कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
आकार
मांडणी
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डवनृत्य करिसी तातक् धिम ताथा ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसावीनंदन गातो कवितांशी ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डवनृत्य करिसी तातक् धिम ताथा ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसावीनंदन गातो कवितांशी ॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
संदर्भ 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
प्रकाशित पाठ प्रमाणित ITRANS स्रोताशी पडताळलेला.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.