दशा ॥ 2-50॥
प्रकरण 2 पद 51
गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका ।
ते कां होईल पुळिका । कापुराचिया ॥ 2-51॥
प्रकरण 2 पद 52
तया दोहो परस्परें । होय ना जंव मैल्हेरे ।
तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ 2-52॥
प्रकरण 2 पद 53
तेवि देखेना मी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें ।
चेइलिया कांते । स्वप्नींचि जेवी ॥ 2-53॥
प्रकरण 2 पद 54
किंबहुना इया भाषा । द्वैताचा जेथें उपखा ।
फेडुनियां स्वसखा । श्रीगुरू वंदिला ॥ 2-54॥
प्रकरण 2 पद 55
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपणा रूप नाहीं ।
आणि गुरु-शिष्य दुवाळीही । पवाडु केला ॥ 2-55॥
प्रकरण 2 पद 56
कैसा आपणया आपण । दोंवीण सोयरेपण ।
हा याहूनि विलक्षण । नाहीं ना नोहे ॥ 2-56॥
प्रकरण 2 पद 57
जग अवघें पोटीं माये । गगनायेवढें होऊनि ठाये ।
कीं तेचि निसी साहे । नाहींपणाची ॥ 2-57॥
प्रकरण 2 पद 58
कां पूर्णते तरि आधारू । सिंधु जैसा दुर्भरू ।
तैसा विरुद्धा पाहुणेरू । याच्या घरीं ॥ 2-58॥
प्रकरण 2 पद 59
तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परी सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ 2-59॥
प्रकरण 2 पद 60
एक म्हणतां भेदे । ते कीं नानात्वें नांदे ? ।
विरुद्धे आपणया विरुद्धे । होती काई ? ॥ 2-60॥
प्रकरण 2 पद 61
म्हणोनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ 2-61॥
प्रकरण 2 पद 62
कां सुवर्ण आणि लेणें । वसतें एकें सुवर्णें ।
वसते चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ 2-62॥
प्रकरण 2 पद 63
नाना कापुर आणि परिमळु । कापूरचि केवळु ।
गोडी आणि गुळु । गूळचि जेवीं ॥ 2-63॥
प्रकरण 2 पद 64
तैसा गुरुशिष्यमिसें । हाचि एकु उल्हासे ।
जरी कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ 2-64॥
प्रकरण 2 पद 65
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।
हे आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ 2-65॥
प्रकरण 2 पद 66
पहा पा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद एकला ।
परी चेता चेवविता जाला । दोनी तोचि ॥ 2-66॥
प्रकरण 2 पद 67
ते तोचि चेता तोचि चेतवी । तेवी हाचि बुझे हाचि बुझावी ।
गुरु-शिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ 2-67॥
प्रकरण 2 पद 68
दर्पणेंवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगितो तरी लीळा । सांगतों हें ॥ 2-68॥
प्रकरण 2 पद 69
एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्याशी विसकुसो ।
सोइरिकीचा अतिसो । पोखीतसे ॥ 2-69॥
प्रकरण 2 पद 70
निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।
जया निवृत्तीचि राणीव । निवृत्तिची ॥ 2-70॥
प्रकरण 2 पद 71
वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें ।
आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ 2-71॥
प्रकरण 2 पद 72
आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति ।
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ 2-72॥
प्रकरण 2 पद 73
वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ ।
तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ 2-73॥
प्रकरण 2 पद 74
गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ।
तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ 2-74॥
प्रकरण 2 पद 75
तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।
घेयावया फूलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ 2-75॥
प्रकरण 2 पद 76
दिठी मुखाचिये बरवे । पाठीकडूनि जैं पावे ।
तैं आरिसे धांडोळावे । लागती काई ? ॥ 2-76॥
प्रकरण 2 पद 77
कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ 2-77॥
प्रकरण 2 पद 78
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधूनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ 2-78॥
प्रकरण 2 पद 79
ऐसें करणयावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ 2-79॥
प्रकरण 2 पद 80
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरुप्रणामें येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ 2-80॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे सद्गुरुस्तवननाम द्वितीय प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 3
प्रकरण 3 पद 1
प्रकरण तिसरें
वाचाऋणोत्तीर्ण
ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।
पूर्ण तर्क्ष्ही ऋण न फिटे । जे चेणेंचि नीद कीं ॥ 3-1॥
प्रकरण 3 पद 2
येर्क्ष्हवीं परादिका चौघी । जीव मोक्षाच्या उपेगी ।
अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ 3-2॥
प्रकरण 3 पद 3
देहासवे हातपाये । जाती मनासवें इंद्रियें ।
कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ 3-3॥
प्रकरण 3 पद 4
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।
तेवीं अविद्येचे संबंधी । अटती इया ॥ 3-4॥
प्रकरण 3 पद 5
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।
जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ 3-5॥
प्रकरण 3 पद 6
लवण आंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।
नीद मरोनि जागरें । जीइये निदे ॥ 3-6॥
प्रकरण 3 पद 7
तेवि अविद्येसवें । चौघीं वेचिती जीवें ।
तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि इया ॥ 3-7॥
प्रकरण 3 पद 8
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।
तरी हाही शीण लेवा । बोधरूपेंची ॥ 3-8॥
प्रकरण 3 पद 9
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।
दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ 3-9॥
प्रकरण 3 पद 10
जिती अविद्या ऐशी । अन्यथा बोधातें गिंवशी ।
तेचि यथाबोधेंसी । निमाली उठी ॥ 3-10॥
प्रकरण 3 पद 11
परी जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।
बंधमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ 3-11॥
प्रकरण 3 पद 12
मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? ।
अज्ञाना घरी त्राये । वाउगी यांची ॥ 3-12॥
प्रकरण 3 पद 13
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ 3-13॥
प्रकरण 3 पद 14
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।
मानितसे तें जाण । म्हणो ये कीं ॥ 3-14॥
प्रकरण 3 पद 15
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? ।
परी मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ 3-15॥
प्रकरण 3 पद 16
आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितलें असे । सदाशिवें ॥ 3-16॥
प्रकरण 3 पद 17
आणि वैकुंठींचेनिहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।
बांधिजे हें निरोपण । बहु केलें ॥ 3-17॥
प्रकरण 3 पद 18
परी शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।
मानूं तें हें लाभे । न बोलतांही ॥ 3-18॥
प्रकरण 3 पद 19
जें आत्मज्ञान निखळ । तेंही घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोहे ? ॥ 3-19॥
प्रकरण 3 पद 20
ज्ञानें श्लाघतु आहे । तैं ज्ञानपण धाडिलें वाये ।
दीप वांचोनि दिवा लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ 3-20॥
प्रकरण 3 पद 21
आपणपें आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।
आपणपें गिंवशी । हें कीरू होये ? ॥ 3-21॥
प्रकरण 3 पद 22
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ 3-22॥
प्रकरण 3 पद 23
तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि आपली प्रमा ।
करितसे सोहमा । ऐसा बंधु ॥ 3-23॥
प्रकरण 3 पद 24
जें ज्ञान स्वये बुडे । म्हणोनी भारी नावडे ।
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ 3-24॥
प्रकरण 3 पद 25
म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ आंगाचा ।
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ 3-25॥
प्रकरण 3 पद 26
आंगाचेनि इंधने उदासु । उठोनि ज्ञानाग्नी प्रवेशु ।
करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ 3-26॥
प्रकरण 3 पद 27
आंगीं लाविलिया विभूति । तैं परमाणूही झडती ।
परि पांडुरत्वें कांती । राहे जैशी ॥ 3-27॥
प्रकरण 3 पद 28
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।
परी होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ 3-28॥
प्रकरण 3 पद 29
ना वोहळला आंगीं जैसे । पाणी पाणीपणें नसे ।
तर्क्ष्हीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ 3-29॥
प्रकरण 3 पद 30
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।
असे पायातळीं । रिगौनियां ॥ 3-30॥
प्रकरण 3 पद 31
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।
आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ 3-31॥
प्रकरण 3 पद 32
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।
तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ 3-32॥
प्रकरण 3 पद 33
म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींची ॥ 3-33॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे वाचाऋणोत्तीर्णनाम तृतीय प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 4
प्रकरण 4 पद 1
प्रकरण चवथें
ज्ञान अभेदकथन
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवी ॥ 4-1॥
प्रकरण 4 पद 2
कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला ।
मुख भोगी आपुला । आपणचि ॥ 4-2॥
प्रकरण 4 पद 3
ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ।
तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जाहलें ॥ 4-3॥
प्रकरण 4 पद 4
लावी आंत ठाउनि कोपट । तो साधी आपणया सकट ।
का बांधलेया चोरट । मोटेमाजी ॥ 4-4॥
प्रकरण 4 पद 5
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।
ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जाहलें ॥ 4-5॥
प्रकरण 4 पद 6
अज्ञानाचा टेका । नसतांही ज्ञान अधिका ।
फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ 4-6॥
प्रकरण 4 पद 7
वात दशाही ते निमालियां । येणें जें ये उवाया ।
तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ 4-7॥
प्रकरण 4 पद 8
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणें ।
कां फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ 4-8॥
प्रकरण 4 पद 9
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।
कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ 4-9॥
प्रकरण 4 पद 10
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान ।
जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ 4-10॥
प्रकरण 4 पद 11
जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळां जळां दोहींतें ।
बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ 4-11॥
प्रकरण 4 पद 12
कीं विश्वाही वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ।
तैं तेजमत निखळ । तेंचि होय ॥ 4-12॥
प्रकरण 4 पद 13
नाना नीद मारोनी । आपणपें हिरोनी ।
जागणें ठाके होउनी । जागणेंचि ॥ 4-13॥
प्रकरण 4 पद 14
तैसें अज्ञान आटोनिया । ज्ञान ये तें उवाया ।
ज्ञानाज्ञान गिळोनिया । ज्ञानचि होय ॥ 4-14॥
प्रकरण 4 पद 15
ते वेळीं पुनिवां भरे । ना आवसा सरे ।
तें चंद्रंचि उरे । सतरावी जैशी ॥ 4-15॥
प्रकरण 4 पद 16
कां तेजांतरे नाटोपे । कोणे तमें न शिंपे ।
तें उपमेचें जाउपे । सूर्यचि होय ॥ 4-16॥
प्रकरण 4 पद 17
म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।
तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जे ॥ 4-17॥
प्रकरण 4 पद 18
परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें ।
काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ 4-18॥
प्रकरण 4 पद 19
आकाश आपणपया रिघे ? । कायी आगी आपणया लागे ? ।
आपला माथा वळघें । आपण कोण्ही ? ॥ 4-19॥
प्रकरण 4 पद 20
दिठी आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? ।
नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ 4-20॥
प्रकरण 4 पद 21
सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? ।
परिमळु परिमळें । घेपत असे ? ॥ 4-21॥
प्रकरण 4 पद 22
तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।
म्हणोनी ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ 4-22॥
प्रकरण 4 पद 23
आणि ज्ञान ऐशी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।
तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ 4-23॥
प्रकरण 4 पद 24
जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।
मा तेज तरी होये । तेजासी काईं ? ॥ 4-24॥
प्रकरण 4 पद 25
तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।
आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ 4-25॥
प्रकरण 4 पद 26
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासी पां ? ॥ 4-26॥
प्रकरण 4 पद 27
शून्यसिद्धांतबोधु । कोणी सत्ता होय सिद्धु ? ।
नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ 4-27॥
प्रकरण 4 पद 28
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कवणासी पा ॥ 4-28॥
प्रकरण 4 पद 29
कीं निदेचेनि आलेपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । कोणासी पा ? ॥ 4-29॥
प्रकरण 4 पद 30
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगु आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ 4-30॥
प्रकरण 4 पद 31
म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।
नोहोनी असणेनवीण । असणें जें ॥ 4-31॥
प्रकरण 4 पद 32
परी आणिका कां आपणया । न पुरे विखो होआवया ।
म्हणोनी न असावया । कारण कीं ॥ 4-32॥
प्रकरण 4 पद 34
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाही निमाला । आठवु तया ॥ 4-33 ।
परी जीवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।
हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ 4-34॥
प्रकरण 4 पद 35
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणही मोडे ।
परी नाहीं नोहे हें फुडे । जाणेचि ते ॥ 4-35॥
प्रकरण 4 पद 36
कां काळा राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।
न चोजवे तर्क्ष्ही आसिका । हा मी बाणे ॥ 4-36॥
प्रकरण 4 पद 37
तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानूसवाणें ।
नसोनि असणें । ठायें ठावो ॥ 4-37॥
प्रकरण 4 पद 38
निर्मळपणीं आपुला । आकाशाचा संचु विराला ।
तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ 4-38॥
प्रकरण 4 पद 39
कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारतलिया पोखरणी ।
हें आणिका वांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ 4-39॥
प्रकरण 4 पद 40
आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे ।
आहे नाहीं ऐसें । सांडूनियां ॥ 4-40॥
प्रकरण 4 पद 41
निदेचें नाहींपण । निमालियाही जागेंपण ।
असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ 4-41॥
प्रकरण 4 पद 42
कां भूमी कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।
तो नेलिया म्हणिजे । तेणेंवीण ॥ 4-42॥
प्रकरण 4 पद 43
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ 4-43॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे ज्ञान अभेदकथननाम चतुर्थ
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 5
प्रकरण 5 पद 1
प्रकरण पांचवे
सच्चिदानंदपदत्रयविवरण
सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीहीं उणे लेख ।
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ 5-1॥
प्रकरण 5 पद 2
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ 5-2॥
प्रकरण 5 पद 3
उजाळ दृति मार्दव । या तिहीं तिहीं उणीव ।
हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ 5-3॥
प्रकरण 5 पद 4
आंगें कीर उजाळ । कीं उजाळताचि मवाळ ।
कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ 5-4॥
प्रकरण 5 पद 5
ऐसें एके कापूरपणीं । तिन्ही इये तिहीं उणी ।
इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ 5-5॥
प्रकरण 5 पद 6
येर्क्ष्हवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें ।
परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ 5-6॥
प्रकरण 5 पद 7
सत्ताचि कीं सुखप्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु ।
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ 5-7॥
प्रकरण 5 पद 8
शुक्लपक्षीच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।
परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ 5-8॥
प्रकरण 5 पद 9
थेंबीं पडतां उदक । थेंबां धरूं ये लेख ।
परी पडिलाठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ 5-9॥
प्रकरण 5 पद 10
तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ 5-10॥
प्रकरण 5 पद 11
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ 5-11॥
प्रकरण 5 पद 12
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें ।
लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ 5-12॥
प्रकरण 5 पद 13
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनव्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ 5-13॥
प्रकरण 5 पद 14
सूर्याचेनि प्रकाशें । जें कांहीं जड आभासें ।
तेणें तो गिवसें । सूर्यु काई ? ॥ 5-14॥
प्रकरण 5 पद 15
तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्य सुजें ।
ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ 5-15॥
प्रकरण 5 पद 16
विषो नाहीं कोणाही । जया प्रमेयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होये ॥ 5-16॥
प्रकरण 5 पद 17
प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें काई स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ 5-17॥
पद 18
एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्त्वता ।
मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ 18॥
प्रकरण 5
प्रकरण 5 पद 19
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हें शेष । विचाराचें ॥ 5-19॥
प्रकरण 5 पद 20
ऐसेनि इयें प्रसिद्धें । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ 5-20॥
प्रकरण 5 पद 21
ते वेळीं वरषोनि मेघु । समुद्र होऊनि वोघु ।
सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ 5-21॥
प्रकरण 5 पद 22
फळ विउनी फूल सुके । फळनाशे रसपाकें ।
तोही रस उपखें । तृप्तीदानीं ॥ 5-22॥
प्रकरण 5 पद 23
कां आहुति अग्नीआंतु । घालूनि वोसरे हातु ।
सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥ 5-23॥
प्रकरण 5 पद 24
नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निघोनि ।
कां निदैलें चेववुनी । चेवितें जैसें ॥ 5-24॥
प्रकरण 5 पद 25
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ 5-25॥
प्रकरण 5 पद 26
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ 5-26॥
प्रकरण 5 पद 27
मग आपुलियाकडे । मवितया से पडे ।
तैं लाजलाजों आखुडे । मविते जैसें ॥ 5-27॥
प्रकरण 5 पद 28
तैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ।
मा सत्तात्व संभवे । सत्तेसि कायि ? ॥ 5-28॥
प्रकरण 5 पद 29
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं ये ॥ 5-29॥
प्रकरण 5 पद 30
नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे तैसें जागणेंही ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं ये ? ॥ 5-30॥
प्रकरण 5 पद 31
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ 5-31॥
प्रकरण 5 पद 32
म्हणोनी सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ 5-32॥
प्रकरण 5 पद 33
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक ।
सुखामात्रचि एक । स्वयें आथी ॥ 5-33॥
प्रकरण 5 पद 34
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ 5-34॥
प्रकरण 5 पद 35
तैसें सुखा आतोनि निघणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ 5-35॥
प्रकरण 5 पद 36
जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे ।
मां डंकूचि तैं भरे । कोण कोणा ? ॥ 5-36॥
प्रकरण 5 पद 37
तैसें आपुलेनि सुखपणें । जया नाहीं सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ 5-37॥
प्रकरण 5 पद 38
आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ 5-38॥
प्रकरण 5 पद 39
सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडूनिया निदसुरिया ।
आपुलिया हात चोरिया । आपणचि जें ॥ 5-39॥
प्रकरण 5 पद 40
न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ 5-40॥
प्रकरण 5 पद 41
कां न सज्जिता विणा । तो नादु जो अबोलपणा ।
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ 5-41॥
प्रकरण 5 पद 42
नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।
आपणचि भंवरा । होआवें पडे ॥ 5-42॥
प्रकरण 5 पद 43
नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे ।
हें पाहणें तैसें नोहे । आणिका जोगें ॥ 5-43॥
प्रकरण 5 पद 44
तैसें सुखपणा येवों । लाजें आपुलें सुख पावों ।
तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ 5-44॥
प्रकरण 5 पद 45
दिहाचिया दुपारीं । चांदू जैसा अंबरीं ।
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ 5-45॥
प्रकरण 5 पद 46
रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य ।
क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ 5-46॥
प्रकरण 5 पद 47
जैं मनाचा अंकुर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।
तोचि हन माजे । तरीच घडे ॥ 5-47॥
प्रकरण 5 पद 48
कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।
तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ 5-48॥
प्रकरण 5 पद 49
नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलियाही अनळा ।
लागणें तैं केवळा । अंगासीचि ॥ 5-49॥
प्रकरण 5 पद 50
दर्पणाचेनि नेमें- । विणचि मुख प्रेमे ।
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ 5-50॥
प्रकरण 5 पद 51
न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें ।
ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ 5-51॥
प्रकरण 5 पद 52
एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य ।
तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ 5-52॥
प्रकरण 5 पद 53
आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।
जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ 5-53॥
प्रकरण 5 पद 54
एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण ।
दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ 5-54॥
प्रकरण 5 पद 55
आंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।
येथें उठली पांती । लक्षणांची ॥ 5-55॥
प्रकरण 5 पद 56
उपाय मागिला पाये । घेऊन जाले वाये ।
प्रतीति सांडिली सोये । प्रत्ययाची ॥ 5-56॥
प्रकरण 5 पद 57
येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि जाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ 5-57॥
प्रकरण 5 पद 58
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिन्नला ।
नुसधेपणें थोटावला । अनुभवु जेथे ॥ 5-58॥
प्रकरण 5 पद 59
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ 5-59॥
प्रकरण 5 पद 60
कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैचा कीजे ? ॥ 5-60॥
प्रकरण 5 पद 61
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासीचि ॥ 5-61॥
प्रकरण 5 पद 62
अनुभवा हा ठावोवरी । आपुलीचि अनवसरी ।
तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ 5-62॥
प्रकरण 5 पद 63
कां परेसी पडे मिठी । तेथें नादा सळु नुठी ।
मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ 5-63॥
प्रकरण 5 पद 64
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी ।
कीं धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ 5-64॥
प्रकरण 5 पद 65
उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती ।
वांचुनि पिकलां शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ 5-65॥
प्रकरण 5 पद 66
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जरी ॥ 5-66॥
प्रकरण 5 पद 67
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ 5-67॥
प्रकरण 5 पद 68
येतुलियाही परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जर्ही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ 5-68॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम
पंचम प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 6
प्रकरण 6 पद 1
प्रकरण सहावें
शब्दखंडण
बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ 6-1॥
प्रकरण 6 पद 2
पाहतें आरिसा पाहें । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें पाहतें ॥ 6-2॥
प्रकरण 6 पद 3
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें एके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ 6-3॥
प्रकरण 6 पद 4
आपण तंव खपुष्प । परी फळ ते जगद्रूप ।
शब्द मवी तैं अमुप । कोण आहे ? ॥ 6-4॥
प्रकरण 6 पद 5
विधिनिषेधाचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ।
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ 6-5॥
प्रकरण 6 पद 6
हा अविद्येच्या आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ 6-6॥
प्रकरण 6 पद 7
शुद्धा शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी ।
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ 6-7॥
प्रकरण 6 पद 8
जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला ।
आत्मा बोलें भेटला । आपणपयां ॥ 6-8॥
प्रकरण 6 पद 9
दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।
म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ 6-9॥
प्रकरण 6 पद 10
जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती ।
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ 6-10॥
प्रकरण 6 पद 11
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।
गोमटे काय शब्दाचें । एकैक वानूं ॥ 6-11॥
प्रकरण 6 पद 12
किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
परी ययाही समंधु । नाहीं येथें ॥ 6-12॥
प्रकरण 6 पद 13
आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे ।
स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ 6-13॥
प्रकरण 6 पद 14
आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे ।
तरी वस्तूशीं वस्तू दुसरें । असेना कीं ॥ 6-14॥
प्रकरण 6 पद 15
आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? ।
काय जीभ जिभेतें । चाखे न चाखे ? ॥ 6-15॥
प्रकरण 6 पद 16
जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? ।
स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ 6-16॥
प्रकरण 6 पद 17
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? ।
तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ 6-17॥
प्रकरण 6 पद 18
एवं स्मरणास्मरण नाहीं । तरी स्मारकें काज काई ? ।
म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ 6-18॥
प्रकरण 6 पद 19
आणिक एक शब्दें । काज कीर भलें सिद्धें ।
परि धिवसा न बंधे । विचारू येथें ॥ 6-19॥
प्रकरण 6 पद 20
कां जे बोलें अविद्या नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे ।
हें म्हणतखेव पिसें । आलेंचि कीं ॥ 6-20॥
प्रकरण 6 पद 21
सूर्यो रात्रि मारील । मा आपणया उदो करील ।
हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ 6-21॥
प्रकरण 6 पद 22
चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? ।
कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ 6-22॥
प्रकरण 6 पद 23
म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाहीं निरुती ।
नाहीं आत्मा आत्मस्थिती । रिगे ऐसा ॥ 6-23॥
प्रकरण 6 पद 24
अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें ।
मा तर्कांचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ 6-24॥
प्रकरण 6 पद 25
इंद्रधनुष्या सितें । कवण धनवई न लाविजेतें ।
तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ 6-25॥
प्रकरण 6 पद 26
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।
तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ 6-26॥
प्रकरण 6 पद 27
साहे बोलाची वळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।
तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ 6-27॥
प्रकरण 6 पद 28
नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे ।
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ 6-28॥
प्रकरण 6 पद 29
नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।
तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ 6-29॥
प्रकरण 6 पद 30
जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें ।
मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ 6-30॥
प्रकरण 6 पद 31
दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।
तेंवि अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ 6-31॥
प्रकरण 6 पद 32
वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।
नागवें नागविलिया । विशेषु काई ? ॥ 6-32॥
प्रकरण 6 पद 33
मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।
परि उपवासा वेगळ । आनु आथी ? ॥ 6-33॥
प्रकरण 6 पद 34
मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें ।
मा उमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ 6-34॥
प्रकरण 6 पद 35
हें दिसे तैसें असे । तरी चित्रींचेनि पाउसें ।
वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ 6-35॥
प्रकरण 6 पद 36
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें ।
तरी मसीचिया वोरबारें । कां सिणावें ? ॥ 6-36॥
प्रकरण 6 पद 37
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? ।
तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ 6-37॥
प्रकरण 6 पद 38
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे ।
हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ 6-38॥
प्रकरण 6 पद 39
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।
आपुलां अभावीं आपण । साधीतसे ॥ 6-39॥
प्रकरण 6 पद 40
कांहीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? ।
वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ 6-40॥
प्रकरण 6 पद 41
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।
सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ 6-41॥
प्रकरण 6 पद 42
हे अविद्या तरी मायावी । परी मायावीपणचि लपवी ।
हे साचा आली अभावी । आपुलां हे ॥ 6-42॥
प्रकरण 6 पद 43
बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं ।
आतां बोलू हात वसी । कवणावरी ॥ 6-43॥
प्रकरण 6 पद 44
साउलि येतें साबळें । हालया भोय आडळे ।
कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ 6-44॥
प्रकरण 6 पद 45
कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं ।
नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाच्या ॥ 6-45॥
प्रकरण 6 पद 46
उठावला वोथरे तवका । तो सुनाथा पडे असिका ।
अविद्यानाशीं तर्का । तैसें होय ॥ 6-46॥
प्रकरण 6 पद 47
ऐसी अविद्या नासावी । हें वाहेल जो जीवीं ।
तेणें साली काढावी । आकाशाची ॥ 6-47॥
प्रकरण 6 पद 48
तेणें शेळी गळां दोहावीं । गुडगाडोळां वास पाहावी ।
वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ 6-48॥
प्रकरण 6 पद 49
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू ।
कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । 6-49॥
प्रकरण 6 पद 50
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।
वारयाचे तांथु । वळू सुखें ॥ 6-50॥
प्रकरण 6 पद 51
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरूं ।
तळहातींचे विंचरू । केस सुखें ॥ 6-51॥
प्रकरण 6 पद 52
घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू ।
सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ 6-52॥
प्रकरण 6 पद 53
तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू ।
वांझेचें लेंकरूं । परणू सुखें ॥ 6-53॥
प्रकरण 6 पद 54
तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें ।
मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ 6-54॥
प्रकरण 6 पद 55
अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।
आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ 6-55॥
प्रकरण 6 पद 56
नाहीं तयाचेनि नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।
अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ 6-56॥
प्रकरण 6 पद 57
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती ।
जेवी दुपारीं कां वाती । अंगणींचिया ॥ 6-57॥
प्रकरण 6 पद 58
न पेरितां शेती । जे कीं संवगणिया जाती ।
तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ 6-58॥
प्रकरण 6 पद 59
खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा ।
तो न करितांचि उगा । घरी होता ॥ 6-59॥
प्रकरण 6 पद 60
पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु ।
अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ 6-60॥
प्रकरण 6 पद 61
माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे ।
तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ 6-61॥
प्रकरण 6 पद 62
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगुं जाये ।
मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ 6-62॥
प्रकरण 6 पद 63
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे ।
खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ 6-63॥
प्रकरण 6 पद 64
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।
परी रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ 6-64॥
प्रकरण 6 पद 65
दिठी पाहतां काय न फावे । परी निदेतें तंव न देखवे ।
चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ 6-65॥
प्रकरण 6 पद 66
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ।
जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ 6-66॥
प्रकरण 6 पद 67
नुसधियेचि साच्या । मुका होय वाचरुकाचा ।
अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ 6-67॥
प्रकरण 6 पद 68
तैसीं अविद्येसीं सन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।
उठलींचि निरर्थकें । जल्पें होतीं ॥ 6-68॥
प्रकरण 6 पद 69
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? ।
अविद्यानाशीं विचारु । तैसा होये ॥ 6-69॥
प्रकरण 6 पद 70
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें ।
निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ 6-70॥
प्रकरण 6 पद 71
कैसीनि ही वस्तु नसे । तेथें जै शब्दाचा अर्थ हों बैसे ।
तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ 6-71॥
प्रकरण 6 पद 72
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई ।
परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ 6-72॥
प्रकरण 6 पद 73
यालागीं अविद्येचिया मोहरां । उठलियाही विचारा ।
आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ 6-73॥
प्रकरण 6 पद 74
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।
हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ 6-74॥
प्रकरण 6 पद 75
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया ।
येईल हें साविया । विरुद्धचि ॥ 6-75॥
प्रकरण 6 पद 76
आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे दिवशीं ।
कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ 6-76॥
प्रकरण 6 पद 77
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? ।
तळहात काय वळघे । आपणपयां ? ॥ 6-77॥
प्रकरण 6 पद 78
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? ।
परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ 6-78॥
प्रकरण 6 पद 79
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल एके क्षणीं ।
परि पाणियासि पाणी । पाजवे कायी ? ॥ 6-79॥
प्रकरण 6 पद 80
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा होय ऐसा ।
जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ 6-80॥
प्रकरण 6 पद 81
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।
वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ 6-81॥
प्रकरण 6 पद 82
आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया ।
समोर होआवया । ठाकीं आहे ? ॥ 6-82॥
प्रकरण 6 पद 83
दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? ।
कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ 6-83॥
प्रकरण 6 पद 84
चंदन चंदनपणा लावी ? । रंगु रंगपणा लावी ।
मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैसें ? ॥ 6-84॥
प्रकरण 6 पद 85
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।
रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ 6-85॥
प्रकरण 6 पद 86
आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।
परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ 6-86॥
प्रकरण 6 पद 87
तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव ।
आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ 6-87॥
प्रकरण 6 पद 88
आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे ।
डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ 6-88॥
प्रकरण 6 पद 89
आरसा आपुलिये । आंगीं आपणा पाहे ।
तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ 6-89॥
प्रकरण 6 पद 90
दिगंता पैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।
मा तिये कां तियेचें । आंग फुटे ? ॥ 6-90॥
प्रकरण 6 पद 91
रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें ।
परि कायी कीजे नेणे । आपणपें चाखों ॥ 6-91॥
प्रकरण 6 पद 92
तरि जिव्हे काय आपलें । चाखणें हन ठेलें ? ।
तैसे नव्हे संचलें । तेंचि ते कीं ॥ 6-92॥
प्रकरण 6 पद 93
तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।
आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ 6-93॥
प्रकरण 6 पद 94
कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें ।
जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ 6-94॥
प्रकरण 6 पद 95
म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदवूनि शब्द शोभे ।
येईल ऐसा न लभे । उमसु घेवों ॥ 6-95॥
प्रकरण 6 पद 96
एवं माध्यान्हींची दिवा । तम धाडी ना दिवो दावी ।
तैसी उभयतां पदवी । शब्दा जाली ॥ 6-96॥
प्रकरण 6 पद 97
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तये नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ 6-97॥
प्रकरण 6 पद 98
ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी ।
हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ 6-98॥
प्रकरण 6 पद 99
आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं ।
अर्थता तरी नाहीं । निपटूनियां ॥ 6-99॥
प्रकरण 6 पद 100
बागुल आला म्हणतें । बोलणें जैसें रितें ।
कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ 6-100॥
प्रकरण 6 पद 101
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें ।
शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ 6-101॥
प्रकरण 6 पद 102
एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।
साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ 6-102॥
प्रकरण 6 पद 103
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।
अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ 6-103॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 7
प्रकरण 7 पद 1
प्रकरण सातवें
अज्ञानखंडण
येर्क्ष्हवीं तर्क्ष्ही अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा ।
तैं तरी काना- । खालींच दडे ॥ 7-1॥
प्रकरण 7 पद 2
आडसूनि अंधारीं । खद्योत दीप्ती शिरी ।
तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ 7-2॥
प्रकरण 7 पद 3
जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा ।
तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ 7-3॥
प्रकरण 7 पद 4
कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं ।
नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ 7-4॥
प्रकरण 7 पद 5
हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी ।
काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ 7-5॥
प्रकरण 7 पद 6
आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें ।
येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ 7-6॥
प्रकरण 7 पद 7
असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ।
मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानही लटिकें ॥ 7-7॥
प्रकरण 7 पद 8
या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें ।
तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ 7-8॥
प्रकरण 7 पद 9
अज्ञाने जेथ असावें । तेणें सर्व नेण होआवें ।
ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ 7-9॥
प्रकरण 7 पद 10
तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे ।
आणि तेणेंचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ 7-10॥
प्रकरण 7 पद 11
तरी नुठितां दुजें । जैं अज्ञान आहे बीजें ।
तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ 7-11॥
प्रकरण 7 पद 12
अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें ।
आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ 7-12॥
प्रकरण 7 पद 13
या लागीं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान ।
हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ 7-13॥
प्रकरण 7 पद 14
आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख ।
तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ 7-14॥
प्रकरण 7 पद 15
अहो आपणयाही पुरता । नेणू न करवे जाणता ।
तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ 7-15॥
प्रकरण 7 पद 16
आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? ।
सुषुप्ती सुषुप्तेया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ 7-16॥
प्रकरण 7 पद 17
तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें ।
तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ 7-17॥
प्रकरण 7 पद 18
ना तरी अज्ञान एक घडे । हें जयास्तव निवडे ।
तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ 7-18॥
प्रकरण 7 पद 19
पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा ।
तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ 7-19॥
प्रकरण 7 पद 20
इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी ।
तें न जळे तैं वाउगी । शक्तीच ते ॥ 7-20॥
प्रकरण 7 पद 21
आंधारु कोंडूनि घरीं । घरा पडसायी न करी ।
तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ 7-21॥
प्रकरण 7 पद 22
वोजावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे ।
दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ 7-22॥
प्रकरण 7 पद 23
तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके ।
तैं अज्ञानशब्द लटिलें । आलेंच कीं ॥ 7-23॥
प्रकरण 7 पद 24
येर्क्ष्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया ।
कारण म्हणतां न्याया । चुकी येईल कीं ॥ 7-24॥
प्रकरण 7 पद 25
अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी ।
आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ 7-25॥
प्रकरण 7 पद 26
स्वप्न आणि जागरु । आठवु आणि विसरु ।
इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ 7-26॥
प्रकरण 7 पद 27
शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट ।
कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ 7-27॥
प्रकरण 7 पद 28
नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों ।
तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ 7-28॥
प्रकरण 7 पद 29
हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे ।
तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ 7-29॥
प्रकरण 7 पद 30
अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनशी नांदे ? ।
ऐसीं कायसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ 7-30॥
प्रकरण 7 पद 31
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज ।
जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । 7-31॥
प्रकरण 7 पद 32
दुलांकुडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें ।
तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ 7-32॥
प्रकरण 7 पद 33
का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो ।
सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ 7-33॥
प्रकरण 7 पद 34
तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे ।
येर्क्ष्हवीं अज्ञान होये । लागलेंचि ॥ 7-34॥
प्रकरण 7 पद 35
आत्मेनशी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ।
वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ 7-35॥
प्रकरण 7 पद 36
लवणाची मासोळी । जरी जाली जिव्हाळी ।
तरी जळीं ना जळावेगळी । न जिये जेवीं ॥ 7-36॥
प्रकरण 7 पद 37
जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ।
म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ 7-37॥
प्रकरण 7 पद 38
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? ।
ना दवडणें न साहे । जयापरी ॥ 7-38॥
प्रकरण 7 पद 39
नाना पुनिवेचेनि आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें ।
कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ 7-39॥
प्रकरण 7 पद 40
तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा ।
हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ 7-40॥
प्रकरण 7 पद 41
तरी अज्ञान स्वरूपें कैसें । काय कार्यानुमेय असे ।
कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥ 7-41॥
प्रकरण 7 पद 42
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी ।
ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ 7-42॥
प्रकरण 7 पद 43
जैसी अंकुरेंसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ ।
तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होये ॥ 7-43॥
प्रकरण 7 पद 44
कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टी आरोपें ।
तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥ 7-44॥
प्रकरण 7 पद 45
नाना चांदु एकु असे । तो व्योमीं दुजा दिसे ।
तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे पैं ॥ 7-45॥
प्रकरण 7 पद 46
तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ।
तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥ 7-46॥
प्रकरण 7 पद 47
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्यविशेखीं ।
नेघे तें असे ये विखीं । आनु नाहीं ॥ 7-47॥
प्रकरण 7 पद 48
अज्ञान कार्यपणें । घेइजे तें अज्ञान म्हणणे ।
तरी घेताही करणें । तयाचेंची ॥ 7-48॥
प्रकरण 7 पद 49
स्वप्नीं दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन ।
तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥ 7-49॥
प्रकरण 7 पद 50
तरी चाखिला गूळ गूळें । माखिलें काजळ काजळें ।
कां घेपे देपे शुळें । हालया सुळें ॥ 7-50॥
प्रकरण 7 पद 51
तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ।
तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ 7-51॥
प्रकरण 7 पद 52
आतां घेतें घेइजे तें ऐसा । विचारु नये मानसा ।
तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ 7-52॥
प्रकरण 7 पद 53
तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा ।
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ 7-53॥
प्रकरण 7 पद 54
मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी ।
येणें बोलें ही जाणावी । अज्ञान उखी ॥ 7-54॥
प्रकरण 7 पद 55
एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणां भाजन ।
नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ 7-55॥
प्रकरण 7 पद 56
ना स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ।
मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥ 7-56॥
प्रकरण 7 पद 57
आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहू ।
परी ठायें ठाऊ । निदेजों नेणें ॥ 7-57॥
प्रकरण 7 पद 58
हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें ।
आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥ 7-58॥
प्रकरण 7 पद 59
जैसें न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान ।
जैसें कां हुताशन । सामर्थ्यांचें ॥ 7-59॥
प्रकरण 7 पद 60
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव ।
तैं कांहीं अज्ञान हांव । बांधतें कां ? ॥ 7-60॥
पद 61
काइ दीप जैं न लाविजे । तैंचि काजळी फेडिजे ।
कां नुगवतीया वाळिजे । रुखाची छाया ॥ 61॥
पद 62
नाना नुठितां देहदशा । कालवूनि लाविजे चिकसा ।
न घडितां आरिसा । उटिजे काई ॥ 62॥
प्रकरण 7
प्रकरण 7 पद 63
कां वोहाच्या दुधीं । सायचि असावी आधीं ।
मग ते फेडूं इये बुद्धी । पवाडु कीजे ॥ 7-63॥
प्रकरण 7 पद 64
तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मेपणा ठावो नाहीं ।
तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ 7-64॥
प्रकरण 7 पद 65
म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे । हें जालेंचि असे आपैसें ।
आतां रिकामेंचि काइसें । नाहीं म्हणो ॥ 7-65॥
प्रकरण 7 पद 66
ऐसाही आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा ।
अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ 7-66॥
प्रकरण 7 पद 67
जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण ।
कीं सर्वांपरी मरण । मारवलें कीं ॥ 7-67॥
प्रकरण 7 पद 68
नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली ।
कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ 7-68॥
प्रकरण 7 पद 69
कां अभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला ।
चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ 7-69॥
प्रकरण 7 पद 70
कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख ।
नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ 7-70॥
प्रकरण 7 पद 71
तैसें अज्ञान आपुलिये वेळ । भोगी हेचि टवाळ ।
आतां तरी केवळ । वस्तू होऊनि असे ॥ 7-71 ॥
प्रकरण 7 पद 72
देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? ।
कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ 7-72॥
प्रकरण 7 पद 73
तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ।
घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ 7-73॥
प्रकरण 7 पद 74
जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें ।
ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ 7-74॥
प्रकरण 7 पद 75
नाना नीद धरावया हातीं । चेऊनी उठिला झडती ।
ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ 7-75॥
प्रकरण 7 पद 76
तेवीं पाहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं पिसें काइसें ।
न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ 7-76॥
प्रकरण 7 पद 77
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी ।
न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ 7-77॥
प्रकरण 7 पद 78
अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें ।
विचाराचे डोळे । देखते कां ? ॥ 7-78॥
प्रकरण 7 पद 79
ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नाइके ।
कीं निरुती हन मुके । अनसाईपणा ॥ 7-79॥
प्रकरण 7 पद 80
इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु ।
निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ 7-80॥
प्रकरण 7 पद 81
अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये सभे ।
कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ 7-81॥
प्रकरण 7 पद 82
नाना गगनौलाचिया माळा । वांझेचिया जालिया गळा ।
घापती तो सोहळा । पाविजेत असे ॥ 7-82॥
प्रकरण 7 पद 83
आणूनि कासवीचें तूप । भरू आकाशाचें माप ।
तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ 7-83॥
प्रकरण 7 पद 84
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती ।
तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ 7-84॥
प्रकरण 7 पद 85
म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें ।
परी आन एक स्फुरे । इयेविषयीं ॥ 7-85॥
प्रकरण 7 पद 86
आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें ।
वस्तू ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ 7-86॥
प्रकरण 7 पद 87
तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हढें ।
आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ 7-87॥
प्रकरण 7 पद 88
जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हढें ।
आणि उठिलें तरी रोकडें । देखत असों ॥ 7-88॥
प्रकरण 7 पद 89
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ।
यया दृश्या अनुमान । प्रमाण जालें ॥ 7-89॥
प्रकरण 7 पद 90
ना तरी चंद्रु एक असे । तो व्योमीं दुणावला दिसे ।
तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ 7-90॥
प्रकरण 7 पद 91
भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ।
न दिसती आणि अपाडें । साजीं असती ॥ 7-91॥
प्रकरण 7 पद 92
तरी भरंवसेनि मूळें । पाणी घेती हें न टळें ।
तैसें अज्ञान कळें । दृश्यास्तव ॥ 7-92॥
प्रकरण 7 पद 93
चेइलेया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे ।
परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ 7-93॥
प्रकरण 7 पद 94
म्हणोन वस्तूमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके ।
तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ 7-94॥
प्रकरण 7 पद 95
अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें ।
काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ 7-95॥
प्रकरण 7 पद 96
अगा चंद्रापासूनि उजळ । जेणें राविले वस्तू धवळ ।
तयातें काजळ । म्हणिजेत असे ॥ 7-96॥
प्रकरण 7 पद 97
आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी ।
अज्ञान इया वाहणी । मानूं तरी तें ॥ 7-97॥
प्रकरण 7 पद 98
कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी आमा ।
तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ 7-98॥
प्रकरण 7 पद 99
वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे ।
ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ 7-99॥
प्रकरण 7 पद 100
तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु ।
तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ 7-100॥
प्रकरण 7 पद 101
तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? ।
येर्क्ष्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ 7-101॥
प्रकरण 7 पद 102
कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे ।
तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ 7-102॥
प्रकरण 7 पद 103
असे म्हणावया जोगें । नाचरे कीर आंगें ।
परी नाहीं हें न लगे । जोडावेंचि ॥ 7-103॥
प्रकरण 7 पद 104
कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे ।
हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ 7-104॥
प्रकरण 7 पद 105
मिथ्या वादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली ।
विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ 7-105॥
प्रकरण 7 पद 106
जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येव्हढें काय चुके ? ।
परी दृश्याचिये न टेके । सोइ जो ॥ 7-106॥
प्रकरण 7 पद 107
वेदु काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें ।
ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ 7-107॥
प्रकरण 7 पद 108
सूर्यो कोणा न पाहे ? । परी आत्मा दाविला आहे ? ।
गगनें व्यापिता ठाये । ऐशी वस्तू ॥ 7-108॥
प्रकरण 7 पद 109
देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी ।
तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ 7-109॥
प्रकरण 7 पद 110
बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके ।
मना संकल्प निके । याहीहूनी ॥ 7-110॥
प्रकरण 7 पद 111
विषयाचिया बरडी । अखंड घासती तोंडीं ।
तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ 7-111॥
प्रकरण 7 पद 112
परी नाहींपणा सकट । खाऊनी भरलें पोट ।
ते कोणाही सकट । कां फावेल ? ॥ 7-112॥
प्रकरण 7 पद 113
जो आपणासी नव्हे विखो । तो कोण लाहे देखो ।
जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ 7-113॥
प्रकरण 7 पद 114
हें असो नामें रूपें । पुढासूनि अमूपें ।
जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ 7-114॥
प्रकरण 7 पद 115
म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक ।
न बाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ 7-115॥
प्रकरण 7 पद 116
नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेरी सवडे ।
तैसा निर्णो सुसुथा पडे । केला येथें ॥ 7-116॥
प्रकरण 7 पद 117
कां मस्तकांत निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली ।
तयाची फाकावली । बुद्धि जैशी ॥ 7-117॥
प्रकरण 7 पद 118
तैसें टणकोनी सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था ।
करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ 7-118॥
प्रकरण 7 पद 119
आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें ।
दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ 7-119॥
प्रकरण 7 पद 120
जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें ।
फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ 7-120॥
प्रकरण 7 पद 121
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण ।
द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ 7-121॥
प्रकरण 7 पद 122
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? ।
ऐक्या सकट पोटें । आटोनि गेलीं ॥ 7-122॥
प्रकरण 7 पद 123
येव्हढें ही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे ।
उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ 7-123॥
प्रकरण 7 पद 124
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी ।
उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ 7-124॥
प्रकरण 7 पद 125
दर्शनरिद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा ।
जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ 7-125॥
प्रकरण 7 पद 126
क्षणक्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी ।
दिठीकरवीं वेढवी । उदार जे ॥ 7-126॥
प्रकरण 7 पद 127
मागिलीये क्षणीचीं अंगें । पारसी म्हणोनियां वेगें ।
सांडूनि दृष्टि रिघे । नवीया रूपा ॥ 7-127॥
प्रकरण 7 पद 128
तैशीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं ।
लेऊनि आणी । जाणतेपणा ॥ 7-128॥
प्रकरण 7 पद 129
तया परमात्मपदीचें शेष । ना काहीं तया सुसास ।
आणि होय येव्हढी कास । घातली जेणें ॥ 7-129॥
प्रकरण 7 पद 130
सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचे तोंडवरी ।
परी तें आन घरीं । जाणिजेना ॥ 7-130॥
प्रकरण 7 पद 131
एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी ।
दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ 7-131॥
प्रकरण 7 पद 132
तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे ।
तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ 7-132॥
प्रकरण 7 पद 133
तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे ।
जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें । 7-133॥
प्रकरण 7 पद 134
आंगें आंगावरी पहुडे । चेइला वेगळा न पडे ।
तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ 7-134॥
प्रकरण 7 पद 135
पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणापें वेल्हावे जैसें ।
वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ 7-135॥
प्रकरण 7 पद 136
गुंफी ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा ।
भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥ 7-136॥
प्रकरण 7 पद 137
किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें ।
तर्क्ष्ही सूर्यासि दुसरें । बोलों येईल ॥ 7-137॥
प्रकरण 7 पद 138
चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडलिया बहुवसु ।
काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ 7-138॥
प्रकरण 7 पद 139
दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी ।
परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ 7-139॥
प्रकरण 7 पद 140
सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रार्जुना राया ।
तरी तो काय तिया । एकोत्तरावा ? ॥ 7-140॥
प्रकरण 7 पद 141
सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा ।
परी ताथुवींण दुजा । भाव आहे ? ॥ 7-141॥
प्रकरण 7 पद 142
कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा ।
मीनला तर्क्ष्ही वाचा । मात्र कीं ते ॥ 7-142॥
प्रकरण 7 पद 143
तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।
उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ 7-143॥
प्रकरण 7 पद 144
गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा ।
जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ 7-144॥
प्रकरण 7 पद 145
तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको ।
परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ 7-145॥
प्रकरण 7 पद 146
तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा ।
जरी विश्वा अशेखा । भरला आहे ॥ 7-146॥
प्रकरण 7 पद 147
दुबंधा क्षीरोदकीं । वाणें परी अनेकीं ।
दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ 7-147॥
प्रकरण 7 पद 148
पातयाचि मिठी । नुकलितां दिठी ।
अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ 7-148॥
प्रकरण 7 पद 149
न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका ।
तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ 7-149॥
प्रकरण 7 पद 150
मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें ।
तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ 7-150॥
प्रकरण 7 पद 151
पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी ।
आपुलियेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ 7-151॥
प्रकरण 7 पद 152
कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु ।
ना कूर्मी गिळी विस्तारु । आपेंआप ॥ 7-152॥
प्रकरण 7 पद 153
अवसेचिये दिवशीं । सतराविये अंशीं ।
स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ 7-153॥
प्रकरण 7 पद 154
तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे ।
तया नांव वावटे । आपणपेयां ॥ 7-154॥
प्रकरण 7 पद 155
सहजें आवघेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? ।
तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ 7-155॥
प्रकरण 7 पद 156
नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो ।
तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ 7-156॥
प्रकरण 7 पद 157
जें अनादीच दृश्यपणें । अनादीचि देखणें ।
हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ 7-157॥
प्रकरण 7 पद 158
अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना ।
कीं दीप्तीशीं तपना । संबंधु कीजे ? ॥ 7-158॥
प्रकरण 7 पद 159
विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे पुढें ।
ना तें नाहीं तेव्हढें । नाहींचि देखे ॥ 7-159॥
प्रकरण 7 पद 160
विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही ।
तर्क्ष्ही दशा ऐशीही । देखतचि असे ॥ 7-160॥
प्रकरण 7 पद 161
कापुराही आथी चांदिणें । कीं तोचि न माखे तेणें ।
तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥ 7-161॥
प्रकरण 7 पद 162
किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे ।
देखतचि असे । आपणपयातें ॥ 7-162॥
प्रकरण 7 पद 163
मनोरथांचीं देशांतरें । मनीं प्रकाशूनि नरें ।
मग तेथें आदरें । हिंडे जैसा ॥ 7-163॥
प्रकरण 7 पद 164
कां दाटला डोळा डोळ्यां । डोळाचि तारा होऊनियां ।
स्फुरे चोख म्हणौनियां । विस्मो नाहीं ॥ 7-164॥
प्रकरण 7 पद 165
यालागीं एकें चिद्रूपें । आपणयां आपणपें ।
देखिजे कां आरोपे । काय काज ? ॥ 7-165॥
प्रकरण 7 पद 166
किळेचें पांघरुण । आपजवी रत्ना कोण ? ।
कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ 7-166॥
प्रकरण 7 पद 167
चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? ।
कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ 7-167॥
प्रकरण 7 पद 168
कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? ।
कीं ताऊनि ऊन केलें । आगीतें काई ? ॥ 7-168॥
प्रकरण 7 पद 169
नाना ते लता । आपुले वेली गुंडाळितां ।
घर करी न करितां । जयापरी ॥ 7-169॥
प्रकरण 7 पद 170
कां प्रभेचा उभळा । दीप प्रकाशे संचला ।
तैसा चैतन्यें गिंवसिला । चिद्रूप स्फुरे ॥ 7-170॥
प्रकरण 7 पद 171
ऐसें आपणया आपण । आपुलें निरीक्षण ।
करावें येणेंवीण । करीतुचि असे ॥ 7-171॥
प्रकरण 7 पद 172
ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधारें चांदिणें ।
मा चंद्रासि उणें । स्फुरतें का ? ॥ 7-172॥
प्रकरण 7 पद 173
म्हणोनि हें न व्हावे । ऐसेंही करूं पावे ।
तरी तैसाचि स्वभावें । आइता असे ॥ 7-173॥
प्रकरण 7 पद 174
द्रष्टा दृश्य ऐसें । अळुमाळु दोनी दिसे ।
तेंही परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥ 7-174॥
प्रकरण 7 पद 175
तेथें दृश्य द्रष्टां भरे । । द्रष्टेपण दृश्यीं न सरे ।
मा दोन्ही न होऊनि उरे । दोहींचें साच ॥ 7-175॥
प्रकरण 7 पद 176
मग भलतेथ भलतेव्हां । माझारीले दृश्य-द्रष्ट भावा ।
आटणी करीत खेंवा । येती दोन्ही ॥ 7-176॥
प्रकरण 7 पद 177
कापुरीं अग्नीप्रवेशु । कीं अग्नि घातला पोतासु ।
ऐसें नव्हे संसरीसु । वेंचु जाला ॥ 7-177॥
प्रकरण 7 पद 178
एका एकु वेंचला । शून्य बिंदु शून्यें पुसिला ।
द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥ 7-178॥
प्रकरण 7 पद 179
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया ।
झोंबीसकट आटोनियां । जाइजे जेवीं ॥ 7-179॥
प्रकरण 7 पद 180
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी ।
येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ 7-180॥
प्रकरण 7 पद 181
सिंधु पूर्वापर । न मिळती तंवचि सागर ।
मग एकवट नीर । जैसें होय ॥ 7-181॥
प्रकरण 7 पद 182
बहु ये हें त्रिपुटी । सहजें हो तया राहटी ।
प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ? ॥ 7-182॥
प्रकरण 7 पद 183
दोनी विशेषें गिळी । ना निर्विशिष्टातें उगळी ।
उघडी झांपी येकेंच डोळीं । वस्तुचि हे ॥ 7-183॥
प्रकरण 7 पद 184
पातया पातें मिळे । कीं दृष्ट्त्वें सैंघ पघळे ।
तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥ 7-184॥
प्रकरण 7 पद 185
द्रष्टा दृश्याच्या ग्रासी । मध्यें लेखु विकाशी ।
योगभूमिका ऐसी । आंगीं वाजे ॥ 7-185॥
प्रकरण 7 पद 186
उठिला तरंगु बैसे । पुढें अनुही नुमसे ।
ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ 7-186॥
प्रकरण 7 पद 187
कां नीद सरोनि गेली । जागृती नाहीं चेयिली ।
तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ 7-187॥
प्रकरण 7 पद 188
नाना एका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी ।
हे गमे तैशिया दृष्टी । दिठी सूतां ॥ 7-188॥
प्रकरण 7 पद 189
कां मावळो सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो ।
तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ 7-189॥
प्रकरण 7 पद 190
घेतला श्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला ।
तैसा दोहींसि सिवतला । नव्हे जो अर्थु ॥ 7-190॥
प्रकरण 7 पद 191
कीं अवघवियांचि करणीं । विषयांची घेणी ।
करितांचि एके क्षणीं । जें कीं आहे ॥ 7-191॥
प्रकरण 7 पद 192
तया सारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो ।
येणें कां पाहों । न पाहों लाभे ? ॥ 7-192॥
प्रकरण 7 पद 193
कायी आपुलिये भूमिके । आरिसा आपुलियें निकें ।
पाहों न पाहों शके । हें कें आहे ? ॥ 7-193॥
प्रकरण 7 पद 194
कां समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया ।
वांचूनि तयाप्रति तया । होआवें कां ? ॥ 7-194॥
प्रकरण 7 पद 195
सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे केवीं ।
जे उदो वस्तूचीं चवी । स्वयें घेपे ? ॥ 7-195॥
प्रकरण 7 पद 196
कीं रसु आपणया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? ।
हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ 7-196॥
प्रकरण 7 पद 197
तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हो नेणे ।
आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ 7-197॥
प्रकरण 7 पद 198
जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां ।
तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ 7-198॥
प्रकरण 7 पद 199
आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? ।
तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ 7-199॥
प्रकरण 7 पद 200
हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें ।
बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ 7-200॥
प्रकरण 7 पद 201
पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे ।
म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ 7-201॥
प्रकरण 7 पद 202
एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें ।
ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ 7-202॥
प्रकरण 7 पद 203
दिसल्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें ।
तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ 7-203॥
प्रकरण 7 पद 204
दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे ।
आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ 7-204॥
प्रकरण 7 पद 205
मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं ।
तरी जाली ते वायाणी । प्रतीती कीं ॥ 7-205॥
पद 206
देखतांची आपणयातें । आलिये निदेचेनि हातें ।
तया स्वप्ना ऐसा येथें । निहाळितां ॥ 206॥
प्रकरण 7
प्रकरण 7 पद 207
निद्रिस्तु सुखासनीं । वाहिजे अनुवाहणीं ।
तो साच काय तेसणी । दशा पावे ? ॥ 7-207॥
पद 208
कीं सिसेंवीण एकएकें । दाविलीं राज्य करिती रंकें ।
तैशीं तियें सतुकें । आथी काई ? ॥ 208॥
प्रकरण 7
प्रकरण 7 पद 209
ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाई ।
तैसाची स्वप्नी कांहीं । न पविजेचि कीं ॥ 7-209॥
प्रकरण 7 पद 210
तान्हेलिया मृगतृष्णा । न भेटलिया शिणु जेसणा ।
मा भेटलेया कोणा । काय भेटलें ॥ 7-210॥
प्रकरण 7 पद 211
कीं साउलियेचेचि व्याजें । मेळविलें जेणें दुजे ।
तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ 7-211॥
प्रकरण 7 पद 212
तैसें दृश्य करूनियां । द्रष्टयातें द्रष्टया ।
दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ 7-212॥
प्रकरण 7 पद 213
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? ।
न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ 7-213॥
प्रकरण 7 पद 214
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? ।
तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ 7-214॥
प्रकरण 7 पद 215
तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया ।
तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि ते कीं ना ? ॥ 7-215॥
प्रकरण 7 पद 216
म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां ।
आतां जालाचि दिठा । कां करावा ॥ 7-216॥
प्रकरण 7 पद 217
नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त तेंचि जालें ।
येणें ही बोलें गेलें । दावणें वृथा ॥ 7-217॥
प्रकरण 7 पद 218
दोरा सर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा ।
द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ 7-218॥
प्रकरण 7 पद 219
दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके ।
परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ 7-219॥
प्रकरण 7 पद 220
तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो ।
म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जर्ही ॥ 7-220॥
प्रकरण 7 पद 221
वावो कीर होये । तर्क्ष्ही दिसत तंव आहे ।
येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ 7-221॥
प्रकरण 7 पद 222
तरी आन आनातें । देखोन होय देखतें ।
तरी मानूं येतें । देखिलें ऐसें ॥ 7-222॥
प्रकरण 7 पद 223
येथें देखोनि कां न देखोनी । ऐक्य कां नाना होऊनि ।
परी हा येणें वाचूनि । देखणें असे ? ॥ 7-223॥
प्रकरण 7 पद 224
आरिशानें हो कां दाविलें । तर्क्ष्ही मुखचि मुखें देखिलें ।
तो न दावी तर्क्ष्ही संचलें । मुखचि मुखीं ॥ 7-224॥
प्रकरण 7 पद 225
तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाच्या ठाईं ।
ना दाविला तर्क्ष्हीही । हाचि यया ॥ 7-225॥
प्रकरण 7 पद 226
जागृती दाविला । कां निदा हारविला ।
परी जैसा येकला । पुरुष पुरुषीं ॥ 7-226॥
प्रकरण 7 पद 227
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।
तर्क्ष्ही ठायें ठावो । राजाचि असे ॥ 7-227॥
प्रकरण 7 पद 228
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।
तर्क्ष्ही कांहीं उणें तया- । माजी असे ? ॥ 7-228॥
प्रकरण 7 पद 229
तैसें दावितां न दावितां । हा यया परौता ।
चढे न तुटे आइता । असतचि असे ॥ 7-229॥
प्रकरण 7 पद 230
तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें ।
देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ 7-230॥
प्रकरण 7 पद 231
दीपु दावी तयातें रची । कीं तेणेंची सिद्धी दीपाची ।
तैसी सत्ता निमित्ताची । येणें साच ॥ 7-231॥
प्रकरण 7 पद 232
वन्हीतें वन्ही शिखा । प्रकाशी कीर देखा ।
परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ? ॥ 7-232॥
प्रकरण 7 पद 233
आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें ।
देखिलें तरी स्वभावें । दृश्यही हा ॥ 7-233॥
प्रकरण 7 पद 234
म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणापें देखावया ।
निमित्त हा वांचुनियां । नाहींच मा ॥ 7-234॥
प्रकरण 7 पद 235
भलतेन विन्यासें । दिसत तेणेंची दिसे ।
हा वांचूनि नसे । येथें कांहीं ॥ 7-235॥
प्रकरण 7 पद 236
लेणें आणि भांगारें । भांगारचि एक स्फुरे ।
कां जे येथें दुसरें । नाहींचि म्हणोनि ॥ 7-236॥
प्रकरण 7 पद 237
जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं ।
म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ 7-237॥
प्रकरण 7 पद 238
हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो ।
लाभो कां दिठी पाहों । भलतैसा ॥ 7-238॥
प्रकरण 7 पद 239
परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि नाहीं ।
तैशा रीती भलतेयाही । हाचि यया ॥ 7-239॥
प्रकरण 7 पद 240
आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो ।
परी हा वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ 7-240॥
प्रकरण 7 पद 241
गंगा गंगापणें वाहो । कीं सिंधु होऊनि राहो ।
परी पाणीपणा नवलावो । हें न देखो कीं ॥ 7-241॥
प्रकरण 7 पद 242
थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें ।
घृतपण नव्हे । अनारिसें ॥ 7-242॥
प्रकरण 7 पद 243
ज्वाळा आणि वन्ही । न लेखिजती दोन्ही ।
वन्हिमात्र म्हणोनि । आन नव्हेचि कीं ॥ 7-243॥
प्रकरण 7 पद 244
तैसें द्रश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा ।
पाहतां एकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥ 7-244॥
प्रकरण 7 पद 245
इये स्फूर्तीकडोनी । नाहीं स्फुर्तिमात्र वांचुनि ।
तरी काय देखोनी । देखतु असे ? ॥ 7-245॥
प्रकरण 7 पद 246
पुढें फरकें ना दिसतें । ना मागें डोकावी देखतें ।
पाहतां येणें ययातें । स्फुरद्रुपेंचि ॥ 7-246॥
प्रकरण 7 पद 247
कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनि सोनें पांघुरलें ।
दिठीचे पाय गुंतले । दिठीसीची ॥ 7-247॥
प्रकरण 7 पद 248
श्रुतीसी मेळविली श्रुती । दृतीसि मेळविली दृती ।
कां जे तृप्तीसीचि तृप्ती । वोगरिली ॥ 7-248॥
प्रकरण 7 पद 249
गुळें गुळें परिवाडिला । मेरु सुवर्णें मढिला ।
कां ज्वाळा गुंडाळिला । अनळु जैसा ॥ 7-249॥
प्रकरण 7 पद 250
हें बहु काय बोलिजे । कीं नभ नभाचिया रिगे सेजे ।
मग कोणें निदिजे । जागे तें कोणें ॥ 7-250॥
प्रकरण 7 पद 251
हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा ।
आणि न पाहतांही आपैसा । पाहणेंचि हा ॥ 7-251॥
प्रकरण 7 पद 252
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये ।
अनुभव न लाहे । आंगी मिरौ ॥ 7-252॥
प्रकरण 7 पद 253
म्हणोनी ययातें येणें । ये परीचें पाहणें ।
पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ 7-253॥
प्रकरण 7 पद 254
किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे ।
न चेतुचि चेऊं बैसे । तयासि तो ॥ 7-254॥
प्रकरण 7 पद 255
स्वयें दर्शनाचिया सवा । अवघीयाची जातसे फावां ।
परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ 7-255॥
प्रकरण 7 पद 256
न पाहतां आरिसा असो पाहे । तरी तेंचि पाहणें होये ।
आणि पाहणेन तरी जाये । न पाहणें पाहणें ॥ 7-256॥
प्रकरण 7 पद 257
भलतैसा फांके । परी एकपणा न मुके ।
नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥ 7-257॥
प्रकरण 7 पद 258
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ।
मग प्रकाशाची कथा । आइकता का ? ॥ 7-258॥
प्रकरण 7 पद 259
अंधारु कां उजिवडु । हा एकला एकवडु ।
जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ 7-259॥
प्रकरण 7 पद 260
तैसा आवडतिये भूमिके । आरूढलीयाही कौतुकें ।
परि ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ 7-260॥
प्रकरण 7 पद 261
सिंधूची सींव न मोडे । पाणीपणा सळु न पडे ।
जरी मोडुतु कां गाडे । तरंगांची ॥ 7-261॥
प्रकरण 7 पद 262
रश्मी सूर्याची आथी । परी बिंबा बहेरी जाती ।
म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥ 7-262॥
प्रकरण 7 पद 263
आणि पल्हेचा दोडा । न पडतां तढा ।
जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥ 7-263॥
प्रकरण 7 पद 264
सोनयाचा रवा । रवेपणाचा ठेवा ।
आवघेयाचि अवयवा । लेणें नोहे ॥ 7-264॥
प्रकरण 7 पद 265
न फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो ।
न ये मा पावों । उपमा काई ? ॥ 7-265॥
प्रकरण 7 पद 266
म्हणौनि इये आत्मलीळे । नाहीं आन कांटाळें ।
आतां येयाचिये तुळे । हाचि यया ॥ 7-266॥
प्रकरण 7 पद 267
स्वप्रकाशाचा घांसीं । जेवितां बहु वेगेंसी ।
वेंचेना परी कुशीं । वाखही न पडे ॥ 7-267॥
प्रकरण 7 पद 268
ऐसा निरुपमा परी । आपुलिये विलासवरी ।
आत्मा राणीव करी । आपुला ठाईं ॥ 7-268॥
प्रकरण 7 पद 269
तयातें म्हणिपें अज्ञान । तरी न्याया भरलें रान ।
आतां म्हणे तयाचें वचन । उपसावों आम्ही ॥ 7-269॥
प्रकरण 7 पद 270
प्रकाशितें अज्ञान । ऐसें म्हणणें हन ।
तरी निधि दावितें अंजन । न म्हणिजे काई ? ॥ 7-270॥
प्रकरण 7 पद 271
सुवर्णगौर अंबिका । न म्हणिजे कय काळिका ? ।
तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥ 7-271॥
प्रकरण 7 पद 272
येर्क्ष्हवीं शिवोनि पृथ्वीवरी । तत्त्वाच्या वाणेपरी ।
जयाचा रश्मिकरीं । उजाळा येती ॥ 7-272॥
प्रकरण 7 पद 273
जेणें ज्ञान सज्ञान होये । दृण्मात्र दृष्टीतें विये ।
प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासी ॥ 7-273॥
प्रकरण 7 पद 274
तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें ।
ना तमें सूर्या मोटे । बांधितां निकें ॥ 7-274॥
प्रकरण 7 पद 275
`अ` पूर्वी ज्ञानाक्षरी । वसतां अज्ञानाची थोरी ।
शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ? ॥ 7-275॥
प्रकरण 7 पद 276
लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ? ।
आंतु बाहेरी सरिसें । करूनि घाली ॥ 7-276॥
प्रकरण 7 पद 277
म्हणोनि जग ज्ञानें स्फितें । बोलतां अज्ञानवादातें ।
विखुरली होती आतें । वाचेचिये ॥ 7-277॥
प्रकरण 7 पद 278
अखरीं तंव गोवधु । पुढारां अनृतवादु ।
मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ? ॥ 7-278॥
प्रकरण 7 पद 279
आणि अज्ञान म्हणणें । स्फुरत्से अर्थपणें ।
आतां हेंचि ज्ञान कोणे । मानिजे ना ? ॥ 7-279॥
प्रकरण 7 पद 280
असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें ।
आपणचि देखिजे । बहुये परी ॥ 7-280॥
प्रकरण 7 पद 281
निर्वचितां जें झावळे । तेंचि कीं लाहे डोळे ? ।
डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥ 7-281॥
प्रकरण 7 पद 282
ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणें मी वियें ।
येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥ 7-282॥
प्रकरण 7 पद 283
तंव अज्ञान त्रिशुद्धी नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई ।
जे धर्म धर्मित्वें केंहीं । ज्ञानाज्ञान असे ? ॥ 7-283॥
प्रकरण 7 पद 284
काजळां मोतीं वियें ? । राखोंडिया दीपु जिये ? ।
तरी ज्ञान धर्मु होये । अज्ञानाचा ॥ 7-284॥
प्रकरण 7 पद 285
चंद्रमा निगती ज्वाळा ? । आकाश आते शिळा ? ।
तरी अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥ 7-285॥
प्रकरण 7 पद 286
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट ।
परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ 7-286॥
प्रकरण 7 पद 287
ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें ।
पुढती ज्ञान एकलें । अज्ञान नाहीं ॥ 7-287॥
प्रकरण 7 पद 288
म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा ।
ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपू ॥ 7-288॥
प्रकरण 7 पद 289
प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वंचे घेईं चुकी ।
म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ 7-289॥
प्रकरण 7 पद 290
विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा ।
श्रुति काय वायसा । ढेंकर देती ॥ 7-290॥
प्रकरण 7 पद 291
यालागीं वस्तुप्रभा । वस्तूचि पावे शोभा ।
जात असे लाभा । वस्तुचिया ॥ 7-291॥
प्रकरण 7 पद 292
वांचून वस्तु यया । आपणपें प्रकाशावया ।
अज्ञान हेतु वांया । अवघेंचि ॥ 7-292॥
प्रकरण 7 पद 293
म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोणे परी न लाहों ।
अज्ञान कीर वावो । पाहों ठेलियाही ॥ 7-293॥
प्रकरण 7 पद 294
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा ।
रात्रीचिया घरा । गेलियाही ॥ 7-294॥
प्रकरण 7 पद 295
कां नीद खोळे भरिता । जागणें ही न ये हाता ।
येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ 7-295॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे अज्ञानखंडन नाम सप्तम प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 8
प्रकरण 8 पद 1
प्रकरण आठवें
ज्ञानखण्डन
तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ 8-1॥
प्रकरण 8 पद 2
परी आम्हा आम्ही आहों । तें कैसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥ 8-2॥
प्रकरण 8 पद 3
हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥ 8-3॥
प्रकरण 8 पद 4
अहो आत्मपणीं न संठो । स्वसंविति न घसवटो ।
आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥ 8-4॥
प्रकरण 8 पद 5
आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥ 8-5॥
प्रकरण 8 पद 6
आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो ।
तैं आमुतें न देखों । आम्हीपणा ॥ 8-6॥
प्रकरण 8 पद 7
प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलाहो ।
परी कैसेनिही विपावो । असणेयाचा ॥ 8-7॥
प्रकरण 8 पद 8
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ 8-8॥
प्रकरण 8 पद 9
तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडु कासया ।
केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ॥ 8-9॥
प्रकरण 8 पद 10
अज्ञानाचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥ 8-10॥
प्रकरण 8 पद 11
राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांचुनि सूर्यासवें । शिणणें होये ॥ 8-11॥
प्रकरण 8 पद 12
म्हणोनि अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ 8-12॥
प्रकरण 8 पद 13
येर्क्ष्हवीं तर्क्ष्ही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लाविलीं ॥ 8-13॥
प्रकरण 8 पद 14
जैसीं दंपत्तें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें ।
तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ 8-14॥
प्रकरण 8 पद 15
कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये ।
दिठी आंधारें पाहे । तैं तेचि वृथा ॥ 8-15॥
प्रकरण 8 पद 16
तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे ।
आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥ 8-16॥
प्रकरण 8 पद 17
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ 8-17॥
प्रकरण 8 पद 18
आणि जाणे तोचि नेणें । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असेणे जिणें । ज्ञाना अज्ञाना ? ॥ 8-18॥
प्रकरण 8 पद 19
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ 8-19॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं
संपूर्णम्॥
प्रकरण 9
प्रकरण 9 पद 1
प्रकरण नववें
जीवन्मुक्तदशाकथन
आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठले । लोचनेसी ॥ 9-1॥
प्रकरण 9 पद 2
आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें ।
कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ 9-2॥
प्रकरण 9 पद 3
जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ 9-3॥
प्रकरण 9 पद 4
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर ।
जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ 9-4॥
प्रकरण 9 पद 5
दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा ।
घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ 9-5॥
प्रकरण 9 पद 6
चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ ।
रस झाले सकळ । रसनावंत ॥ 9-6॥
प्रकरण 9 पद 7
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ 9-7॥
प्रकरण 9 पद 8
सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी ।
पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ 9-8॥
प्रकरण 9 पद 9
तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी ।
अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ 9-9॥
प्रकरण 9 पद 10
म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे ।
सैंघ घेती धांवे । समोरही ॥ 9-10॥
प्रकरण 9 पद 11
परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे ।
तैसे झाले धांवे । वृत्तीचिया ॥ 9-11॥
प्रकरण 9 पद 12
नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण ।
घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ 9-12॥
प्रकरण 9 पद 13
वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ ।
तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ 9-13॥
प्रकरण 9 पद 14
हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु ।
जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ 9-14॥
प्रकरण 9 पद 15
तर्ही परिमळा परौतें । मिरवणें नाहीं कापुरातें ।
तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ 9-15॥
प्रकरण 9 पद 16
म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात ।
घ्यावया जेथ । उजू होती ॥ 9-16॥
प्रकरण 9 पद 17
तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे ।
मग असतचि आहे । संबंधु ना ॥ 9-17॥
प्रकरण 9 पद 18
जिये पेरीं दिसती उसीं । तिये लाभती कीं रसीं ।
कांति जेवीं शशीं । पुनवेचिया ॥ 9-18॥
प्रकरण 9 पद 19
पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं जालें वरषणें ।
विषयां करणें । भेटती तैशीं ॥ 9-19॥
प्रकरण 9 पद 20
म्हणोन तोंडा आड पडे । तेंहि वाचा वावडे ।
परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ 9-20॥
प्रकरण 9 पद 21
व्यापाराचे गाडे । मोडतांहि आपाडे ।
अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥ 9-21॥
प्रकरण 9 पद 22
पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें ।
परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥ 9-22॥
प्रकरण 9 पद 23
तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया ।
शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥ 9-23॥
प्रकरण 9 पद 24
स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा ।
उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ 9-24॥
प्रकरण 9 पद 25
तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? ।
तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ 9-25॥
प्रकरण 9 पद 26
चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ।
विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ 9-26॥
प्रकरण 9 पद 27
प्रत्याहारादि आंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं ।
तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ 9-27॥
प्रकरण 9 पद 28
येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी बाधावणें ।
आतां प्रत्यण्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ 9-28॥
प्रकरण 9 पद 29
द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ 9-29॥
प्रकरण 9 पद 30
कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा ।
झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ 9-30॥
प्रकरण 9 पद 31
घरामाजीं पायें । चालतां मार्गूही तोचि होये ।
ना बैसे तर्क्ष्ही आहे । पावणेंचि ॥ 9-31॥
प्रकरण 9 पद 32
तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ।
ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ 9-32॥
प्रकरण 9 पद 33
आठवू आणि विसरू । तयातेंही घेऊं नेदी पसरु ।
दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ 9-33॥
प्रकरण 9 पद 34
जाली स्वेच्छाचि विधि । स्वैर जाली समाधी ।
दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ 9-34॥
प्रकरण 9 पद 35
जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ 9-35॥
प्रकरण 9 पद 36
भलतेउतेनि देवें । भलतेन भक्त होआवें ।
बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ 9-36॥
प्रकरण 9 पद 37
देवाचिया दाटणी । देऊळा जाली आटणी ।
देशकाळादि वाहाणीं । येईचिना ॥ 9-37॥
प्रकरण 9 पद 38
देवीं देवोचि न माये । मा देवी कें अन्वयो आहे ? ।
येथ परिवारु बहुये । अघडता कीं ॥ 9-38॥
प्रकरण 9 पद 39
ऐसाहि स्वामीभृत्यसंबंधा- । लागीं उठलीं श्रद्धा ।
तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ 9-39॥
प्रकरण 9 पद 40
अवघियाचि उपचारा । जपध्यान निर्धारा ।
नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ 9-40॥
प्रकरण 9 पद 41
आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें ।
अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ 9-41॥
प्रकरण 9 पद 42
पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया ।
परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥ 9-42॥
प्रकरण 9 पद 43
देव देऊळ परिवारू । कीजे कोरूनि डोंगरु ।
तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥ 9-43॥
प्रकरण 9 पद 44
अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे ।
केलें देवपण तैसें । दोहींपरी ॥ 9-44॥
प्रकरण 9 पद 45
अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां ।
मा अखतीं काय आतां । पुजो जावो ॥ 9-45॥
प्रकरण 9 पद 46
दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी ।
हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥ 9-46॥
प्रकरण 9 पद 47
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं ले कां ।
तर्क्ष्ही तो असिका । तियाचि कीं ना ॥ 9-47॥
प्रकरण 9 पद 48
आगीपण आगी । असतचि असे आंगीं ।
मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥ 9-48॥
प्रकरण 9 पद 49
म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां काय नव्हे ? ।
ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवूचि असे ॥ 9-49॥
प्रकरण 9 पद 50
अतां भक्ति अभक्ति । जालें ताट एकी पांती ।
कर्माकर्माचिया वाती । माल्हावूनियां ॥ 9-50॥
प्रकरण 9 पद 51
म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ 9-51॥
प्रकरण 9 पद 52
ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती ।
मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ 9-52॥
प्रकरण 9 पद 53
घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होत जाय ।
शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ 9-53॥
प्रकरण 9 पद 54
चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ।
नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ 9-54॥
प्रकरण 9 पद 55
येर्क्ष्हवीं आडोळिलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।
भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ 9-55॥
प्रकरण 9 पद 56
ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं ।
देवा भक्ता दोही । एकचि पाडू ॥ 9-56॥
प्रकरण 9 पद 57
आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे ।
तेणें उंदळता दाटे । आपणपांचि ॥ 9-57॥
प्रकरण 9 पद 58
ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं ।
तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥ 9-58॥
प्रकरण 9 पद 59
कर्माचा हातु न लगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे ।
ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥ 9-59॥
प्रकरण 9 पद 60
निफजे ना निमे । आंगें आंग घुमे ।
सुखा सुख उपमे । देववेल इया ॥ 9-60॥
प्रकरण 9 पद 61
कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म ।
योगज्ञानादिविश्राम । भूमिका हे ॥ 9-61॥
प्रकरण 9 पद 62
आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले ।
होते तेही आटले । हरिहर येथें ॥ 9-62॥
प्रकरण 9 पद 63
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।
ग्रहण जालें एकसरें । सर्वग्रासें ॥ 9-63॥
प्रकरण 9 पद 64
वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी ।
टाकली निदैजौनी । परा येथें ॥ 9-64॥
प्रकरण 9 पद 65
शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि ।
घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥ 9-65॥
प्रकरण 9 पद 66
चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें ।
आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ 9-66॥
प्रकरण 9 पद 67
आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें ।
हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ 9-67॥
प्रकरण 9 पद 68
कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी ।
कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ 9-68॥
प्रकरण 9 पद 69
गुरुत्वें जेवढा चांगू । तेवढाचि तारूनि लघू ।
गुरु लघु जाणे जो पांगू । तुझा करी ॥ 9-69॥
प्रकरण 9 पद 70
शिष्या देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे ।
तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ 9-70॥
प्रकरण 9 पद 71
किंबहुना ये दातारा । मी तूं याचा संसारा ।
वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ 9-71॥
॥ इति श्रीमदमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं
प्रकरणं संपूर्णम्॥
प्रकरण 10
प्रकरण 10 पद 1
प्रकरण दहावें
ग्रंथपरिहार
परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तुया ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ 10-1॥
प्रकरण 10 पद 2
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सूति ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ 10-2॥
प्रकरण 10 पद 3
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि काई येतुलें ।
कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागू ॥ 10-3॥
प्रकरण 10 पद 4
दिवा जो उजेडू । तो घराचाची सुरवाडू ।
गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ 10-4॥
प्रकरण 10 पद 5
अगाधें ही उचंबळती । ते चंद्रीची ना शक्ती ? ।
वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ 10-5॥
प्रकरण 10 पद 6
म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य ।
वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥ 10-6॥
प्रकरण 10 पद 7
आणि हा येवढा ऐसा । परिहारु देऊं कायसा ।
प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥ 10-7॥
प्रकरण 10 पद 8
आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रगटची असे ठाईं ।
मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥ 10-8॥
प्रकरण 10 पद 9
नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ।
तरी काय जनीं जन । दिसते ना ? ॥ 10-9॥
प्रकरण 10 पद 10
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां ।
कोण्ही नहोनि आइता । सिद्धांतचि हा ॥ 10-10॥
प्रकरण 10 पद 11
यया परौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं ।
आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ 10-11॥
प्रकरण 10 पद 12
तर्क्ष्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो ।
तर्ही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ 10-12॥
प्रकरण 10 पद 13
पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची ।
म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ 10-13॥
प्रकरण 10 पद 14
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलोनियां ।
ऐसें नाहीं आपसया । प्रकाशूचि ॥ 10-14॥
प्रकरण 10 पद 15
आणि पूर्णाहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों ।
मा लोपलों ना प्रगटलों । कोण्ही होऊनी । 10-15॥
प्रकरण 10 पद 16
आपणया आपणपें । निरूपण काय वोपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥ 10-16॥
प्रकरण 10 पद 17
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंही मौन करी ।
हे पाणियावरी मकरी । रेखिलीयां ॥ 10-17॥
प्रकरण 10 पद 18
एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ।
देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ 10-18॥
प्रकरण 10 पद 19
ज्ञानदेव म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत ।
सेंवूनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ 10-19॥
प्रकरण 10 पद 20
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ ।
परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥ 10-20॥
प्रकरण 10 पद 21
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे ।
हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ 10-21॥
प्रकरण 10 पद 22
प्रिया सावायिली होये । तै आंगीचे आंगीं न समाये ।
येर्क्ष्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ 10-22॥
प्रकरण 10 पद 23
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला ।
गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ 10-23॥
प्रकरण 10 पद 24
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ 10-24॥
प्रकरण 10 पद 25
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद ।
अनुभवामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ 10-25॥
प्रकरण 10 पद 26
गंगावगहना आली । पाणीयें गंगा झालीं ।
कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ 10-26॥
प्रकरण 10 पद 27
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी ।
मग पंधरावियाच्या पटीं । बैसावें कीं ॥ 10-27॥
प्रकरण 10 पद 28
तैसें जें या अक्षरा । भेटती गाभारां ।
ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ 10-28॥
प्रकरण 10 पद 29
जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ 10-29॥
प्रकरण 10 पद 30
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी ।
किंबहुना सरोभरीं । श्रीशिवेंशीचि ॥ 10-30॥
प्रकरण 10 पद 31
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें । विश्वाचेनि ॥ 10-31॥
॥ इति अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं
संपूर्णम्॥
परिचय
श्री संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा स्वतंत्र तत्त्वज्ञानपर ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणे तो भाष्य नसून, शिव-शक्ती-अद्वैत, वाणीचे स्वरूप, अज्ञानाचे खंडन आणि सहजस्थिती या विषयांचे मूळ विवेचन ओवीबद्ध रूपात करतो. दहा प्रकरणांत विभागलेला हा ग्रंथ मराठी तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील एक शिखर मानला जातो.
संदर्भ 1
- अमृतानुभव — sanskritdocuments.org
मूळ मराठी पाठ जसाच्या तसा; प्रत्येक ओवी अक्षरशः पडताळून घेतली आहे.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.