तुकाराम गाथा — अभंग 1501–1800
आकार
मांडणी
तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥1॥
नाइकवे तुझी अपकीिर्त्त देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥
आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी कां भाव अल्प दिला ॥2॥
तुका ह्मणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥3॥
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥1॥
सारा अवघें गाबाळ । डोऑया आडील पडळ ॥ध्रु.॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥2॥
तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥3॥
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥1॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥2॥
तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥3॥
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥1॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥3॥
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥2॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥3॥
तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥4॥
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥1॥
तुह्मी सांभािळलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥
कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥2॥
तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥3॥
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥1॥
तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥2॥
तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥3॥
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥1॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥2॥
तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥3॥
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥1॥
काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥2॥
तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥3॥
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥1॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥2॥
तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥3॥
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥1॥
दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥2॥
तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥3॥
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥1॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥2॥
तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥3॥
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥1॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥2॥
तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥3॥
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1॥
वाऱ्या हातीं माप चाले सज्जनाचें । कीतिऩ मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2॥
तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3॥
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥1॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥2॥
तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥3॥
पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥1॥
निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥2॥
तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥3॥
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥1॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥2॥
तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥3॥
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥1॥
ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।
नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥
सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।
नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥2॥
शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण ।
काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥3॥
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2॥
हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥3॥
येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4॥
तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5॥
नव्हें हें गुरुत्व मेघवृिष्ट वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥1॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुिळचें तें खरें टांकसाळ ॥2॥
तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥3॥
घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥1॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥2॥
तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥3॥
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥1॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥2॥
तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥3॥
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥1॥
डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥2॥
तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥3॥
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥1॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥2॥
शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥3॥
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥1॥
आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥2॥
पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥3॥
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥1॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥2॥
तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊमिऩ एकमय ॥3॥
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥1॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥2॥
तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥3॥
परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥1॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥2॥
तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥3॥
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥1॥
देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥2॥
तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥3॥
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥1॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥2॥
तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥3॥
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥1॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥2॥
तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥3॥
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥
नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥
तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3॥
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥1॥
करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥2॥
तुका ह्मणे माझी कळवऑयाची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥3॥
तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥1॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥2॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आइऩ । धांवें वो विठाइऩ वोरसोनि ॥3॥
तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥4॥
पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥1॥
ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥2॥
तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥3॥
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥1॥
पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥2॥
सेऑया मेंढएा गाइऩ सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥3॥
तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥4॥
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3॥
तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4॥
येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥1॥
आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥2॥
न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥3॥
तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥4॥
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥1॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥2॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥3॥
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥1॥
यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥
पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥2॥
तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥3॥
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥1॥
रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥2॥
तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥3॥
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥
लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥
तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3॥
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥1॥
तैसें करीं वो माझे आइऩ । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥
न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥2॥
तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥3॥
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥1॥
जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥2॥
तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥3॥
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥1॥
आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥2॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥3॥
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥1॥
भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥
विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥2॥
तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥3॥
ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥1॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥3॥
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥1॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥2॥
तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥3॥
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥1॥
ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥2॥
तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥3॥
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥1॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥2॥
तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥3॥
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥1॥
ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥2॥
तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजडएा नारी नव्हती ॥3॥
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥1॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥2॥
गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥3॥
मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥4॥
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥1॥
पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥
जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥2॥
पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥3॥
पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥4॥
आरत्या ॥ 13 ॥
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा ।
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥1॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥2॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूतिऩ मनोहरा ॥3॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी।
नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥4॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता।
उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥5॥
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाइऩवरा । आरती करीन काया । ओंवािळन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥
गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2॥
घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4॥
वणिऩतां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूतिऩ । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥5॥
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥1॥
ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा । राहिरखुमाइऩसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥2॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥3॥
सांवळा सकुमार जैसा कदऩळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥4॥
ओंवािळतां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृिष्ट समाधि तुकया लागली पायीं ॥5॥
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥1॥
या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥2॥
तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥3॥
स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24 ॥
शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥1॥
आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥2॥
विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥3॥
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥1॥
ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥
द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥2॥
तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥3॥
ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥1॥
हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥
सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥2॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥1॥
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥1॥
आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥
ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥3॥
तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥1॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥
भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥2॥
तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥3॥
आपुल्या माहेरा जाइऩन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥1॥
सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥
करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥2॥
त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥3॥
तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥4॥
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥1॥
आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥
उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥2॥
तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥3॥
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥1॥
आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥2॥
तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥3॥
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥1॥
दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥2॥
तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥3॥
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥1॥
गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥
मुगुटकुंडलांच्या दीिप्त । तेजें लोपला गभिस्त ॥2॥
मेघश्यामवर्ण हरि । मूतिऩ डोळस साजिरी ॥3॥
चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥4॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥5॥
तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥6॥
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥1॥
आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ।
सुख वाटे मना । डोळे बाहएा स्फुरती ॥ध्रु.॥
उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥2॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥3॥
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥1॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥2॥
आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥3॥
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥1॥
काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ।
कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥
घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥2॥
मुखशुिद्ध तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥3॥
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥1॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥
जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥2॥
मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥3॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥4॥
तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥5॥
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥1॥
कर्मधर्में तुह्मां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥
वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ नििंश्चती जाली तेथें ॥2॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥3॥
वाढवितां लोभ होइऩल उसीर । अवघींच िस्थर करा ठायीं ॥4॥
धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥5॥
तुका ह्मणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥6॥
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥1॥
अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥
दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥2॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥3॥
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥2॥
अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥3॥
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥1॥
नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥
तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥2॥
देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥3॥
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥1॥
कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥
वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥2॥
तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥3॥
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥1॥
येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥2॥
कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥3॥ ॥24॥
शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य
द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥1॥
जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥1॥
तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥2॥
चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥3॥
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥
तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥
अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥1॥
तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥
सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥2॥
तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥3॥
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥1॥
न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥2॥
तुका ह्मणे नारायण । येता गोऑया वारी वाण ॥3॥
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥1॥
दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥3॥
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥1॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टएा हाते नुडवी काग ॥2॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥3॥
बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥4॥
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥1॥
जाइऩल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥2॥
तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥3॥
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥1॥
सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥
फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥1॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥
कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥2॥
खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥3॥
निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥4॥
तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥5॥
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥1॥
तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥2॥
तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥3॥
पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥1॥
काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥
वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥2॥
तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥3॥
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥1॥
अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥2॥
तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥3॥
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥1॥
नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥2॥
तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥3॥
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥1॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥2॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥3॥
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥1॥
काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥
काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥2॥
तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥3॥
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥1॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥2॥
तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥3॥
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥1॥
हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥2॥
तुका ह्मणे उगेचि राहा । होइऩल तें सहज पाहा ॥3॥
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥1॥
उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥
मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥2॥
तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥3॥
काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥1॥
आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥2॥
तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥3॥
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥1॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥2॥
तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥3॥
पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥1॥
धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥2॥
अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥3॥
भार घालीं देवा । न लगे देश डोइऩ घ्यावा ॥1॥
देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥2॥
तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥3॥
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥1॥
शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥2॥
तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥3॥
आनुहातीं गुंतला नेणे बाहए रंग । वृित्त येतां मग बळ लागे ॥1॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥2॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥3॥
तुका ह्मणे बाहए रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥4॥
ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥1॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काइऩ निजसुखा ॥2॥
तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥3॥
तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥1॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥2॥
तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥3॥
आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥1॥
देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥2॥
तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥3॥
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥1॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥2॥
तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥3॥
समर्थाचें केलें । कोणां जाइऩल मोडिलें ॥1॥
वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥2॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥3॥
तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥4॥
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥1॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥2॥
तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥3॥
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली नििंश्चती तुझ्या पायीं ॥1॥
कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥
नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । ह्मणऊनि पाय धरिले तुझे ॥2॥
वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥4॥
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥1॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥2॥
तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥3॥
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥1॥
ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥2॥
तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥3॥
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥1॥
तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥2॥
तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥3॥
पवित्र होइऩन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥1॥
आपुरती बुिद्ध पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाइऩन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥2॥
तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥3॥
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥1॥
कोणे तरी काळें होइऩल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥2॥
तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥3॥
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥1॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥2॥
तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होइऩल ते ॥3॥
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥1॥
मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥2॥
तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥3॥
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥1॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥2॥
तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥3॥
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥1॥
तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥2॥
तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥3॥
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुिद्ध मग ॥1॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥2॥
तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥3॥
वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ 4 ॥
तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥1॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥2॥
तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥3॥
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥1॥
माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥2॥
तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥3॥ ॥3॥
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥1॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥2॥
जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥1॥
हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥2॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥3॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोइऩ ॥4॥
तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥5॥
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥1॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥2॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥3॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥4॥
तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥5॥
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥1॥
काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥
नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥2॥
नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥3॥
बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवािळलें ॥4॥
तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥5॥
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥1॥
ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥3॥
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥1॥
सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें नििश्चत ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥2॥
तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥3॥
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥1॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥2॥
तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥3॥
सांपडला हातीं । तरी जाली हे नििंश्चती ॥1॥
नाहीं धांवा घेत मन । इंिद्रयांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥2॥
तुका ह्मणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥3॥
सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥1॥
ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥2॥
तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥3॥
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥1॥
आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे आइऩ । श्रीरंगे विठाबाइऩ ॥3॥
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥1॥
कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥2॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥3॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥4॥
तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥5॥
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥1॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाइऩ काचें ॥ध्रु.॥
जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥2॥
तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥3॥
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥1॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥2॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळइऩ ॥3॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥4॥
तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥5॥
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥1॥
आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥
लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥2॥
भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥3॥
माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥4॥
तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥5॥
तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥1॥
आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥
पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥2॥
तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥3॥
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥1॥
जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥2॥
तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥3॥
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥1॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥2॥
रुसलेती तरी होइऩल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥3॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥4॥
तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥5॥
निष्ठा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥1॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाइऩच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥2॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥3॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥4॥
तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥5॥
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥1॥
सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥2॥
तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥3॥
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥1॥
तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥2॥
तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥3॥
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥1॥
झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥2॥
तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥3॥
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥1॥
नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥2॥
तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥3॥
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥1॥
अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥
धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥2॥
तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥3॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥4॥
तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥
ऐसें सत्य माझें येइऩल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥1॥
वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥
तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥2॥
तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥3॥
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥1॥
आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥
आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥2॥
तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होइऩल तें ॥3॥
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥1॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥2॥
तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥3॥
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥1॥
कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥
बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें॥2॥
तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची॥3॥
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥1॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥
गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥2॥
भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥3॥
तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥4॥
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥1॥
माय रखुमाइऩ पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥2॥
दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥3॥
संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥4॥
तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥5॥
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥1॥
देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाहए रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥2॥
तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥3॥
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥
आवडी विठ्ठल गाइऩजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥
तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥2॥
तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥3॥
हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥1॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥2॥
राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होइऩल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥3॥
उपेिक्षला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आइऩिकली ॥1॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥2॥
तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥3॥
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥1॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥2॥
तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूतिऩ ॥3॥
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥1॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥2॥
तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥3॥
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥1॥
न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥2॥
तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥3॥
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥1॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥2॥
तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥3॥
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥1॥
कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥
नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥2॥
तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥3॥
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥1॥
मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥2॥
तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥3॥
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥1॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥2॥
तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥3॥
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥1॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥2॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥3॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥4॥
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥1॥
हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटएां वायें ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥2॥
चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥3॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥4॥
तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥5॥
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥1॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥2॥
तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥3॥
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥1॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥2॥
तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥3॥
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥1॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥2॥
तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥3॥
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥1॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साहए होतो नारायण ॥2॥
तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥3॥
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥1॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥2॥
खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥3॥
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥1॥
जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥2॥
तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥3॥
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥1॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥2॥
तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥3॥
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥1॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥2॥
तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥3॥
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥1॥
गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृिष्ट लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥2॥
तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥3॥
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥1॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥
प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥2॥
तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥3॥
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥1॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥2॥
तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाइऩिवण नाहीं ॥3॥
शूरां साजती हतियारें । गांढएां हासतील पोरें ॥1॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥2॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥3॥
मान बुिद्धवंतां । थोर न मनिती पिता ॥4॥
तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥5॥
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥1॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥2॥
तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥3॥
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥1॥
एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥2॥
कािळमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥3॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥4॥
तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥5॥
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥1॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥
फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥2॥
पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥3॥
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥1॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥2॥
तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥3॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥4॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥5॥
लागती पादुका । ते मी तळील मृित्तका ॥6॥
तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥7॥
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥1॥
यांचा विश्वास तो काइऩ । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
सुगंध अभ्यंगें पािळतां । केश फिरले जाणतां ॥2॥
पिंड पािळतां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥3॥
करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥4॥
अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥5॥
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां ।
न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥
अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें ।
तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥3॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।
तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥
दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥1॥
जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो।
कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥2॥
तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥3॥
कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥1॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥2॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥3॥
वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काइऩ ॥4॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥5॥
तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥6॥
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥1॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥2॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥3॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पािळलें शरीर पुष्ट लोभें ॥4॥
तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥5॥
तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥1॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥2॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥3॥
मृित्तका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥4॥
तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥5॥
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षािळलें वरीं वरीं ॥1॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
इंद्रावण फळ घोिळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥2॥
तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया काुंफ्दां तुह्मी ॥3॥
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥1॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥2॥
तुका ह्मणे ऐसें देइऩन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥3॥
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥1॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥
सवाौत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥2॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥3॥
तुका ह्मणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥4॥
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥1॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥2॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥3॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥4॥
तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥5॥
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥1॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥
कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥2॥
वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥3॥
आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥4॥
तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥5॥
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥1॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥2॥
तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥3॥
मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥1॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥2॥
तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥3॥
जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥1॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥3॥
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥1॥
घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥2॥
तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥3॥
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥1॥
ऐसी कळवऑयाची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥2॥
तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥3॥
आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥1॥
जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥
आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥2॥
तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥3॥
तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥1॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥
भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥2॥
तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥3॥
काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥1॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥2॥
तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥3॥
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥1॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥2॥
उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥3॥
पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होइऩल वांटा । काळ पिठासी आला ॥4॥
दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोइऩ बोडीं आपुली ॥5॥
तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥6॥
तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥7॥
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥1॥
तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥
वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥2॥
तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥3॥
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥1॥
आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥2॥
तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥3॥
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥1॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥2॥
तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥3॥
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥1॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥2॥
मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥3॥
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥1॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥2॥
होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥3॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ 1 ॥
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥1॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देइऩल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥2॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥3॥
तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥4॥
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥1॥
मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥2॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥3॥
तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥4॥
बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥1॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥2॥
खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥3॥
वैद्या भीड काय । अतित्याइऩ जीवें जाय ॥4॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥5॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥6॥
तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥7॥
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥1॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥2॥
शूरा उल्हास अंगीं । गांढएा मरण ते प्रसंगीं ॥3॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥4॥
तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥5॥
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥1॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥2॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥3॥
तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥4॥
कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होइऩन दासीसुत त्याचे घरीं ॥1॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारेकरी । होइऩन त्यांचे घरीं पशुयाति ॥2॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होइऩन पायतन त्याचे पायीं ॥3॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥4॥
तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥5॥
अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।
तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥
माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥
वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी ।
ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥3॥
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥1॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती ।
वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥2॥
भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोिळया।
हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥3॥
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥1॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥2॥
तुका ह्मणे ऐसी बुिद्ध ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥3॥
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥1॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥2॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥3॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥4॥
तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोइऩ । धांवे यासी काइऩ करूं आतां ॥5॥
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥1॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥2॥
तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥3॥
अखंड ते ध्यान । समबुिद्ध समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥4॥
करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥5॥
तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें॥1॥
तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥2॥
तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥3॥
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥1॥
तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥
जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥2॥
पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥3॥
करी गोपीचें कवतुक । गाइऩगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥4॥
तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥5॥
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥1॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥2॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥3॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥4॥
तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥5॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥1॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाइऩ ॥2॥
तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥3॥
दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥1॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥2॥
देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥3॥
माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥1॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।
विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।
ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥2॥
तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा ।
हातीं अधीन तें मज काइऩ । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।
मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥3॥
तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥1॥
रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥2॥
तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥3॥
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥1॥
क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुिद्ध ॥2॥
तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥3॥
एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि॥1॥
उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥2॥
तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥3॥
बोलविले जेणें । तो चि याचें गुहए जाणे ॥1॥
मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥2॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता॥3॥
मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥4॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥5॥
त्याच्या साच गाइऩ ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥6॥
तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥7॥
कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥1॥
आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥2॥
तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥3॥
बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥1॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥2॥
तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥3॥
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥1॥
मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥2॥
तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥3॥
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥1॥
ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥2॥
तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥3॥
आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥1॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥2॥
तुका ह्मणे जाली अंधऑयाची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥3॥
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥1॥
एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥2॥
परउपकार घडे तो भला । नाठएाळ तया दया नाहीं ॥3॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा॥4॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥5॥
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥1॥
हें मज देइप हें मज देइप । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥3॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥3॥
हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥4॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका ह्मणे गोड नाम तुझें ॥5॥
ह्मणसी होऊनी नििंश्चता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होइऩल तुझ्या ॥1॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी
आंत बाहएात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥2॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी ।
जागा होइप करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे हाय करिसी मग ॥3॥
कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
ह्मणऊनि नििश्चत राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥1॥
कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काइऩ न दिसे देवा ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समपिऩली ॥2॥
पितरस्वरूपी तूं चि जनादऩन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका ह्मणे जीत पिंड तुह्मां हातीं। देऊनि नििंश्चती मानियेली ॥3॥
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥1॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥2॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥3॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥4॥
जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥5॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥6॥
तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥7॥
कस्तुरी भिनली जये मृित्तके । तयेसी आणिके कैसी सरी ॥1॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥2॥
तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥
देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥1॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥2॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥3॥
तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥4॥
घेइऩन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥
हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥2॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होइऩन उदास सर्व भावें ॥3॥
मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥4॥
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥1॥
तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥2॥
न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥3॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥4॥
तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥5॥
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुहए भाव शुद्ध बोला ॥1॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥2॥
तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥3॥
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥1॥
रवि दीप कािळमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥2॥
परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥3॥
तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥4॥
परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥1॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥2॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥3॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे॥4॥
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥1॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काइऩ ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जािळलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥2॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥3॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥4॥
तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥5॥
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥1॥
जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥
एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥2॥
गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥3॥
स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥4॥
तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥5॥
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराइऩ ॥1॥
परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥2॥
इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥3॥
न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥4॥
प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥5॥
आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥1॥
आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥2॥
पोहएा अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥3॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काइऩ ।
तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥4॥
तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥1॥
तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥2॥
तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर॥3॥
आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम॥1॥
न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां॥ध्रु.॥
आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥2॥
तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥3॥
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥
ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥
तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥
पद 1501

पद 1502

पद 1503
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥1॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥2॥
तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥3॥
पद 1504
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥1॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥3॥
पद 1505
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥2॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥3॥
तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥4॥
पद 1506
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥1॥
तुह्मी सांभािळलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥
कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥2॥
तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥3॥
पद 1507
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥1॥
तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥2॥
तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥3॥
पद 1508
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥1॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥2॥
तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥3॥
पद 1509
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥1॥
काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥2॥
तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥3॥
पद 1510
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥1॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥2॥
तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥3॥
पद 1511
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥1॥
दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥2॥
तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥3॥
पद 1512
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥1॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥2॥
तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥3॥
पद 1513
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥1॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥2॥
तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥3॥
पद 1514
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1॥
वाऱ्या हातीं माप चाले सज्जनाचें । कीतिऩ मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2॥
तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3॥
पद 1515
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥1॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥2॥
तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥3॥
पद 1516
पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥1॥
निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥2॥
तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥3॥
पद 1517
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥1॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥2॥
तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥3॥
पद 1518
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥1॥
ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।
नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥
सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।
नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥2॥
शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण ।
काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥3॥
पद 1519
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2॥
हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥3॥
येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4॥
तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5॥
पद 1520
नव्हें हें गुरुत्व मेघवृिष्ट वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥1॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुिळचें तें खरें टांकसाळ ॥2॥
तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥3॥
पद 1521
घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥1॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥2॥
तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥3॥
पद 1522
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥1॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥2॥
तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥3॥
पद 1523
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥1॥
डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥2॥
तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥3॥
पद 1524
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥1॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥2॥
शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥3॥
पद 1525
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥1॥
आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥2॥
पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥3॥
पद 1526
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥1॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥2॥
तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊमिऩ एकमय ॥3॥
पद 1527
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥1॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥2॥
तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥3॥
पद 1528
परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥1॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥2॥
तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥3॥
पद 1529
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥1॥
देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥2॥
तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥3॥
पद 1530
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥1॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥2॥
तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥3॥
पद 1532
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥1॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥2॥
तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥3॥
पद 1533
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥
नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥
तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3॥
पद 1534
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥1॥
करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥2॥
तुका ह्मणे माझी कळवऑयाची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥3॥
पद 1535
तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥1॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥2॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आइऩ । धांवें वो विठाइऩ वोरसोनि ॥3॥
तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥4॥
पद 1537
पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥1॥
ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥2॥
तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥3॥
पद 1539
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥1॥
पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥2॥
सेऑया मेंढएा गाइऩ सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥3॥
तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥4॥
पद 1541
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3॥
तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4॥
पद 1542
येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥1॥
आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥2॥
न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥3॥
तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥4॥
पद 1544
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥1॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥2॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥3॥
पद 1545
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥1॥
यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥
पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥2॥
तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥3॥
पद 1546
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥1॥
रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥2॥
तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥3॥
पद 1548
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥
लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥
तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3॥
पद 1551
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥1॥
तैसें करीं वो माझे आइऩ । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥
न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥2॥
तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥3॥
पद 1553
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥1॥
जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥2॥
तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥3॥
पद 1554
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥1॥
आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥2॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥3॥
पद 1555
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥1॥
भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥
विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥2॥
तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥3॥
पद 1556
ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥1॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥3॥
पद 1557
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥1॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥2॥
तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥3॥
पद 1558
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥1॥
ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥2॥
तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥3॥
पद 1559
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥1॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥2॥
तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥3॥
पद 1560
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥1॥
ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥2॥
तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजडएा नारी नव्हती ॥3॥
पद 1561
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥1॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥2॥
गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥3॥
मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥4॥
पद 1564
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥1॥
पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥
जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥2॥
पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥3॥
पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥4॥
आरत्या ॥ 13 ॥
पद 1569
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा ।
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥1॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥2॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूतिऩ मनोहरा ॥3॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी।
नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥4॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता।
उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥5॥
पद 1573
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाइऩवरा । आरती करीन काया । ओंवािळन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥
गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2॥
घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4॥
वणिऩतां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूतिऩ । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥5॥
पद 1576
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥1॥
ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा । राहिरखुमाइऩसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥2॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥3॥
सांवळा सकुमार जैसा कदऩळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥4॥
ओंवािळतां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृिष्ट समाधि तुकया लागली पायीं ॥5॥
पद 1580
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥1॥
या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥2॥
तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥3॥
स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24 ॥
पद 1581
शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥1॥
आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥2॥
विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥3॥
पद 1582
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥1॥
ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥
द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥2॥
तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥3॥
पद 1583
ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥1॥
हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥
सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥2॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥1॥
पद 1585
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥1॥
आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥
ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥3॥
पद 1586
तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥1॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥
भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥2॥
तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥3॥
पद 1587
आपुल्या माहेरा जाइऩन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥1॥
सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥
करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥2॥
त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥3॥
तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥4॥
पद 1588
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥1॥
आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥
उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥2॥
तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥3॥
पद 1589
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥1॥
आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥2॥
तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥3॥
पद 1590
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥1॥
दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥2॥
तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥3॥
पद 1591
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥1॥
गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥
मुगुटकुंडलांच्या दीिप्त । तेजें लोपला गभिस्त ॥2॥
मेघश्यामवर्ण हरि । मूतिऩ डोळस साजिरी ॥3॥
चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥4॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥5॥
तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥6॥
पद 1593
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥1॥
आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ।
सुख वाटे मना । डोळे बाहएा स्फुरती ॥ध्रु.॥
उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥2॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥3॥
पद 1594
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥1॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥2॥
आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥3॥
पद 1595
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥1॥
काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ।
कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥
घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥2॥
मुखशुिद्ध तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥3॥
पद 1597
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥1॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥
जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥2॥
मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥3॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥4॥
तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥5॥
पद 1598
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥1॥
कर्मधर्में तुह्मां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥
वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ नििंश्चती जाली तेथें ॥2॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥3॥
वाढवितां लोभ होइऩल उसीर । अवघींच िस्थर करा ठायीं ॥4॥
धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥5॥
तुका ह्मणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥6॥
पद 1600
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥1॥
अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥
दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥2॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥3॥
पद 1601
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥2॥
अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥3॥
पद 1602
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥1॥
नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥
तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥2॥
देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥3॥
पद 1603
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥1॥
कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥
वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥2॥
तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥3॥
पद 1604
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥1॥
येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥2॥
कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥3॥ ॥24॥
शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य
द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥1॥
पद 1605
जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥1॥
तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥2॥
चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥3॥
पद 1606
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥
तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥
अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥
पद 1608
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥1॥
तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥
सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥2॥
तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥3॥
पद 1609
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥1॥
न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥2॥
तुका ह्मणे नारायण । येता गोऑया वारी वाण ॥3॥
पद 1610
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥1॥
दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥3॥
पद 1612
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥1॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टएा हाते नुडवी काग ॥2॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥3॥
बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥4॥
पद 1613
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥1॥
जाइऩल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥2॥
तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥3॥
पद 1614
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥1॥
सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥
फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥
पद 1615
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥1॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥
कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥2॥
खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥3॥
निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥4॥
तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥5॥
पद 1616
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥1॥
तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥2॥
तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥3॥
पद 1617
पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥1॥
काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥
वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥2॥
तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥3॥
पद 1618
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥1॥
अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥2॥
तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥3॥
पद 1619
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥1॥
नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥2॥
तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥3॥
पद 1620
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥1॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥2॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥3॥
पद 1621
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥1॥
काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥
काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥2॥
तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥3॥
पद 1622
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥1॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥2॥
तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥3॥
पद 1623
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥1॥
हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥2॥
तुका ह्मणे उगेचि राहा । होइऩल तें सहज पाहा ॥3॥
पद 1624
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥1॥
उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥
मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥2॥
तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥3॥
पद 1625
काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥1॥
आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥2॥
तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥3॥
पद 1626
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥1॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥2॥
तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥3॥
पद 1627
पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥1॥
धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥2॥
अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥3॥
पद 1628
भार घालीं देवा । न लगे देश डोइऩ घ्यावा ॥1॥
देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥2॥
तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥3॥
पद 1629
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥1॥
शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥2॥
तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥3॥
पद 1631
आनुहातीं गुंतला नेणे बाहए रंग । वृित्त येतां मग बळ लागे ॥1॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥2॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥3॥
तुका ह्मणे बाहए रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥4॥
पद 1632
ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥1॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काइऩ निजसुखा ॥2॥
तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥3॥
तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥
पद 1633
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥1॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥2॥
तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥3॥
पद 1634
आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥1॥
देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥2॥
तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥3॥
पद 1635
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥1॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥2॥
तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥3॥
पद 1636
समर्थाचें केलें । कोणां जाइऩल मोडिलें ॥1॥
वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥2॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥3॥
तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥4॥
पद 1637
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥1॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥2॥
तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥3॥
पद 1638
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली नििंश्चती तुझ्या पायीं ॥1॥
कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥
नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । ह्मणऊनि पाय धरिले तुझे ॥2॥
वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥4॥
पद 1640
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥1॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥2॥
तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥3॥
पद 1641
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥1॥
ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥2॥
तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥3॥
पद 1642
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥1॥
तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥2॥
तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥3॥
पद 1643
पवित्र होइऩन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥1॥
आपुरती बुिद्ध पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाइऩन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥2॥
तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥3॥
पद 1644
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥1॥
कोणे तरी काळें होइऩल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥2॥
तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥3॥
पद 1645
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥1॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥2॥
तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होइऩल ते ॥3॥
पद 1646
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥1॥
मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥2॥
तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥3॥
पद 1647
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥1॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥2॥
तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥3॥
पद 1648
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥1॥
तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥2॥
तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥3॥
पद 1649
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुिद्ध मग ॥1॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥2॥
तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥3॥
वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ 4 ॥
पद 1651
तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥1॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥2॥
तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥3॥
पद 1652
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥1॥
माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥2॥
तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥3॥ ॥3॥
पद 1653
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥1॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥2॥
जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
पद 1654
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥1॥
हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥2॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥3॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोइऩ ॥4॥
तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥5॥
पद 1655
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥1॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥2॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥3॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥4॥
तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥5॥
पद 1656
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥1॥
काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥
नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥2॥
नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥3॥
बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवािळलें ॥4॥
तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥5॥
पद 1657
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥1॥
ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥3॥
पद 1658
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥1॥
सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें नििश्चत ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥2॥
तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥3॥
पद 1659
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥1॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥2॥
तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥3॥
पद 1660
सांपडला हातीं । तरी जाली हे नििंश्चती ॥1॥
नाहीं धांवा घेत मन । इंिद्रयांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥2॥
तुका ह्मणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥3॥
पद 1662
सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥1॥
ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥2॥
तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥3॥
पद 1663
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥1॥
आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे आइऩ । श्रीरंगे विठाबाइऩ ॥3॥
पद 1664
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥1॥
कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥2॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥3॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥4॥
तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥5॥
पद 1665
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥1॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाइऩ काचें ॥ध्रु.॥
जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥2॥
तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥3॥
पद 1666
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥1॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥2॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळइऩ ॥3॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥4॥
तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥5॥
पद 1667
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥1॥
आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥
लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥2॥
भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥3॥
माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥4॥
तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥5॥
पद 1668
तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥1॥
आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥
पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥2॥
तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥3॥
पद 1669
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥1॥
जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥2॥
तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥3॥
पद 1670
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥1॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥2॥
रुसलेती तरी होइऩल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥3॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥4॥
तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥5॥
पद 1671
निष्ठा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥1॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाइऩच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥2॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥3॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥4॥
तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥5॥
पद 1672
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥1॥
सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥2॥
तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥3॥
पद 1673
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥1॥
तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥2॥
तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥3॥
पद 1675
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥1॥
झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥2॥
तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥3॥
पद 1676
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥1॥
नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥2॥
तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥3॥
पद 1677
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥1॥
अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥
धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥2॥
तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥
पद 1678
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥3॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥4॥
तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥
पद 1679
ऐसें सत्य माझें येइऩल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥1॥
वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥
तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥2॥
तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥3॥
पद 1680
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥1॥
आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥
आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥2॥
तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होइऩल तें ॥3॥
पद 1681
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥1॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥2॥
तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥3॥
पद 1684
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥1॥
कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥
बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें॥2॥
तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची॥3॥
पद 1685
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥1॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥
गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥2॥
भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥3॥
तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥4॥
पद 1686
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥1॥
माय रखुमाइऩ पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥2॥
दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥3॥
संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥4॥
तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥5॥
पद 1687
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥1॥
देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाहए रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥2॥
तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥3॥
पद 1688
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥
आवडी विठ्ठल गाइऩजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥
तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥
पद 1689
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥2॥
तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥3॥
पद 1690
हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥1॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥2॥
राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होइऩल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥3॥
पद 1691
उपेिक्षला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आइऩिकली ॥1॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥2॥
तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥3॥
पद 1692
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥1॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥2॥
तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूतिऩ ॥3॥
पद 1693
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥1॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥2॥
तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥3॥
पद 1694
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥1॥
न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥2॥
तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥3॥
पद 1695
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥1॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥2॥
तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥3॥
पद 1696
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥1॥
कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥
नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥2॥
तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥3॥
पद 1697
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥1॥
मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥2॥
तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥3॥
पद 1698
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥1॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥2॥
तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥3॥
पद 1700
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥1॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥2॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥3॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥4॥
पद 1701
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥1॥
हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटएां वायें ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥2॥
चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥3॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥4॥
तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥5॥
पद 1702
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥1॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥2॥
तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥3॥
पद 1703
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥1॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥2॥
तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥3॥
पद 1704
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥1॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥2॥
तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥3॥
पद 1705
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥1॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साहए होतो नारायण ॥2॥
तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥3॥
पद 1706
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥1॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥2॥
खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥3॥
पद 1707
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥1॥
जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥2॥
तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥3॥
पद 1708
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥1॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥2॥
तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥3॥
पद 1709
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥1॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥2॥
तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥3॥
पद 1710
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥1॥
गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृिष्ट लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥2॥
तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥3॥
पद 1712
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥1॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥
प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥2॥
तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥3॥
पद 1713
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥1॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥2॥
तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाइऩिवण नाहीं ॥3॥
पद 1714
शूरां साजती हतियारें । गांढएां हासतील पोरें ॥1॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥2॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥3॥
मान बुिद्धवंतां । थोर न मनिती पिता ॥4॥
तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥5॥
पद 1715
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥1॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥2॥
तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥3॥
पद 1716
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥1॥
एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥2॥
कािळमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥3॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥4॥
तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥5॥
पद 1717
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥1॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥
फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥2॥
पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥3॥
पद 1718
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥1॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥2॥
तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥3॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥4॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥5॥
लागती पादुका । ते मी तळील मृित्तका ॥6॥
तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥7॥
पद 1719
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥1॥
यांचा विश्वास तो काइऩ । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
सुगंध अभ्यंगें पािळतां । केश फिरले जाणतां ॥2॥
पिंड पािळतां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥3॥
करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥4॥
अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥5॥
पद 1721
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां ।
न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥
अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें ।
तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥3॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।
तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥
पद 1722
दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥1॥
जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो।
कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥2॥
तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥3॥
पद 1723
कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥1॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥2॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥3॥
वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काइऩ ॥4॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥5॥
तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥6॥
पद 1724
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥1॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥2॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥3॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पािळलें शरीर पुष्ट लोभें ॥4॥
तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥5॥
पद 1725
तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥1॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥2॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥3॥
मृित्तका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥4॥
तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥5॥
पद 1726
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षािळलें वरीं वरीं ॥1॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
इंद्रावण फळ घोिळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥2॥
तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया काुंफ्दां तुह्मी ॥3॥
पद 1727
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥1॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥2॥
तुका ह्मणे ऐसें देइऩन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥3॥
पद 1728
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥1॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥
सवाौत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥2॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥3॥
तुका ह्मणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥4॥
पद 1729
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥1॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥2॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥3॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥4॥
तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥5॥
पद 1730
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥1॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥
कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥2॥
वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥3॥
आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥4॥
तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥5॥
पद 1731
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥1॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥2॥
तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥3॥
पद 1732
मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥1॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥2॥
तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥3॥
पद 1733
जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥1॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥3॥
पद 1734
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥1॥
घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥2॥
तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥3॥
पद 1735
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥1॥
ऐसी कळवऑयाची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥2॥
तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥3॥
पद 1736
आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥1॥
जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥
आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥2॥
तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥3॥
पद 1737
तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥1॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥
भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥2॥
तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥3॥
पद 1738
काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥1॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥2॥
तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥3॥
पद 1739
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥1॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥2॥
उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥3॥
पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होइऩल वांटा । काळ पिठासी आला ॥4॥
दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोइऩ बोडीं आपुली ॥5॥
तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥6॥
तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥7॥
पद 1740
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥1॥
तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥
वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥2॥
तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥3॥
पद 1741
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥1॥
आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥2॥
तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥3॥
पद 1742
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥1॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥2॥
तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥3॥
पद 1743
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥1॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥2॥
मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥3॥
पद 1744
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥1॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥2॥
होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥3॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ 1 ॥
पद 1745
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥1॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देइऩल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥2॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥3॥
तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥4॥
पद 1746
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥1॥
मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥2॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥3॥
तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥4॥
पद 1747
बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥1॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥2॥
खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥3॥
वैद्या भीड काय । अतित्याइऩ जीवें जाय ॥4॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥5॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥6॥
तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥7॥
पद 1748
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥1॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥2॥
शूरा उल्हास अंगीं । गांढएा मरण ते प्रसंगीं ॥3॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥4॥
तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥5॥
पद 1749
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥1॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥2॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥3॥
तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥4॥
पद 1750
कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होइऩन दासीसुत त्याचे घरीं ॥1॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारेकरी । होइऩन त्यांचे घरीं पशुयाति ॥2॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होइऩन पायतन त्याचे पायीं ॥3॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥4॥
तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥5॥
पद 1751
अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।
तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥
माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥
वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी ।
ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥3॥
पद 1752
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥1॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती ।
वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥2॥
भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोिळया।
हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥3॥
पद 1753
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥1॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥2॥
तुका ह्मणे ऐसी बुिद्ध ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥3॥
पद 1754
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥1॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥2॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥3॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥4॥
तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोइऩ । धांवे यासी काइऩ करूं आतां ॥5॥
पद 1755
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥1॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥2॥
तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥3॥
अखंड ते ध्यान । समबुिद्ध समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥4॥
करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥5॥
पद 1758
तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें॥1॥
तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥2॥
तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥3॥
पद 1759
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥1॥
तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥
जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥2॥
पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥3॥
करी गोपीचें कवतुक । गाइऩगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥4॥
तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥5॥
पद 1760
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥1॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥2॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥3॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥4॥
तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥5॥
पद 1761
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥1॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाइऩ ॥2॥
तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥3॥
पद 1762
दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥1॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥2॥
देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥3॥
पद 1763
माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥1॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।
विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।
ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥2॥
तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा ।
हातीं अधीन तें मज काइऩ । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।
मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥3॥
पद 1764
तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥1॥
रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥2॥
तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥3॥
पद 1765
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥1॥
क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुिद्ध ॥2॥
तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥3॥
पद 1766
एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि॥1॥
उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥2॥
तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥3॥
पद 1767
बोलविले जेणें । तो चि याचें गुहए जाणे ॥1॥
मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥2॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता॥3॥
मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥4॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥5॥
त्याच्या साच गाइऩ ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥6॥
तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥7॥
पद 1768
कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥1॥
आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥2॥
तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥3॥
पद 1771
बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥1॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥2॥
तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥3॥
पद 1772
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥1॥
मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥2॥
तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥3॥
पद 1773
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥1॥
ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥2॥
तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥3॥
पद 1774
आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥1॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥2॥
तुका ह्मणे जाली अंधऑयाची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥3॥
पद 1775
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥1॥
एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥2॥
परउपकार घडे तो भला । नाठएाळ तया दया नाहीं ॥3॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा॥4॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥5॥
पद 1776
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥1॥
हें मज देइप हें मज देइप । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥3॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥3॥
हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥4॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका ह्मणे गोड नाम तुझें ॥5॥
ह्मणसी होऊनी नििंश्चता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होइऩल तुझ्या ॥1॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी
आंत बाहएात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥2॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी ।
जागा होइप करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे हाय करिसी मग ॥3॥
पद 1779
कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
ह्मणऊनि नििश्चत राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥1॥
कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काइऩ न दिसे देवा ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समपिऩली ॥2॥
पितरस्वरूपी तूं चि जनादऩन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका ह्मणे जीत पिंड तुह्मां हातीं। देऊनि नििंश्चती मानियेली ॥3॥
पद 1780
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥1॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥2॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥3॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥4॥
जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥5॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥6॥
तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥7॥
पद 1782
कस्तुरी भिनली जये मृित्तके । तयेसी आणिके कैसी सरी ॥1॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥2॥
तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥
पद 1785
देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥1॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥2॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥3॥
तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥4॥
पद 1786
घेइऩन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥
हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥2॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होइऩन उदास सर्व भावें ॥3॥
मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥4॥
पद 1787
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥1॥
तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥2॥
न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥3॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥4॥
तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥5॥
पद 1788
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुहए भाव शुद्ध बोला ॥1॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥2॥
तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥3॥
पद 1790
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥1॥
रवि दीप कािळमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥2॥
परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥3॥
तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥4॥
पद 1791
परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥1॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥2॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥3॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे॥4॥
पद 1792
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥1॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काइऩ ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जािळलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥2॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥3॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥4॥
तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥5॥
पद 1793
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥1॥
जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥
एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥2॥
गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥3॥
स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥4॥
तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥5॥
पद 1795
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराइऩ ॥1॥
परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥2॥
इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥3॥
न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥4॥
प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥5॥
पद 1796
आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥1॥
आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥2॥
पोहएा अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥3॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काइऩ ।
तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥4॥
पद 1798
तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥1॥
तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥2॥
तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर॥3॥
पद 1799
आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम॥1॥
न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां॥ध्रु.॥
आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥2॥
तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥3॥
पद 1800
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥
ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥
तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥
परिचय
संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग 1501 ते 1800. तुकारामांचे अभंग हे वारकरी संप्रदायाचा प्राण मानले जातात — विठ्ठलभक्ती, संतसंगती, नामस्मरण आणि परखड आत्मपरीक्षण हे त्यांचे विषय.
॥ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ॥
संदर्भ 1
- तुकाराम गाथा — mr.wikisource.org
मराठी विकिस्रोत आवृत्ती. या विभागातील 249 अभंग येथे दिले आहेत; 51 अभंगांचा मूळ पाठ विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध नसल्याने वगळला आहे.
परवाना: CC BY-SA 4.0 — Text adapted from Wikimedia projects, licensed CC BY-SA 4.0. Adaptations must be shared alike.
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.