चांगदेव पासष्टी
आकार
मांडणी
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ 1 ॥
प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ 2 ॥
बहु जंव जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।
कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ 3 ॥
सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ 4 ॥
कल्लोळ कंचुक । न फेडितां उघडें उदक ।
तेंवी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ 5 ॥
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ 6 ॥
कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें ।
कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥7 ॥
म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टृअत्व वर्ते ।
तें मी नेणें, आइते । ऐसेंचि असे ॥ 8 ॥
जेंवी नाममात्र लुगडें । येर्हवीं सुतचि तें उघडें ।
कां माती मृद्भांडें । जयापरी ॥ 9 ॥
तेंवी द्रष्टा दृश्य दशे- । अतीत दृङ्मात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ 10 ॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ 11 ॥
तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ 12 ॥
नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ 13 ॥
बांधियाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ 14 ॥
घडियेचेनि आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।
तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ 15 ॥
न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।
होय आपणया सन्मुख । आपणचि जो ॥ 16 ॥
तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्टृत्वा आणिजे जेणें ।
बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ 17 ॥
तेंवी आपणचि आपुला पोटीं । आपणया दृश्य दावित उठी ।
दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ 18 ॥
सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें ।
तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ 19 ॥
नुसधें मुख जैसें । देखिजतसें दर्पणमिसें ।
वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ 20 ॥
तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।
हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ 21 ॥
दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्टृत्व होय संसारा ।
या दोहींमाजिला अंतरा । दृष्टि पंगु होय ॥ 22 ॥
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टि घेऊनि असे काई ? ।
आणि दृश्येंविण कांहीं । दृष्टृअत्व होणें । 23 ॥
म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि, द्रष्टृत्व होणें ।
पुढती तें गेलिया, जाणें । तैसेचि दोन्ही ॥ 24 ॥
एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ 25 ॥
दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतांचि असे मुखीं ।
माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ 26 ॥
पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे ।
परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ 27 ॥
म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टृत्वा वेगळें ।
वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ 28 ॥
वाद्यजातेविण ध्वनी । काष्ठजातेविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ 29 ॥
जें म्हणतां नये कांहीं । जाणो न ये कैसेही ।
असतचि असे, पाही । असणें जया ॥ 30 ॥
आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।
तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ 31 ॥
जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं ।
परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ 32 ॥
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे ।
नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ 33 ॥
नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।
नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ 34 ॥
जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।
हें असो, आपणिया आपण । आपणचि जें ॥ 35 ॥
जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ 36 ॥
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ 37 ॥
ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । 38 ॥
बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ 39 ॥
सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ 40 ॥
गोडिये आपुलि गोडी । घेतां काय न माये तोंडी ।
आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ 41 ॥
सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।
कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ 42 ॥
घेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येवों पाहे मन ।
तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ 43 ॥
कांहीं करी, बोले, कल्पी । कां न करी, न बोले, न कल्पी ।
ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ 44 ॥
चांगया ! तुझेनि नांवे । करणें, न करणें न व्हावें ।
हें काय म्हणों, परि न धरवे । मीपण हें ॥ 45 ॥
लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
तंव तेंचि नाहीं, मा काय घेवो । माप जळा ? ॥ 46 ॥
तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।
तेथें तूं कैचा काई । कल्पावया जोगा ॥ 47 ॥
जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।
तेंवि तूंतें देखोनि मी ठाके । कांहीं नहोनि ॥ 48 ॥
अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।
परी मी आहें हें कांहीं । न वचेचि जेंवि ॥ 49 ॥
तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ 50 ॥
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ 51 ॥
तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि ।
मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ 52 ॥
आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ 53 ॥
रुचितयाचेनि मिसें । रुचितें जेविजे जैसें ।
कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ 54 ॥
तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली ।
रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ 55 ॥
इयेतें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।
दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ 56 ॥
तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।
आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ 57 ॥
जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।
गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ 58 ॥
ज्ञानदेव म्हणे नामरूपें- । विण तुझें साच आहे आपणपें ।
तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ 59 ॥
चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।
वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ 60 ॥
चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे ।
स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ 61 ॥
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ 62 ॥
तियेपरि जो इया । दर्पण करील ओविया ।
तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ 63 ॥
नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।
असें तेंचि नेणों, आपैसे । तें कीं होइहे ॥ 64 ॥
निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
केलें तैसें गुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ 65 ॥
पद 1

पद 2

पद 3
बहु जंव जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।
कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ 3 ॥
पद 4
सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ 4 ॥
पद 5
कल्लोळ कंचुक । न फेडितां उघडें उदक ।
तेंवी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ 5 ॥
पद 6
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ 6 ॥
पद 7
कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें ।
कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥7 ॥
पद 8
म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टृअत्व वर्ते ।
तें मी नेणें, आइते । ऐसेंचि असे ॥ 8 ॥
पद 9
जेंवी नाममात्र लुगडें । येर्हवीं सुतचि तें उघडें ।
कां माती मृद्भांडें । जयापरी ॥ 9 ॥
पद 10
तेंवी द्रष्टा दृश्य दशे- । अतीत दृङ्मात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ 10 ॥
पद 11
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ 11 ॥
पद 12
तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ 12 ॥
पद 13
नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ 13 ॥
पद 14
बांधियाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ 14 ॥
पद 15
घडियेचेनि आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।
तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ 15 ॥
पद 16
न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।
होय आपणया सन्मुख । आपणचि जो ॥ 16 ॥
पद 17
तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्टृत्वा आणिजे जेणें ।
बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ 17 ॥
पद 18
तेंवी आपणचि आपुला पोटीं । आपणया दृश्य दावित उठी ।
दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ 18 ॥
पद 19
सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें ।
तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ 19 ॥
पद 20
नुसधें मुख जैसें । देखिजतसें दर्पणमिसें ।
वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ 20 ॥
पद 21
तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।
हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ 21 ॥
पद 22
दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्टृत्व होय संसारा ।
या दोहींमाजिला अंतरा । दृष्टि पंगु होय ॥ 22 ॥
पद 23
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टि घेऊनि असे काई ? ।
आणि दृश्येंविण कांहीं । दृष्टृअत्व होणें । 23 ॥
पद 24
म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि, द्रष्टृत्व होणें ।
पुढती तें गेलिया, जाणें । तैसेचि दोन्ही ॥ 24 ॥
पद 25
एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ 25 ॥
पद 26
दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतांचि असे मुखीं ।
माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ 26 ॥
पद 27
पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे ।
परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ 27 ॥
पद 28
म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टृत्वा वेगळें ।
वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ 28 ॥
पद 29
वाद्यजातेविण ध्वनी । काष्ठजातेविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ 29 ॥
पद 30
जें म्हणतां नये कांहीं । जाणो न ये कैसेही ।
असतचि असे, पाही । असणें जया ॥ 30 ॥
पद 31
आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।
तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ 31 ॥
पद 32
जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं ।
परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ 32 ॥
पद 33
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे ।
नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ 33 ॥
पद 34
नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।
नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ 34 ॥
पद 35
जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।
हें असो, आपणिया आपण । आपणचि जें ॥ 35 ॥
पद 36
जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ 36 ॥
पद 37
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ 37 ॥
पद 38
ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । 38 ॥
पद 39
बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ 39 ॥
पद 40
सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ 40 ॥
पद 41
गोडिये आपुलि गोडी । घेतां काय न माये तोंडी ।
आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ 41 ॥
पद 42
सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।
कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ 42 ॥
पद 43
घेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येवों पाहे मन ।
तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ 43 ॥
पद 44
कांहीं करी, बोले, कल्पी । कां न करी, न बोले, न कल्पी ।
ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ 44 ॥
पद 45
चांगया ! तुझेनि नांवे । करणें, न करणें न व्हावें ।
हें काय म्हणों, परि न धरवे । मीपण हें ॥ 45 ॥
पद 46
लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
तंव तेंचि नाहीं, मा काय घेवो । माप जळा ? ॥ 46 ॥
पद 47
तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।
तेथें तूं कैचा काई । कल्पावया जोगा ॥ 47 ॥
पद 48
जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।
तेंवि तूंतें देखोनि मी ठाके । कांहीं नहोनि ॥ 48 ॥
पद 49
अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।
परी मी आहें हें कांहीं । न वचेचि जेंवि ॥ 49 ॥
पद 50
तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ 50 ॥
पद 51
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ 51 ॥
पद 52
तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि ।
मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ 52 ॥
पद 53
आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ 53 ॥
पद 54
रुचितयाचेनि मिसें । रुचितें जेविजे जैसें ।
कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ 54 ॥
पद 55
तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली ।
रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ 55 ॥
पद 56
इयेतें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।
दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ 56 ॥
पद 57
तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।
आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ 57 ॥
पद 58
जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।
गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ 58 ॥
पद 59
ज्ञानदेव म्हणे नामरूपें- । विण तुझें साच आहे आपणपें ।
तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ 59 ॥
पद 60
चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।
वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ 60 ॥
पद 61
चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे ।
स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ 61 ॥
पद 62
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ 62 ॥
पद 63
तियेपरि जो इया । दर्पण करील ओविया ।
तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ 63 ॥
पद 64
नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।
असें तेंचि नेणों, आपैसे । तें कीं होइहे ॥ 64 ॥
पद 65
निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
केलें तैसें गुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ 65 ॥
परिचय
चांगदेव पासष्टी ही श्री संत ज्ञानेश्वरांनी योगी चांगदेवांना लिहिलेल्या पत्ररूप पासष्ट ओव्यांची रचना आहे. चांगदेवांनी कोरा कागद पाठवला, त्यास उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी हे अद्वैतबोधाचे सार लिहिले अशी परंपरा सांगते. नामाच्या पलीकडील शुद्ध अनुभवाचे वर्णन हा या रचनेचा विषय आहे.
संदर्भ 1
- चांगदेव पासष्टी — sanskritdocuments.org
मूळ मराठी पाठ जसाच्या तसा; प्रत्येक ओवी अक्षरशः पडताळून घेतली आहे.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.