तुकाराम गाथा — अभंग 901–1200
आकार
मांडणी
द्रव्याचा तो आह्मी धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥1॥
करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥2॥
तुका ह्मणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥3॥
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । ह्मणोनियां संग खोटा त्याचा ॥1॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥2॥
प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥3॥
तुका ह्मणे घेइप राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥4॥
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥1॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥2॥
तुका ह्मणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा ह्मणउनी ॥3॥
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥1॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥2॥
तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥3॥
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥
मुखीं वाणी कानीं कीतिऩ । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥1॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥2॥
तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥1॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥2॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥3॥
तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥2॥
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥1॥
भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥2॥
तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥3॥
तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥4॥
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥1॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥2॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥3॥
तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥4॥
धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥1॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥2॥
अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥3॥
साधनाची सििद्ध । मोन करा िस्थर बुिद्ध ॥4॥
तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥5॥
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥1॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥2॥
तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥3॥
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥1॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥2॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥3॥
तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥4॥
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥1॥
साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥2॥
तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥3॥
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥1॥
वोळगती जया अष्टमासििद्ध । ते या जनबुद्धी नातळती ॥2॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥3॥
लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥4॥
तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥5॥
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥1॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥2॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥3॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥4॥
तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥5॥
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥1॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥2॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥3॥
तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥4॥
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥1॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥2॥
तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥3॥
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥1॥
होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥2॥
तुका ह्मणे माझें । काय होइऩल तुह्मां ओझें ॥3॥
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥1॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥2॥
तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥3॥
कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥1॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥3॥
आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥1॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥2॥
तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥3॥
न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥1॥
पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥
बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥3॥
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥1॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥2॥
तुका ह्मणे समपिऩला । तुज विठ्ठला देहभाव ॥3॥
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥1॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥2॥
तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥3॥
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोिळयांची भूक न वजे माझी ॥1॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥2॥
महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥3॥
तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥4॥
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥1॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥2॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥3॥
तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥4॥
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥1॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृिष्ट हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥2॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥3॥
तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥4॥
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥1॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥2॥
तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥3॥
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥1॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥2॥
तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥3॥
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥1॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वदऩळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥2॥
तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥3॥
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥1॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥2॥
तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥3॥
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥1॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥2॥
तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥3॥
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥1॥
लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥2॥
बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥3॥
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥1॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥2॥
तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावइऩल ॥3॥
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥1॥
आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥2॥
तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥3॥
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥
तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥1॥
होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥2॥
तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥3॥
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥1॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥2॥
तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥3॥
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काइऩ । स्वहित तें ठायीं आपणापें ॥1॥
मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥2॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥3॥
तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होइऩल त्यांचा ॥4॥
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥1॥
कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥2॥
ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥3॥
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥1॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥2॥
तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥3॥
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥
तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥1॥
तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥2॥
तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥3॥
लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥1॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥2॥
तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥3॥
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥1॥
उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥
ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥2॥
एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥3॥
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥1॥
आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥2॥
तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥3॥
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥1॥
मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥2॥
तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥3॥
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥1॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥2॥
तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥3॥
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥1॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥2॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥3॥
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥1॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥2॥
तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥3॥
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥1॥
आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥2॥
तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥3॥
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥1॥
आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥2॥
तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥3॥
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥1॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सवाौत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आह्मां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥3॥
आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥
जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥
तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥1॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥3॥
तुह्मां होइऩल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥1॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥2॥
तुका ह्मणे देह देइऩन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥3॥
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥1॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥2॥
तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥3॥
काय कृपेविण घालावें सांकडें । नििंश्चती निवाडें कोण्या एका ॥1॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥2॥
तुका ह्मणे आह्मी भावहीन जीव । ह्मणउनी देव दुरे दुरी ॥3॥
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥1॥
अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान नििंश्चतीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥2॥
तुका ह्मणे तुह्मां लाज येत नाहीं । आह्मां चिंताडोहीं बुडवितां ॥3॥
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥1॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥3॥
ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥1॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥2॥
तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥3॥
वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥1॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुह्मी धीर । होइऩल िस्थर मन ठायीं ॥2॥
तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥3॥
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥1॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥2॥
तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥3॥
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥1॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥
स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥2॥
तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥3॥
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥1॥
नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥2॥
आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥3॥
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥1॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥2॥
तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥3॥
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥1॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥
तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥2॥
तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥3॥
मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥2॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥3॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥4॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥5॥
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥1॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥2॥
तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥3॥
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥1॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुिद्ध करुनी ठेवा ॥ध्रु.॥
विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥2॥
तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥3॥
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥1॥
उदंड त्या गाइऩ ह्मैसी आणि शेऑया । परि त्या निराऑया कामधेनु ॥2॥
तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥3॥
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥1॥
सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥
मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥2॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥3॥
बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥4॥
तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥5॥
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥1॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥2॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥3॥
तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥4॥
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥1॥
गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥2॥
तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥3॥
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥
तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥3॥
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥1॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभािळलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥2॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥3॥
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥1॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥2॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥3॥
तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥4॥
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥1॥
जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥2॥
तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥3॥
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होइऩल त्या साहे पांडुरंग ॥1॥
पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥2॥
तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥3॥
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥1॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाइऩन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥2॥
तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभािळता ॥3॥
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता काुंफ्ज अंगीं ॥1॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काइऩ । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुिद्ध ॥2॥
तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥3॥
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥1॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥2॥
मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥3॥
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥1॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥2॥
तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥3॥
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥1॥
जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥2॥
तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥3॥
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥1॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काइऩ । अवघें पायीं विदित ॥2॥
तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥3॥
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥
देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥1॥
साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥2॥
तुका ह्मणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥3॥
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥1॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देइऩल ॥ध्रु.॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥2॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥3॥
कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥1॥
अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि नििंश्चत जालों देवा ॥ध्रु.॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥2॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥3॥
तुका ह्मणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेइप देवा ॥4॥
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥1॥
देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन िस्थर नाहीं ॥ध्रु.॥
बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥2॥
होइऩल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हा चि मज ॥3॥
तुका ह्मणे मी कमाइऩचे हीण। ह्मणऊनि सीण करीं देवा ॥4॥
ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥1॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥2॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥3॥
तुका ह्मणे वांयां जालों भूमी भार । होइऩल विचार काय नेणों ॥4॥
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥1॥
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥
शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइप निवडूनि ॥2॥
उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥4॥
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥1॥
जन वन आह्मां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥2॥
ह्मणऊनिं मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥3॥
ह्मणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥4॥
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥1॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥2॥
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥3॥
तुका ह्मणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥4॥
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥1॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥2॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥3॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका ह्मणे आतां शरण आलों ॥4॥
तुझा दास ऐसा ह्मणती लोकपाळ । ह्मणऊनि सांभाळ करीं माझा ॥1॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥
माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥2॥
नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥3॥
तुका ह्मणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥4॥
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥1॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥2॥
जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥3॥
तुका ह्मणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥4॥
मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥1॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥
गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥
पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥
तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6॥
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥1॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥2॥
न करावी निरास न धरावें उदास । देइप याचकास कृपादान ॥3॥
तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देइप पायापासीं ठाव देवा ॥4॥
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अिग्न जैसा ॥1॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥
घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥2॥
नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वताौनि तो जनीं जनादऩन ॥3॥
तुका ह्मणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥4॥
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1॥
सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥
गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥
संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥
तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4॥
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥1॥
न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥
न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥2॥
न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥3॥
तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥4॥
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥1॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होइऩल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥2॥
करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥3॥
तुका ह्मणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥4॥
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1॥
तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥
जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥
तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5॥
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥1॥
न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥
मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥2॥
सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥3॥
ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥4॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइप देवा ॥5॥
शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥1॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥
गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥2॥
भागलियाचा होइप रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥3॥
अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥4॥
तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥5॥
कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥1॥
कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥2॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥3॥
कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥4॥
तुका ह्मणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥5॥
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥1॥
अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥2॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥3॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥4॥
तुका ह्मणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥5॥
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥1॥
गोपाळांची पूजा उिच्छष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥2॥
निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥3॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥4॥
तुका ह्मणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥5॥
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥1॥
आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥
न ह्मणे सोइरा सुहुदऩ आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥3॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥3॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥4॥
तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥5॥
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥1॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥2॥
तुका ह्मणे माप । खरें आणा माझे बाप ॥3॥
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥1॥
प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहे लोकाचार पडे अवघा विसर ॥2॥
तुका ह्मणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥3॥
टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥1॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥2॥
तुका ह्मणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥3॥
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥1॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुह्मां आह्मां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥
बोलतां दुिश्चती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये ह्मणतां मी माझें ॥2॥
भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥3॥
नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥4॥
तुह्मां आह्मां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका ह्मणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥5॥
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥1॥
आह्मां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । वाहूं रखुमाइऩचा पती ॥3॥
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥1॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥2॥
तुका ह्मणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥3॥
आतां आह्मां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥1॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥2॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥3॥
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥1॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥2॥
तुका ह्मणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥3॥
न करावी स्तुति माझी संतजनीं । होइऩल या वचनीं अभिमान ॥1॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥2॥
तुका ह्मणे गर्व पुरवील पाठी । होइऩल माझ्या तुटी विठोबाची ॥3॥
चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥1॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुिद्धहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥2॥
तुका ह्मणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥3॥
समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥1॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥2॥
तुका ह्मणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥3॥
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥1॥
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥2॥
तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥3॥
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥1॥
शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥2॥
वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥3॥
जन मानविलें वरी बाहएात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥1॥
ह्मणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥2॥
तुका ह्मणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥3॥
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥1॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥2॥
तुका ह्मणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥3॥
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥1॥
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥
रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥2॥
तुका ह्मणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥3॥
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥1॥
आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥
बहु काकुलती । आलों मागें किती ॥2॥
तुका ह्मणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥3॥
पाइऩक - अभंग 11
पाइऩकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥1॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥
तरि व्हावें पाइऩक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥2॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥3॥
तुका ह्मणे एका क्षणांचा करार । पाइऩक अपार सुख भोगी ॥4॥
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । ह्मणोनियां जीवें केली साटीं ॥1॥
येतां गोऑया बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृिष्ट वरी ॥ध्रु.॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥2॥
पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥3॥
तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥4॥
पाइऩक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥1॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाइऩक त्या जग स्वामी मानी ॥2॥
ऐसें जन केलें पाइकें पाइऩक । जया कोणी भीक न घलिती ॥3॥
तुका ह्मणे ऐसे जयाचे पाइऩक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥4॥
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥1॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥2॥
सांडितां मारग मारिती पाइऩक । आणिकांसी शीक लागावया ॥3॥
तुका ह्मणे विश्वा घेऊनि विश्वास । पाइऩक तयास सुख देती ॥4॥
पाइऩक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥1॥
तो एक पाइऩक पाइकां नाइऩक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥2॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥3॥
तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥4॥
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥1॥
जिवाचे उदार शोभती पाइऩक । मिरवती नाइऩक मुगुटमणि ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥2॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥3॥
तुका ह्मणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥4॥
पाइकपणें खरा मुशारा । पाइऩक तो खरा पाइकीनें ॥1॥
पाइऩक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाइऩक तो पणें निवडला ॥2॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥3॥
तुका ह्मणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥4॥
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥1॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाइऩक तो नांव मिरवी वांयां ॥2॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥3॥
तुका ह्मणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइऩक पाहोन मोल करी ॥4॥
एका च स्वामीचे पाइऩक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥1॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥
हीन कमाइऩचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥2॥
पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढएा ठाव ॥3॥
तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥4॥
प्रजी तो पाइऩक ओळीचा नाइऩक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥1॥
आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥
पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥2॥
घेइऩल दरवडा देहा तो पाइऩक । मारी सकळीक सर्व हरी ॥3॥
तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाइऩचा पण सिद्धी पावे ॥4॥
जातीचा पाइऩक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥1॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥2॥
तुका ह्मणे नमूं देव ह्मुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥3॥
॥11॥
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥1॥
आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥
अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥2॥
यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥3॥
तुका ह्मणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥4॥
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुह्मां लागे कोडें उगवणें ॥1॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुह्मां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥2॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आह्मां वचन सांपडलें ॥3॥
तुका ह्मणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥4॥
अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥1॥
पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥2॥
तुका ह्मणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥3॥
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥1॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥2॥
तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥3॥
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥1॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥2॥
तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥3॥
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥1॥
आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥
जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥2॥
तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रििद्धसिद्धी ॥3॥
॥घोंगडएाचे अभंग-॥12॥
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥1॥
पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥2 ॥
तुका ह्मणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥3॥
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥1॥
कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥
तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥2॥
तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥3॥
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥1॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेइप गोपाळा देइप झाडा ॥ध्रु.॥
मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥2॥
तुका ह्मणे बुिद्ध काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥3॥
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥1॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥2॥
तुका ह्मणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥3॥
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥1॥
चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥2॥
तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥3॥
तुह्मां आह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥1॥
माझें घोंगडें टाकुन देइप । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥2॥
तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥3॥
मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥1॥
घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥2॥
तुका ह्मणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥3॥
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥1॥
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥
नोळखवे म्यां धरिला हातीं । देहएादिप माय लाविली वाती ॥2॥
न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥3॥
आतां मी देवा पांघरों काइऩ । भिकेचें तें ही उरे चि ना ॥1॥
सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥
नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥2॥
तुका ह्मणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥3॥
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥1॥
मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥2॥
तुका ह्मणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥3॥
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥1॥
पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥2॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥3॥
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥1॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥
चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥2॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥3॥
आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥4॥
तुका ह्मणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥5॥ ॥12॥
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥1॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥2॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥3॥
गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥4॥
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥1॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥2॥
तुका ह्मणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥3॥
शीतळ साउली आमुची माउली । विठाइऩ वोळली प्रेमपान्हा ॥1॥
जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥2॥
आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥3॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥4॥
तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाइऩचें ॥5॥
रामचरित्र - अभंग ॥14॥
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥1॥
केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥2॥
तुका ह्मणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥3॥
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥1॥
तो हा न करी तें काइऩ । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥
सीळा मनुष्य जाली। ज्याच्या चरणाचे चाली ॥2॥
वानरां हातीं लंका । घेवविली ह्मणे तुका ॥3॥
राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥
तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥1॥
कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥
हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥2॥
जुन्हाट नागर नीच नवें । तुका ह्मणें म्यां धरिलें जीवें भावें ॥3॥
राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥1॥
राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥
राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत ह्मणतां राम ॥2॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥3॥
तुका ह्मणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥4॥
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥1॥
अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होइऩ शरणागत किंवा युद्धासी सादर ॥2॥
तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेइऩ आतां संवंघेसी तुटी ॥3॥
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥1॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥2॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥3॥
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥1॥
लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
उदार्याची सीमा । काय वणूप रघुरामा ॥2॥
तुका ह्मणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥3॥
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥1॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥
अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥2॥
स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥3॥
रावणेसी लंका। राम आपण जाला देखा ॥4॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥5॥
जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाइऩ वोळल्या ह्मैसी ॥1॥
राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥
स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥2॥
तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥3॥
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥1॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥2॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥3॥
नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥4॥
नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥5॥
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ।
जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका ।
मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2॥
हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।
करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ।
असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥4॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5॥
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें ।
हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2॥
असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।
महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3॥
कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची।
जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥4॥
मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय।
तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5॥
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अिग्न हा काष्ठ तेवीं ।
घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥1॥
तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥2॥
फळ कदऩळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ।
धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥3॥
असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें ।
कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥4॥
करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां ।
तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥5॥
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥1॥
ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों ।
भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥2॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये ।
करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥3॥ ॥6॥
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥1॥
ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा ह्मणउनी ॥ध्रु.॥
विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥3॥
येगा येगा पांडुरंगा । घेइऩ उचलुनि वोसंगा ॥1॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥2॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥3॥
तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥4॥
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥1॥
कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ कोंवळी ॥2॥
तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥
आह्मी उतराइऩ । भाव निरोपूनि पायीं ॥1॥
तुह्मी पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमचा हा नेम । तुह्मां उचित हा धर्म ॥2॥
तुका ह्मणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥3॥
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥1॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥2॥
तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥3॥
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥1॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुिप्त । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥2॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥3॥
तुका ह्मणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥4॥
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥1॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥2॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥3॥
तुका ह्मणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥4॥
सुरवर येती तीथॉ नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥1॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥2॥
निविऩषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥3॥
तुका ह्मणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेइप कोटि ॥4॥
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥1॥
वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥2॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जािळसी ॥3॥
देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥1॥
दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥2॥
तुका ह्मणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥3॥
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥1॥
ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पािळतां पिंडास गोड वाटे ॥2॥
देव ह्मणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥3॥
तुका ह्मणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥4॥
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥1॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥2॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वणिऩतां ते गुण न सरती ॥3॥
तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥4॥
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥1॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥2॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥3॥
तुका ह्मणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥4॥
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥1॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥2॥
चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥3॥
तुका ह्मणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥4॥
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥
तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥4॥
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥1॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥2॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । ह्मणोनि वासना आवरिली ॥3॥
तुका ह्मणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥4॥
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥1॥
सर्वभावें नाम गाइऩन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥2॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥3॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥4॥
जनीं जनादऩन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥1॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥
आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥
तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4॥
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1॥
चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥
तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3॥
धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥1॥
सुखें करावें कीर्तन हषॉ गावे हरिचे गुण। वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥2॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥3॥
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥1॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥2॥
तुका ह्मणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥3॥
दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥1॥
हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥2॥
तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥3॥
वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥1॥
करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥2॥
तुका ह्मणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥3॥
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥1॥
मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण। भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रििद्धसिद्धी ह्मणियारीं ॥2॥
सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥3॥
ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥4॥
तुका ह्मणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥5॥
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1॥
अविनाश सुख देइऩल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्याशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होइऩल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥
तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥4॥
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥1॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥
आणीक ही भोग आणिकां इंिद्रयांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥2॥
रूप दृिष्ट धाय पाहातां पाहातां। न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥3॥
तुका ह्मणे कां रे नाशिवंतासाटीं। देवासवें तुटी करितोसी ॥4॥
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देइऩल तो अन्नवस्त्रदाता ॥1॥
काय आह्मां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥2॥
न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥3॥
तुका ह्मणे लेइप अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥4॥
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥1॥
काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृित्तकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥2॥
तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥3॥
सेतावर - अभंग 3
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥
कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3॥
ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥6॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥
सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥10॥
वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥1॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥
चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥
2॥ डोळे झांकुनि राती ॥
कूर्पी पडे दिवसा जोती ॥3॥
पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥4॥
फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी ॥5॥
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1॥
सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुिद्ध व्हावीं दोनी ॥3॥
खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥4॥
तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5॥ ॥3॥
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥1॥
नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥2॥
तुका ह्मणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥3॥
उतराधिपदें - 22
क्या गाऊं कोइऩ सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥1॥
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥2॥
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥3॥
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥1॥
तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥
तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥2॥
कहे तुका जो साइप हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥3॥
मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥1॥
राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥
अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥2॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥3॥
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥1॥
काहे बडाइऩ दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥
और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥2॥
फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥3॥
हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥1॥
मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥
हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥2॥
देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥3॥
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥1॥
क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥
किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥2॥
कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥3॥
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥1॥
प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥2॥
तुका प्रभु दीनदयाला। वारि रे तुज पर हुं गोपाला ॥3॥
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥
इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥1॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥2॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥3॥
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥
हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥
जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥
आपे तरे त्याकी कोण बराइऩ । औरनकुं भलो नाम घराइऩ ॥ध्रु.॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥1॥
बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥2॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥3॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥4॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥5॥
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥
नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥1॥
उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥2॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥3॥
भले रे भाइऩ जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥1॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥2॥
कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥3॥
लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥
कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥1॥
नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥2॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥3॥
काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥
राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥1॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥2॥
राना रंग डोंगरकी राइऩ । कहे तुका करे इलाहि ॥3॥
काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥
केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥1॥
बाप भाइऩ लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥2॥
काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥3॥
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥
तनजोबनकी कोन बराइऩ । ब्याधपीडादि स काटहि खाइऩ ॥1॥
कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥2॥
कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोडहि हात ॥3॥
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥
मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥1॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥2॥
कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥3॥
रामभजन सब सार मिठाइऩ । हरि संताप जनमदुख राइऩ ॥ध्रु.॥
दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥1॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥2॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥3॥
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥
ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥1॥
रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥2॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥3॥
हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिइऩ लंका ॥ध्रु.॥
गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥1॥
वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥2॥
स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाइऩ तुकयाका ॥3॥ ॥22॥
॥ साख्या ॥ 30 ॥
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय।
भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥1॥
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।
बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥1॥
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम ।
माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥1॥
तुका पंखिबहिरन मानुं । बोइऩ जनावर बाग ।
असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥1॥
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर ।
तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥1॥
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार ।
चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥1॥
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम ।
बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥1॥
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।
हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥1॥
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख ।
आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥1॥
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥1॥
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥1॥
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥1॥
कहे तुका जग भुला रे । कहएा न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥1॥
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।
चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥1॥
तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥1॥
तुका माऱ्या पेटका । और न जाने कोये ।
जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥1॥
काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर ।
कहे तुका तुम्हें सुनो रे भाइऩ । हिरिदा जिन्होका कठोर ॥1॥
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये ।
निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥1॥
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद ।
बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥1॥
तुका दास रामका । मनमे एक हि भाव ।
तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥1॥
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात ।
धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥1॥
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये ।
तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥1॥
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग ।
पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥1॥
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये ।
दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥1॥
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय ।
उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराइऩ ॥1॥
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय ।
जबथे इच्छा नहिं मुइऩ । तब तूं किया काय ॥1॥
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक ।
मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥1॥
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास ।
सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥1॥
कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास ।
क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥1॥
तुका और मिठाइऩ क्या करूं रे । पाले विकारपिंड ।
राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥1॥ ॥30॥
ह्मणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥1॥
लाहो घेइप हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥
गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि ह्मणसी ॥2॥
पुरलासाटीं देहाडा। ऐसें न ह्मणें न ह्मणें मूढा ॥3॥
नरदेह दुबळा । ऐसें न ह्मणें रे चांडाळा ॥4॥
तुका ह्मणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥5॥
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शािब्दकांचे काम नाहीं येथें ॥1॥
बहु धड जरी जाली ह्मैस गाय । तरी होइऩल काय कामधेनु ॥2॥
तुका ह्मणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येइऩल कळों ॥3॥
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥
तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3॥
पद 902

पद 903

पद 904

पद 905
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥1॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥2॥
तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥3॥
पद 906
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥
मुखीं वाणी कानीं कीतिऩ । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥
पद 907
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥1॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥2॥
तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥
पद 908
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥1॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥2॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥3॥
तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥2॥
पद 909
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥1॥
भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥2॥
तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥3॥
तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥4॥
पद 910
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥1॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥2॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥3॥
तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥4॥
पद 911
धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥1॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥2॥
अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥3॥
साधनाची सििद्ध । मोन करा िस्थर बुिद्ध ॥4॥
तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥5॥
पद 912
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥1॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥2॥
तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥3॥
पद 913
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥1॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥2॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥3॥
तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥4॥
पद 914
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥1॥
साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥2॥
तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥3॥
पद 916
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥1॥
वोळगती जया अष्टमासििद्ध । ते या जनबुद्धी नातळती ॥2॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥3॥
लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥4॥
तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥5॥
पद 917
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥1॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥2॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥3॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥4॥
तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥5॥
पद 918
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥1॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥2॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥3॥
तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥4॥
पद 919
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥1॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥2॥
तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥3॥
पद 920
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥1॥
होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥2॥
तुका ह्मणे माझें । काय होइऩल तुह्मां ओझें ॥3॥
पद 922
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥1॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥2॥
तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥3॥
पद 923
कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥1॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥3॥
पद 924
आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥1॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥2॥
तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥3॥
पद 925
न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥1॥
पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥
बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥3॥
पद 926
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥1॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥2॥
तुका ह्मणे समपिऩला । तुज विठ्ठला देहभाव ॥3॥
पद 927
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥1॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥2॥
तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥3॥
पद 928
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोिळयांची भूक न वजे माझी ॥1॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥2॥
महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥3॥
तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥4॥
पद 929
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥1॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥2॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥3॥
तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥4॥
पद 930
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥1॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृिष्ट हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥2॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥3॥
तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥4॥
पद 931
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥1॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥2॥
तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥3॥
पद 932
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥1॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥2॥
तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥3॥
पद 933
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥1॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वदऩळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥2॥
तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥3॥
पद 935
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥1॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥2॥
तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥3॥
पद 936
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥1॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥2॥
तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥3॥
पद 938
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥1॥
लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥2॥
बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥3॥
पद 940
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥1॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥2॥
तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावइऩल ॥3॥
पद 941
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥1॥
आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥2॥
तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥3॥
पद 942
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥
तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥
पद 943
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥1॥
होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥2॥
तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥3॥
पद 944
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥1॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥2॥
तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥3॥
पद 945
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काइऩ । स्वहित तें ठायीं आपणापें ॥1॥
मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥2॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥3॥
तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होइऩल त्यांचा ॥4॥
पद 946
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥1॥
कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥2॥
ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥3॥
पद 947
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥1॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥2॥
तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥3॥
पद 948
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥
तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥
पद 949
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥1॥
तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥2॥
तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥3॥
पद 952
लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥1॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥2॥
तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥3॥
पद 953
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥1॥
उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥
ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥2॥
एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥3॥
पद 954
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥1॥
आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥2॥
तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥3॥
पद 955
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥1॥
मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥2॥
तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥3॥
पद 956
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥1॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥2॥
तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥3॥
पद 957
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥1॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥2॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥3॥
पद 958
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥1॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥2॥
तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥3॥
पद 959
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥1॥
आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥2॥
तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥3॥
पद 960
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥1॥
आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥2॥
तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥3॥
पद 961
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥1॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सवाौत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आह्मां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥3॥
पद 962
आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥
जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥
पद 963
तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥1॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥3॥
पद 964
तुह्मां होइऩल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥1॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥2॥
तुका ह्मणे देह देइऩन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥3॥
पद 965
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥1॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥2॥
तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥3॥
पद 967
काय कृपेविण घालावें सांकडें । नििंश्चती निवाडें कोण्या एका ॥1॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥2॥
तुका ह्मणे आह्मी भावहीन जीव । ह्मणउनी देव दुरे दुरी ॥3॥
पद 968
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥1॥
अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान नििंश्चतीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥2॥
तुका ह्मणे तुह्मां लाज येत नाहीं । आह्मां चिंताडोहीं बुडवितां ॥3॥
पद 969
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥1॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥3॥
पद 970
ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥1॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥2॥
तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥3॥
पद 972
वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥1॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुह्मी धीर । होइऩल िस्थर मन ठायीं ॥2॥
तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥3॥
पद 973
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥1॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥2॥
तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥3॥
पद 974
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥1॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥
स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥2॥
तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥3॥
पद 975
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥1॥
नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥2॥
आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥3॥
पद 977
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥1॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥2॥
तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥3॥
पद 979
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥1॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥
तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥2॥
तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥3॥
पद 981
मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥2॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥3॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥4॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥5॥
पद 982
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥1॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥2॥
तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥3॥
पद 983
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥1॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुिद्ध करुनी ठेवा ॥ध्रु.॥
विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥2॥
तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥3॥
पद 984
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥1॥
उदंड त्या गाइऩ ह्मैसी आणि शेऑया । परि त्या निराऑया कामधेनु ॥2॥
तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥3॥
पद 985
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥1॥
सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥
मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥2॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥3॥
बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥4॥
तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥5॥
पद 986
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥1॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥2॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥3॥
तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥4॥
पद 987
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥1॥
गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥2॥
तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥3॥
पद 988
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥
तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥3॥
पद 989
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥1॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभािळलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥2॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥3॥
पद 990
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥1॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥2॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥3॥
तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥4॥
पद 992
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥1॥
जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥2॥
तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥3॥
पद 993
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होइऩल त्या साहे पांडुरंग ॥1॥
पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥2॥
तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥3॥
पद 994
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥1॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाइऩन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥2॥
तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभािळता ॥3॥
पद 995
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता काुंफ्ज अंगीं ॥1॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काइऩ । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुिद्ध ॥2॥
तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥3॥
पद 996
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥1॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥2॥
मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥3॥
पद 997
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥1॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥2॥
तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥3॥
पद 998
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥1॥
जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥2॥
तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥3॥
पद 1000
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥1॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काइऩ । अवघें पायीं विदित ॥2॥
तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥3॥
पद 1003
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥
देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥
पद 1004
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥1॥
साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥2॥
तुका ह्मणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥3॥
पद 1005
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥1॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देइऩल ॥ध्रु.॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥2॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥3॥
पद 1006
कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥1॥
अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि नििंश्चत जालों देवा ॥ध्रु.॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥2॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥3॥
तुका ह्मणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेइप देवा ॥4॥
पद 1007
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥1॥
देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन िस्थर नाहीं ॥ध्रु.॥
बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥2॥
होइऩल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हा चि मज ॥3॥
तुका ह्मणे मी कमाइऩचे हीण। ह्मणऊनि सीण करीं देवा ॥4॥
पद 1008
ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥1॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥2॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥3॥
तुका ह्मणे वांयां जालों भूमी भार । होइऩल विचार काय नेणों ॥4॥
पद 1009
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥1॥
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥
शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइप निवडूनि ॥2॥
उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥4॥
पद 1010
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥1॥
जन वन आह्मां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥2॥
ह्मणऊनिं मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥3॥
ह्मणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥4॥
पद 1011
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥1॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥2॥
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥3॥
तुका ह्मणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥4॥
पद 1013
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥1॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥2॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥3॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका ह्मणे आतां शरण आलों ॥4॥
पद 1014
तुझा दास ऐसा ह्मणती लोकपाळ । ह्मणऊनि सांभाळ करीं माझा ॥1॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥
माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥2॥
नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥3॥
तुका ह्मणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥4॥
पद 1015
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥1॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥2॥
जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥3॥
तुका ह्मणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥4॥
पद 1017
मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥1॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥
गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥
पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥
तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6॥
पद 1018
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥1॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥2॥
न करावी निरास न धरावें उदास । देइप याचकास कृपादान ॥3॥
तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देइप पायापासीं ठाव देवा ॥4॥
पद 1019
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अिग्न जैसा ॥1॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥
घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥2॥
नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वताौनि तो जनीं जनादऩन ॥3॥
तुका ह्मणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥4॥
पद 1021
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1॥
सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥
गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥
संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥
तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4॥
पद 1022
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥1॥
न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥
न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥2॥
न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥3॥
तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥4॥
पद 1023
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥1॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होइऩल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥2॥
करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥3॥
तुका ह्मणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥4॥
पद 1024
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1॥
तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥
जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥
तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5॥
पद 1025
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥1॥
न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥
मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥2॥
सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥3॥
ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥4॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइप देवा ॥5॥
पद 1026
शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥1॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥
गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥2॥
भागलियाचा होइप रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥3॥
अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥4॥
तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥5॥
पद 1027
कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥1॥
कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥2॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥3॥
कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥4॥
तुका ह्मणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥5॥
पद 1030
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥1॥
अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥2॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥3॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥4॥
तुका ह्मणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥5॥
पद 1033
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥1॥
गोपाळांची पूजा उिच्छष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥2॥
निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥3॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥4॥
तुका ह्मणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥5॥
पद 1034
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥1॥
आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥
न ह्मणे सोइरा सुहुदऩ आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥3॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥3॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥4॥
तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥5॥
पद 1035
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥1॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥2॥
तुका ह्मणे माप । खरें आणा माझे बाप ॥3॥
पद 1037
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥1॥
प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहे लोकाचार पडे अवघा विसर ॥2॥
तुका ह्मणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥3॥
पद 1038
टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥1॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥2॥
तुका ह्मणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥3॥
पद 1040
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥1॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुह्मां आह्मां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥
बोलतां दुिश्चती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये ह्मणतां मी माझें ॥2॥
भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥3॥
नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥4॥
तुह्मां आह्मां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका ह्मणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥5॥
पद 1041
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥1॥
आह्मां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । वाहूं रखुमाइऩचा पती ॥3॥
पद 1042
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥1॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥2॥
तुका ह्मणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥3॥
पद 1043
आतां आह्मां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥1॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥2॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥3॥
पद 1044
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥1॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥2॥
तुका ह्मणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥3॥
पद 1046
न करावी स्तुति माझी संतजनीं । होइऩल या वचनीं अभिमान ॥1॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥2॥
तुका ह्मणे गर्व पुरवील पाठी । होइऩल माझ्या तुटी विठोबाची ॥3॥
पद 1048
चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥1॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुिद्धहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥2॥
तुका ह्मणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥3॥
पद 1049
समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥1॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥2॥
तुका ह्मणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥3॥
पद 1050
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥1॥
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥2॥
तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥3॥
पद 1051
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥1॥
शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥2॥
वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥3॥
पद 1052
जन मानविलें वरी बाहएात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥1॥
ह्मणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥2॥
तुका ह्मणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥3॥
पद 1053
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥1॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥2॥
तुका ह्मणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥3॥
पद 1054
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥1॥
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥
रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥2॥
तुका ह्मणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥3॥
पद 1055
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥1॥
आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥
बहु काकुलती । आलों मागें किती ॥2॥
तुका ह्मणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥3॥
पाइऩक - अभंग 11
पाइऩक - अभंग 11 पद 1056
पाइऩकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥1॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥
तरि व्हावें पाइऩक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥2॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥3॥
तुका ह्मणे एका क्षणांचा करार । पाइऩक अपार सुख भोगी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1057
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । ह्मणोनियां जीवें केली साटीं ॥1॥
येतां गोऑया बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृिष्ट वरी ॥ध्रु.॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥2॥
पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥3॥
तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1058
पाइऩक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥1॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाइऩक त्या जग स्वामी मानी ॥2॥
ऐसें जन केलें पाइकें पाइऩक । जया कोणी भीक न घलिती ॥3॥
तुका ह्मणे ऐसे जयाचे पाइऩक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1059
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥1॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥2॥
सांडितां मारग मारिती पाइऩक । आणिकांसी शीक लागावया ॥3॥
तुका ह्मणे विश्वा घेऊनि विश्वास । पाइऩक तयास सुख देती ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1060
पाइऩक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥1॥
तो एक पाइऩक पाइकां नाइऩक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥2॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥3॥
तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1061
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥1॥
जिवाचे उदार शोभती पाइऩक । मिरवती नाइऩक मुगुटमणि ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥2॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥3॥
तुका ह्मणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1062
पाइकपणें खरा मुशारा । पाइऩक तो खरा पाइकीनें ॥1॥
पाइऩक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाइऩक तो पणें निवडला ॥2॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥3॥
तुका ह्मणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1063
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥1॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाइऩक तो नांव मिरवी वांयां ॥2॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥3॥
तुका ह्मणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइऩक पाहोन मोल करी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1064
एका च स्वामीचे पाइऩक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥1॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥
हीन कमाइऩचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥2॥
पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढएा ठाव ॥3॥
तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1065
प्रजी तो पाइऩक ओळीचा नाइऩक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥1॥
आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥
पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥2॥
घेइऩल दरवडा देहा तो पाइऩक । मारी सकळीक सर्व हरी ॥3॥
तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाइऩचा पण सिद्धी पावे ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1066
जातीचा पाइऩक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥1॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥2॥
तुका ह्मणे नमूं देव ह्मुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥3॥
॥11॥
पाइऩक - अभंग 11 पद 1067
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥1॥
आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥
अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥2॥
यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥3॥
तुका ह्मणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1068
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुह्मां लागे कोडें उगवणें ॥1॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुह्मां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥2॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आह्मां वचन सांपडलें ॥3॥
तुका ह्मणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1070
अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥1॥
पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥2॥
तुका ह्मणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1071
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥1॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥2॥
तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1072
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥1॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥2॥
तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1074
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥1॥
आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥
जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥2॥
तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रििद्धसिद्धी ॥3॥
॥घोंगडएाचे अभंग-॥12॥
पाइऩक - अभंग 11 पद 1075
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥1॥
पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥2 ॥
तुका ह्मणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1076
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥1॥
कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥
तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥2॥
तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1077
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥1॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेइप गोपाळा देइप झाडा ॥ध्रु.॥
मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥2॥
तुका ह्मणे बुिद्ध काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1078
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥1॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥2॥
तुका ह्मणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1079
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥1॥
चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥2॥
तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1080
तुह्मां आह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥1॥
माझें घोंगडें टाकुन देइप । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥2॥
तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1081
मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥1॥
घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥2॥
तुका ह्मणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1082
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥1॥
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥
नोळखवे म्यां धरिला हातीं । देहएादिप माय लाविली वाती ॥2॥
न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1083
आतां मी देवा पांघरों काइऩ । भिकेचें तें ही उरे चि ना ॥1॥
सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥
नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥2॥
तुका ह्मणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1084
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥1॥
मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥2॥
तुका ह्मणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1085
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥1॥
पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥2॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1086
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥1॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥
चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥2॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥3॥
आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥4॥
तुका ह्मणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥5॥ ॥12॥
पाइऩक - अभंग 11 पद 1087
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥1॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥2॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥3॥
गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1088
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥1॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥2॥
तुका ह्मणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1089
शीतळ साउली आमुची माउली । विठाइऩ वोळली प्रेमपान्हा ॥1॥
जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥2॥
आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥3॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥4॥
तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाइऩचें ॥5॥
रामचरित्र - अभंग ॥14॥
पाइऩक - अभंग 11 पद 1090
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥1॥
केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥2॥
तुका ह्मणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1092
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥1॥
तो हा न करी तें काइऩ । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥
सीळा मनुष्य जाली। ज्याच्या चरणाचे चाली ॥2॥
वानरां हातीं लंका । घेवविली ह्मणे तुका ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1093
राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥
तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1094
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥1॥
कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥
हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥2॥
जुन्हाट नागर नीच नवें । तुका ह्मणें म्यां धरिलें जीवें भावें ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1095
राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥1॥
राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥
राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत ह्मणतां राम ॥2॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥3॥
तुका ह्मणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1096
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥1॥
अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होइऩ शरणागत किंवा युद्धासी सादर ॥2॥
तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेइऩ आतां संवंघेसी तुटी ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1097
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥1॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥2॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1098
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥1॥
लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
उदार्याची सीमा । काय वणूप रघुरामा ॥2॥
तुका ह्मणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1099
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥1॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥
अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥2॥
स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥3॥
रावणेसी लंका। राम आपण जाला देखा ॥4॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1101
जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाइऩ वोळल्या ह्मैसी ॥1॥
राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥
स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥2॥
तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1102
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥1॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥2॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥3॥
नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥4॥
नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1104
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ।
जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका ।
मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2॥
हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।
करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ।
असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥4॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1107
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें ।
हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2॥
असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ।
महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3॥
कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची।
जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥4॥
मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय।
तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1108
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अिग्न हा काष्ठ तेवीं ।
घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥1॥
तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥2॥
फळ कदऩळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ।
धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥3॥
असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें ।
कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥4॥
करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां ।
तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1109
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥1॥
ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों ।
भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥2॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये ।
करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥3॥ ॥6॥
पाइऩक - अभंग 11 पद 1111
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥1॥
ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा ह्मणउनी ॥ध्रु.॥
विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1112
येगा येगा पांडुरंगा । घेइऩ उचलुनि वोसंगा ॥1॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥2॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥3॥
तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1113
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥1॥
कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ कोंवळी ॥2॥
तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1114
आह्मी उतराइऩ । भाव निरोपूनि पायीं ॥1॥
तुह्मी पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमचा हा नेम । तुह्मां उचित हा धर्म ॥2॥
तुका ह्मणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1115
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥1॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥2॥
तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1116
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥1॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुिप्त । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥2॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥3॥
तुका ह्मणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1119
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥1॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥2॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥3॥
तुका ह्मणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1121
सुरवर येती तीथॉ नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥1॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥2॥
निविऩषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥3॥
तुका ह्मणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेइप कोटि ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1122
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥1॥
वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥2॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जािळसी ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1123
देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥1॥
दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥2॥
तुका ह्मणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1124
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥1॥
ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पािळतां पिंडास गोड वाटे ॥2॥
देव ह्मणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥3॥
तुका ह्मणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1125
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥1॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥2॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वणिऩतां ते गुण न सरती ॥3॥
तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1126
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥1॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥2॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥3॥
तुका ह्मणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1127
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥1॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥2॥
चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥3॥
तुका ह्मणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1128
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥
तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1129
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥1॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥2॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । ह्मणोनि वासना आवरिली ॥3॥
तुका ह्मणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1130
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥1॥
सर्वभावें नाम गाइऩन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥2॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥3॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1131
जनीं जनादऩन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥1॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥
आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥
तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1132
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1॥
चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥
तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1133
धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥1॥
सुखें करावें कीर्तन हषॉ गावे हरिचे गुण। वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥2॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1134
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥1॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥2॥
तुका ह्मणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1135
दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥1॥
हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥2॥
तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1136
वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥1॥
करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥2॥
तुका ह्मणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥3॥
पाइऩक - अभंग 11 पद 1137
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥1॥
मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण। भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रििद्धसिद्धी ह्मणियारीं ॥2॥
सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥3॥
ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥4॥
तुका ह्मणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥5॥
पाइऩक - अभंग 11 पद 1138
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1॥
अविनाश सुख देइऩल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्याशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होइऩल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥
तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1139
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥1॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥
आणीक ही भोग आणिकां इंिद्रयांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥2॥
रूप दृिष्ट धाय पाहातां पाहातां। न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥3॥
तुका ह्मणे कां रे नाशिवंतासाटीं। देवासवें तुटी करितोसी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1140
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देइऩल तो अन्नवस्त्रदाता ॥1॥
काय आह्मां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥2॥
न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥3॥
तुका ह्मणे लेइप अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥4॥
पाइऩक - अभंग 11 पद 1141
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥1॥
काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृित्तकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥2॥
तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥3॥
सेतावर - अभंग 3
सेतावर - अभंग 3 पद 1142
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥
कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3॥
ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥6॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥
सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥10॥
सेतावर - अभंग 3 पद 1143
वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥1॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥
चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥
2॥ डोळे झांकुनि राती ॥
कूर्पी पडे दिवसा जोती ॥3॥
पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥4॥
फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी ॥5॥
सेतावर - अभंग 3 पद 1144
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1॥
सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुिद्ध व्हावीं दोनी ॥3॥
खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥4॥
तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5॥ ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1145
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥1॥
नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥2॥
तुका ह्मणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥3॥
उतराधिपदें - 22
सेतावर - अभंग 3 पद 1146
क्या गाऊं कोइऩ सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥1॥
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥2॥
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1147
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥1॥
तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥
तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥2॥
कहे तुका जो साइप हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1148
मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥1॥
राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥
अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥2॥
कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1149
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥1॥
काहे बडाइऩ दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥
और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥2॥
फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1150
हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥1॥
मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥
हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥2॥
देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1151
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥1॥
क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥
किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥2॥
कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1153
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥1॥
प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥2॥
तुका प्रभु दीनदयाला। वारि रे तुज पर हुं गोपाला ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1154
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥
इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥1॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥2॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1155
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥
हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥
जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1156
आपे तरे त्याकी कोण बराइऩ । औरनकुं भलो नाम घराइऩ ॥ध्रु.॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥1॥
बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥2॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥3॥
काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥4॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥5॥
सेतावर - अभंग 3 पद 1157
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥
नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥1॥
उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥2॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1158
भले रे भाइऩ जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥1॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥2॥
कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1159
लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥
कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥1॥
नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥2॥
और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1161
काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥
राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥1॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥2॥
राना रंग डोंगरकी राइऩ । कहे तुका करे इलाहि ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1162
काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥
केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥1॥
बाप भाइऩ लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥2॥
काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1163
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥
तनजोबनकी कोन बराइऩ । ब्याधपीडादि स काटहि खाइऩ ॥1॥
कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥2॥
कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोडहि हात ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1164
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥
मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥1॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥2॥
कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1165
रामभजन सब सार मिठाइऩ । हरि संताप जनमदुख राइऩ ॥ध्रु.॥
दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥1॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥2॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1166
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥
ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥1॥
रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥2॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1167
हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिइऩ लंका ॥ध्रु.॥
गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥1॥
वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥2॥
स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाइऩ तुकयाका ॥3॥ ॥22॥
॥ साख्या ॥ 30 ॥
सेतावर - अभंग 3 पद 1168
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय।
भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1169
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।
बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1170
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम ।
माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1171
तुका पंखिबहिरन मानुं । बोइऩ जनावर बाग ।
असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1172
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर ।
तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1173
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार ।
चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1174
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम ।
बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1175
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।
हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1176
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख ।
आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1177
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1178
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1179
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1180
कहे तुका जग भुला रे । कहएा न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1181
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।
चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1182
तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1183
तुका माऱ्या पेटका । और न जाने कोये ।
जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1184
काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर ।
कहे तुका तुम्हें सुनो रे भाइऩ । हिरिदा जिन्होका कठोर ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1185
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये ।
निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1186
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद ।
बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1187
तुका दास रामका । मनमे एक हि भाव ।
तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1188
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात ।
धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1189
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये ।
तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1190
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग ।
पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1191
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये ।
दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1192
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय ।
उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराइऩ ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1193
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय ।
जबथे इच्छा नहिं मुइऩ । तब तूं किया काय ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1194
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक ।
मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1195
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास ।
सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1196
कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास ।
क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥1॥
सेतावर - अभंग 3 पद 1197
तुका और मिठाइऩ क्या करूं रे । पाले विकारपिंड ।
राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥1॥ ॥30॥
सेतावर - अभंग 3 पद 1198
ह्मणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥1॥
लाहो घेइप हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥
गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि ह्मणसी ॥2॥
पुरलासाटीं देहाडा। ऐसें न ह्मणें न ह्मणें मूढा ॥3॥
नरदेह दुबळा । ऐसें न ह्मणें रे चांडाळा ॥4॥
तुका ह्मणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥5॥
सेतावर - अभंग 3 पद 1199
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शािब्दकांचे काम नाहीं येथें ॥1॥
बहु धड जरी जाली ह्मैस गाय । तरी होइऩल काय कामधेनु ॥2॥
तुका ह्मणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येइऩल कळों ॥3॥
सेतावर - अभंग 3 पद 1200
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥
तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3॥
परिचय
संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग 901 ते 1200. तुकारामांचे अभंग हे वारकरी संप्रदायाचा प्राण मानले जातात — विठ्ठलभक्ती, संतसंगती, नामस्मरण आणि परखड आत्मपरीक्षण हे त्यांचे विषय.
॥ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ॥
संदर्भ 1
- तुकाराम गाथा — mr.wikisource.org
मराठी विकिस्रोत आवृत्ती. या विभागातील 259 अभंग येथे दिले आहेत; 41 अभंगांचा मूळ पाठ विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध नसल्याने वगळला आहे.
परवाना: CC BY-SA 4.0 — Text adapted from Wikimedia projects, licensed CC BY-SA 4.0. Adaptations must be shared alike.
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.