तुकाराम गाथा — अभंग 4201–4500
आकार
मांडणी
संसार करिती मोठएा महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥1॥
पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥
आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥2॥
विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । ह्मणोनि लागले जन्ममृत्यु ॥3॥
तुका ह्मणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥4॥
गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥1॥
त्यासी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥2॥
तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥3॥
भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥1॥
कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥
अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥2॥
कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥3॥
तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥4॥
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळइऩच्या माथां तिडिक उठे ॥2॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥3॥
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥1॥
आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥2॥
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥3॥
हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥1॥
आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें॥ध्रु॥
तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥2॥
जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥3॥
काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥4॥
तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥5॥
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥1॥
तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥2॥
कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥3॥
तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥4॥
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥1॥
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥
आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥2॥
तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥3॥
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥1॥
मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥
वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥2॥
तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥3॥
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥1॥
मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥
गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥2॥
तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥3॥
धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥1॥
अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥
अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥
तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥
अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥
वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥
तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥
अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥
गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥
तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥1॥
सकुमार मूतिऩ श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥
लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥2॥
चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥3॥
तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥4॥
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥1॥
विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥
जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ 2॥
तुका ह्मणे अवघा वोणवा गीिळला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥3॥
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥1॥
नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥
होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥2॥
वोणव्याच्या रागें गििळशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥3॥
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥1॥
शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥
गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥2॥
कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गििळयेलें ॥3॥
तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥4॥
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥1॥
बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होइऩल पोिळली नारायणा ॥ध्रु.॥
बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥2॥
घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥3॥
तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥4॥
एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥1॥
वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥
ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥2॥
तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥3॥
एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥1॥
गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥
ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥2॥
तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥3॥
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥1॥
ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥
निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥2॥
चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥3॥
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥1॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥
जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥2॥
तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥3॥
दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥4॥
भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥5॥
माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥6॥
ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥7॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥8॥
तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥9॥
कामाचा अंकित कांतेतें प्राथिऩत । तूं कां हो दुिश्चत्त निरंतर ॥1॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥
त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥2॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥3॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥4॥
ताइऩत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥5॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥6॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जािळया फुलें ॥7॥
तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥8॥
उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥1॥
एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥
परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥2॥
तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥3॥
सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥1॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
चुकला हा भार । तयाची च येरझार ॥2॥
तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास॥3॥
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥1॥
यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥2॥
अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥3॥
ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥1॥
न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
चोरटएासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥2॥
तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान॥3॥
पािळयेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥1॥
बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥2॥
तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण॥3॥
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो॥1॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥2॥
बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥3॥
दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥4॥
मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥5॥
तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥6॥
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥1॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइऩल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥2॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥3॥
भल्या बुऱ्या मारी । होतां कोणी न निवारी ॥4॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥5॥
तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥6॥
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥1॥
निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥2॥
तुका ह्मणे जडबुिद्ध । कर्मशुद्धी सांडवीं ॥3॥
गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥1॥
मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥2॥
तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥3॥
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥1॥
न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥2॥
तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे॥3॥
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥1॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥2॥
तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥3॥
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा॥1॥
कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥
रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥2॥
तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥3॥
होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥1॥
संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस॥ध्रु.॥
नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥2॥
तुका ह्मणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥3॥
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी॥1॥
अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥
विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥3॥
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥1॥
तो ही येथें कामा नये । नकाऩ जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥2॥
तुका ह्मणे दांभिक तो । नकाऩ जातो स्वइच्छा ॥3॥
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥1॥
सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥2॥
तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥3॥
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥1॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे॥2॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥3॥
तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥4॥
तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस॥1॥
मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥2॥
सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥3॥
जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥1॥
केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥
हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥2॥
तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी॥3॥
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नकाऩ द्वारीं॥1॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥
बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥2॥
तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥3॥
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥1॥
ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥3॥
आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥4॥
तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥5॥
आमुचें दंडवत पायांवरि डोइऩ । व्हावें उतराइऩ ठेवूनियां॥1॥
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥2॥
तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥3॥
तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥1॥
सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥
काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥2॥
उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडािळतां ॥3॥
तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥4॥
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥1॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें॥ध्रु.॥
तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥2॥
तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥3॥
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥1॥
बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥
तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥3॥
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥1॥
मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥
मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥2॥
तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥3॥
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥1॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
अधमाचें चित्त दुिश्चत्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥2॥
गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥3॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥4॥
तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥5॥
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥
शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥
तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥1॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाइऩच्या पति पांडुरंगा ॥1॥
चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥
तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥1॥
तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥
काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥2॥
तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥3॥
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दुऱ्हावला ॥1॥
ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥
मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥2॥
हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥4॥
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥1॥
तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥
कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥2॥
तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥3॥
तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥4॥
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥1॥
जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥2॥
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥3॥
तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥4॥
तुज केलिया नव्हे ऐसें काइऩ । डोंगराची राइऩ क्षणमात्रें॥1॥
मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥
सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥2॥
दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥3॥
तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥4॥
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥1॥
अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥
सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥2॥
स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥3॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥4॥
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी॥1॥
जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥
लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥
मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥3॥
तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥4॥
4274. पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥1॥
सोइऱ्याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥
बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥2॥
श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥3॥
नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥4॥
हातें मोऱ्या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥5॥
सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥6॥
हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥7॥
पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥8॥
देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥9॥
गाइऩला देखोनी बदबदां मारी । घोडएाची चाकरी गोड लागे ॥10॥
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥11॥
तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥12॥
आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥1॥
मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥
वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥2॥
तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें॥3॥
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥1॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥3॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥3॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥4॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥5॥
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥6॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥7॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥8॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥9॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥10॥
तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥11॥
4277. नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥1॥
सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥
आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥2॥
तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥3॥
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥1॥
विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥
देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥2॥
ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥3॥
तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥4॥
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥1॥
वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥
ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥2॥
ऐशालागीं मन वोळगे अहनिऩशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥3॥
तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥4॥
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥1॥
काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृिष्ट जाली ॥ध्रु.॥
आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥2॥
तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥3॥
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥1॥
चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥2॥
नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥3॥
तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥4॥
बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं॥1॥
आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥3॥
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥1॥
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
चंद्रामृतें तृिप्तपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥2॥
अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥3॥
तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥4॥
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीतिऩ महाद्वारीं वानूं तुझी ॥1॥
पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥
साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥2॥
तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥3॥
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु॥1॥
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥2॥
तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥3॥
कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा॥1॥
काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥
तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥2॥
तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥3॥
तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा॥1॥
आतां न धरावें दुरी । बोल येइऩल ब्रीदावरी ॥ध्रु.॥
पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥2॥
तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥3॥
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥1॥
त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥
ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी॥2॥
आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे॥3॥
केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥4॥
करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥5॥
तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥6॥
मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥1॥
आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥2॥
तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥3॥
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥1॥
अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥
त्याचा होइऩन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥2॥
तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥3॥
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥1॥
वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें॥ध्रु.॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥2॥
व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥3॥
तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥4॥
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥1॥
तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा॥ध्रु.॥
तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥2॥
विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥3॥
तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥4॥
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥1॥
तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥2॥
तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥3॥
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥
भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
मिराबाइऩसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥2॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥
आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥4॥
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥1॥
कावऑयाचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥
क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥2॥
तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥3॥
मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पििळतां रस कैंचा ॥1॥
वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥
नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥2॥
नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥3॥
धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं॥1॥
धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥
माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥2॥
एके हातीं धरली दाढी । घे कुऱ्हाडी दुजे हातीं ॥3॥
येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥4॥
तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥5॥
निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥1॥
निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥2॥
तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥3॥
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुिद्धभेद॥1॥
जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण॥2॥
निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥3॥
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥1॥
ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥2॥
तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥3॥
स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥1॥
चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥
शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥2॥
तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥3॥
आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥1॥
पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥
भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥2॥
नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥3॥
सद्गूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥1॥
उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं॥2॥
नमस्कारीं त्याला सद्गुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥3॥
सद्गूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥1॥
हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥2॥
बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥3॥
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥1॥
देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥2॥
बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥3॥
सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥1॥
फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥
शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥2॥
तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥3॥
चरणीं नमन सद्गूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥1॥
गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काऑया नाथिला महाबळी ॥ध्रु.॥
ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनादऩन ॥2॥
तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥3॥
सद्गूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि॥1॥
ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥
कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥2॥
तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥3॥
डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना॥1॥
परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥
डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥2॥
परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते॥3॥
ब्राह्मणें ब्राह्मणा सद्गू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥4॥
तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥5॥
कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा॥1॥
चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥
लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥2॥
तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥3॥
ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥4॥
न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥1॥
खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले॥ध्रु.॥
भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥3॥
अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे॥1॥
ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥
स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥2॥
तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥3॥
पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनादऩन ॥4॥
तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आइऩ तो चि विठो ॥5॥
ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥
असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥
तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥
किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास॥1॥
तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥
तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥3॥
कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥1॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥
ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥2॥
एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥3॥
तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥4॥
उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥1॥
पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥
खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥2॥
तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥3॥
पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥1॥
या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥
धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥2॥
केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥3॥
दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥4॥
दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥5॥
तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥6॥
पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥1॥
कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥
मृित्तकेचे घट जाले नानापरी । मृित्तका अवधारीं एकपणें ॥2॥
तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥3॥
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥1॥
भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृित्त थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥
निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥2॥
सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥3॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥4॥
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाइऩन पवित्र पांडुरंग ॥1॥
दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥
तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥2॥
चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाइऩन निधान पांडुरंग ॥3॥
पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाइऩन निरंतरा पांडुरंगा ॥4॥
साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥5॥
सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥6॥
आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥7॥
नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥8॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥9॥
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥1॥
ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥
नाम प्रऱ्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥2॥
नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥3॥
नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥4॥
नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥5॥
नाम जाणे शुकमूतिऩ । जाणे राजा परििक्षती ॥6॥
नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥7॥
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥1॥
करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥
सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥2॥
पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥3॥
विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥4॥
किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥1॥
नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥2॥
तुका ह्मणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥3॥
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥1॥
जिव्हाऑयाचा काठी उबाऑयाच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥
तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥2॥
तुका ह्मणे ऐसी नोवऱ्याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥3॥
न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥1॥
चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥
काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥2॥
तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥3॥
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥1॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥2॥
तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥3॥
विधवेसि एक सुत । अहनिऩशीं तेथें चित्त ॥1॥
तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥
सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति॥3॥
व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥1॥
पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥
अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥2॥
तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे॥3॥
पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥1॥
ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥
गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥2॥
उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥3॥
गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥4॥
खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥5॥
आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥1॥
पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाइऩ आमुचि माता ॥ध्रु.॥
भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥2॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥3॥
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी॥1॥
तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥
जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥2॥
तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥3॥
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥1॥
मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥
बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥2॥
तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं॥3॥
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥1॥
रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥2॥
तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा॥3॥
सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥1॥
सर्वांगें तो सवाौत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥
ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥2॥
तुका ह्मणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा॥3॥
जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥1॥
नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥
येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥2॥
तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥3॥
पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।
तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥
देव्हाऱ्यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥
ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥1॥
लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा॥ध्रु.॥
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥2॥
केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥3॥
नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥4॥
तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥5॥
संचित तैशी बुिद्ध उपजे मनामधीं । सांगितलें सििद्ध नव जाय ॥1॥
ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥2॥
घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥3॥
कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥1॥
तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥
अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥2॥
तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥3॥
धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥1॥
चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥2॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥3॥
तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥4॥
पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥1॥
तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥
आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥3॥
सोडियेल्या गाइऩ नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥1॥
सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाइऩ वनामाजी ॥ध्रु.॥
गाइऩगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥2 ॥
काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥3॥
गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥4॥
तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥5॥
तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥6॥
ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृिप्त जाली ॥1॥
मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । वििस्मत विधाता देखोनियां ॥ध्रु.॥
दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । वििस्मत मानसीं सुरवर ॥2॥
देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥3॥
तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥4॥
आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥1॥
श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥
होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥2॥
अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥3॥
तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥4॥
एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥1॥
एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥
हाता हात हाणे लाही । पळतां घाइऩ चुकविती ॥2॥
तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥3॥
चला वळूं गाइऩ । दूर अंतरल्या भाइऩ ॥1॥
खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥
गाइऩ हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥2॥
तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥3॥
नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥1॥
हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥2॥
तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥3॥
जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥1॥
गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥2॥
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥3॥
आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥1॥
यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥
सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥2॥
तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥3॥
भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥1॥
मन बुिद्ध जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥
कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥2॥
तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥3॥
कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥1॥
ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥
तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥2॥
तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥3॥
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥
लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥
तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥
सांवळें सुंदर पाहे दृिष्टभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥1॥
मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाइऩसवें सदा ॥ध्रु.॥
मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥2॥
वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा॥3॥
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी॥1॥
कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥
जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥2॥
मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें॥3॥
मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥4॥
तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥5॥
पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥1॥
पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥
कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।2॥
मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥3॥
तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥4॥
ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥1॥
पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥
आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥2॥
तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥3॥
शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥1॥
काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥
जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा॥3॥
माझें परिसावें गाऱ्हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥1॥
माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥
सबाहएअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥2॥
तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा॥3॥
देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥1॥
एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥
बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥2॥
पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥3॥
तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥4॥
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥1॥
निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥2॥
नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥3॥
तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥4॥
येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥1॥
येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥
न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥2॥
तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाइऩ । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥3॥
कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥1॥
शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाइऩ॥ध्रु.॥
क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥2॥
तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावइऩन॥3॥
अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥1॥
तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥
मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥2॥
तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥3॥
आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥1॥
पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेिक्षलें न सोडीं मी ॥ध्रु.॥
कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥2॥
तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥3॥
बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥1॥
तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥
ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥2॥
तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥3॥
पंचािग्नसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥1॥
सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥
सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥2॥
वाटतें सेवटीं जालासि निष्ठ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥3॥
तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥1॥
बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥
मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥2॥
अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥3॥
अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥4॥
ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥5॥
तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥6॥
काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥1॥
नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥
आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥2॥
तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥3॥
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥1॥
अगा विश्वव्यापका जनादऩना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मदऩना कंसाचिया ॥ध्रु.॥
अगा सवाौत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥2॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥3॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥4॥
अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका ह्मणे ॥5॥
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाइऩची पावेल ॥1॥
श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥
जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥2॥
तुका ह्मणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥3॥
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥1॥
काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥
अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥2॥
तुका ह्मणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥3॥
हें चि मागणें विठाबाइऩ । पायीं ठेवूनियां डोइऩ ॥1॥
शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥
मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृित्त जडो ॥2॥
तुका ह्मणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥3॥
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥1॥
तुजलागीं दानें तुजलागीं तीथॉ । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥
सकळ चित्तवृित्त दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥2॥
तुका ह्मणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥3॥
पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥1॥
कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥
वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥2॥
नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥3॥
तुका ह्मणे भेटी देइप नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥4॥
पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥1॥
अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥
तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥2॥
नारद प्रऱ्हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥3॥
अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥4॥
धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥5॥
जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥6॥
तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥7॥
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्तीं ॥1॥
तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥
आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥2॥
आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया॥3॥
तुका ह्मणे देइप चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥4॥
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥1॥
अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥3॥
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥1॥
नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुह्मांस फुकाचें हें ॥ध्रु.॥
संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥2॥
तुका ह्मणे आह्मीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥3॥
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥1॥
बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥
बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥2॥
ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥3॥
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥1॥
सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया॥ध्रु.॥
करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा॥2॥
जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥3॥
तुका ह्मणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥4॥
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥1॥
शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥
इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥2॥
तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥3॥
तुका ह्मणे देइप दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रह्मादिकां ॥4॥
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आह्मां अनाथांच्या माहेरा ये ॥1॥
भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥
आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥2॥
वाटे चित्तीं काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥3॥
तुका ह्मणे माझे पुरवीं मनोरथ । येइऩ गा न संवरीत पांडुरंगा ॥4॥
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥1॥
नामाचा प्रताप िब्रदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥2॥
माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥3॥
तुका ह्मणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥4॥
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥1॥
होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥2॥
तुका ह्मणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥3॥
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून॥1॥
कोण करील माझें साहे । चित्तीं विचारूनि पाहें ॥ध्रु.॥
तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥2॥
तुका ह्मणे निका । भवसिंधु तारक नौका ॥3॥
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज॥1॥
आहें अमंगळ दुर्बळ । होइप दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥
बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥2॥
तुका ह्मणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥3॥
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥1॥
गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥
काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥2॥
तुका ह्मणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥3॥
अगा पंढरीच्या राया । वेगीं येइप तूं सावया ॥1॥
दीनबंधु तुझें नाम । देइप आपुलें आह्मां प्रेम ॥ध्रु.॥
जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥2॥
तुका ह्मणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥3॥
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥1॥
आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥
काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥2॥
लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥3॥
तुका ह्मणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥4॥
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥1॥
काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥
न लभे व्रततीर्थदानीं। तें या विठ्ठलदर्शनीं ॥2॥
साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥3॥
तुका ह्मणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥4॥
गव्हांच्या घुगऱ्या । नाचण्यांच्या पुऱ्या । बऱ्या त्या चि बऱ्या । पाधाणी त्या पाधाणी ॥1॥
काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥
रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥2॥
तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥3॥
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥1 ॥
ह्मणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥
लोभिक तें लोभा लावी। बांधल्या गोवी वांचूनि ॥2॥
तुका ह्मणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥3॥
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥1॥
नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥2॥
तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥3॥
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥1॥
सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥
आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥2॥
पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥3॥
करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥4॥
स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥5॥
अवघ्या कोल्हएांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥1॥
भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥
कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥2॥
दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥3॥
तुझे ह्मणों आह्मां । मग उणें पुरुषोत्तमा ॥1॥
ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥
कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥2॥
तुका ह्मणे परीस । सांपडल्या उपवास॥3॥
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥1॥
तेथें आह्मीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥
ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥2॥
तुका ह्मणे आह्मी किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥3॥
डोिळयांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥1॥
काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥
आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥2॥
तुका ह्मणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥3॥
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥1॥
नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥2॥
शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥3॥
तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥4॥
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥1॥
दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥
छाटी भगवी मानसीं ।व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥2॥
तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥3॥
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ 1 ॥
डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥
न वजिऩतां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥2॥
तुका ह्मणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥3॥
आपटा संवदड रानचारा । दसऱ्याचा होय तुरा॥1॥
तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥
मृित्तकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥2॥
तुका ह्मणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥3॥
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल॥1॥
नाम वाचे श्रवण कीिर्त्त । पाउलें चित्तीं समान ॥ध्रु.॥
कीर्त्तनाचा समारंभ । निदपभ सर्वदा ॥2॥
तुका ह्मणे स्वरूपसििद्ध । नित्य समाधि हरिनामीं ॥3॥
आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥1॥
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥
आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥2॥
येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥3॥
रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥4॥
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥1॥
ऐसें आह्मां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥
बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥2॥
तुका ह्मणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥3॥
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥1॥
तुझ्या नामबळें तरले पतित । ह्मणोनि माझें चित्त तुझे पायीं ॥2॥
तुका ह्मणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥3॥
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥1॥
तूं अखंड दुिश्चत्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥2॥
तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥3॥
बाइऩल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥1॥
सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥
जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥2॥
न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥3॥
फजित केलें जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं॥4॥
गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥5॥
तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥6॥
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निद।व ॥1॥
देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥
नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥2॥
साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे॥3॥
दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥4॥
तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥5॥
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येइऩल काळा फोडों डोइऩ ॥1॥
तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥
येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होइऩल तें दुरि शृंगारिलें ॥2॥
तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥3॥
होइप आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥1॥
आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तइप सकळ चिंता ॥ध्रु.॥
अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥2॥
तुका ह्मणे जालें एक चि वचन । केलिया कीर्त्तन आराणुक ॥3॥
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥1॥
काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥
काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥2॥
तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥3॥
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥1॥
दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥
जातीचें मी हीन न कळे भजन । ह्मणोनि संतचरण इच्छीतसें ॥2॥
तुका ह्मणे मज ह्मणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥3॥
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥1॥
शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥
शिवास नामाचा आधार । केला किळकाळ किंकर ॥2॥
मरण जालें काशीपुरी। तेथें नाम चि उद्धरी ॥3॥
तुका ह्मणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥4॥
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साहए होय ॥1॥
उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साहए करी ॥ध्रु.॥
शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साहए करी ॥2॥
असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥3॥
तुका ह्मणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥4॥
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥1॥
बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥
क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥2॥
सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥3॥
तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा॥4॥
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥5॥
ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥6॥
प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥7॥
सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥8॥
तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥9॥
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥1॥
माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥
माझें दुःख जरी ऐकशील सइऩ । ह्मातारा तो बाइऩ खोकतसे ॥2॥
खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥3॥
पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥4॥
जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥5॥
पूर्व सुकृताचा हा चि बाइऩ ठेवा । तुका ह्मणे देवा काय बोल ॥6॥
स्वामीच्या सामथ्यॉ । चाले बोलिला पुरुषार्थ ॥1॥
पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥
देव ज्यासी साहए । तेणें केलें सर्व होय ॥2॥
तुका ह्मणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥3॥
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आह्मां दिनानाथें रिक्षयेलें ॥1॥
यम नेतां तुह्मां रक्षील हें कोण । तुह्मां धन्यधन्य कोण ह्मणती ॥ध्रु.॥
संतसज्जनमेळा पवित्र संतकीतिऩ । त्यांनीं उत्तम िस्थति सांगितली ॥2॥
तें चि धरोनि चित्तीं तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥3॥
देवासी पैं भांडों एकचित्त करूनि । आह्मांसि सज्जनीं सांगितलें ॥1॥
आह्मां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥
तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आह्मां देशवटी देवो सुखें ॥2॥
देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥3॥
चित्तीं धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥4॥
तुका ह्मणे सर्व देवाची नष्टाइऩ । आह्मी सुखें डुलतसों ॥5॥
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥1॥
धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥
भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥2॥
तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥3॥
गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥4॥
तुका ह्मणे हातीं । न धरितां गमाविती ॥5॥
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥1॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥
दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥2॥
कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥3॥
तुका ह्मणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥4॥
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग॥1॥
हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥2॥
गोब्राह्मणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका ह्मणे ॥3॥
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभािळली भूमि शुद्ध ॥1॥
उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय ह्मुण ॥ध्रु.॥
खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥2॥
हातींचा हिरोनि घातला पोटासी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥3॥
ओंव्या प्रारंभ 231 अभंग 3
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥1॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥2॥
कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥3॥
आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥4॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥5॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥6॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥7॥
संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥8॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥9॥
करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥10॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥11॥
चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥12॥
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥1॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥2॥
सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥3॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥4॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥5॥
गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप॥6॥
आपेंआप बेडएा तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥7॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥8॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥9॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥10॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥11॥
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥1॥
खेळविला जिंहीं अंतर्बाहएसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥2॥
दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥3॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥4॥
ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥5॥
विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥6॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥7॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥8॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥9॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥1॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥2॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥3॥
माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥4॥
जैसा तैसा आहे अंतर्बाहएात्कारीं । ह्मणउनि चोरी नसंपडे ॥5॥
नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥6॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥7॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥8॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥9॥
भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥10॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका ह्मणें भावें चाड एका ॥11॥
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥1॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समपिऩलें ॥2॥
समथॉ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे॥3॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाइऩ चारी ॥4॥
गाइऩ चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥5॥
काय गौिळयांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाइऩ पशु ॥6॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥7॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥8॥
परी याचि तुह्मी आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥9॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥10॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥11॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥12॥
तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वर्म दावी सोपें ॥13॥
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौिळयांच्या ॥1॥
यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥2॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥3॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रूप ॥4॥
रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥5॥
लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥6॥
कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥7॥
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥1॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥2॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥3॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥4॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥5॥
बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥6॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥7॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौिळयांसी ॥8॥
सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥9॥
तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥10॥
दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥11॥
आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥12॥
मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥13॥
लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥14॥
भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥15॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥16॥
हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥17॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥18॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥19॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥20॥
नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥21॥
अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥22॥
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥1॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥2॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग॥3॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौिळयांची ॥4॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥5॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौिळयांचें ॥6॥
गौिळयांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥7॥
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥1॥
ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥2॥
वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥3॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥4॥
याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥5॥
लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥6॥
अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥7॥
नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥8॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥9॥
आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥10॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥11॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥12॥
बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥13॥
तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥1॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥2॥
याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥3॥
ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥4॥
विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥5॥
कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥6॥
विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥7॥
एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥8॥
खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥9॥
चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥10॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥11॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥12॥
त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥13॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥14॥
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥1॥
एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥2॥
जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥3॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥4॥
लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥5॥
लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥6॥
व्याही भाइऩ हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥7॥
एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥8॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाइऩ ॥9॥
लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥10॥
त्यांणीं मृित्तकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥11॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥12॥
विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥13॥
यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥14॥
खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥15॥
तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥16॥
तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥17॥
काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी॥18॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती॥19॥
धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती॥20॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥21॥
बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥22॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥23॥
वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥24॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती॥25॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥26॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥27॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला॥28॥
पद 4201

पद 4202

पद 4203

पद 4204
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळइऩच्या माथां तिडिक उठे ॥2॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥3॥
पद 4205
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥1॥
आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥2॥
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥3॥
पद 4206
हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥1॥
आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें॥ध्रु॥
तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥2॥
जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥3॥
काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥4॥
तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥5॥
पद 4207
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥1॥
तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥2॥
कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥3॥
तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥4॥
पद 4208
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥1॥
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥
आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥2॥
तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥3॥
पद 4209
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥1॥
मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥
वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥2॥
तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥3॥
पद 4210
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥1॥
मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥
गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥2॥
तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥3॥
पद 4211
धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥1॥
अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥
अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥
तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥
पद 4212
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥
अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥
वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥
तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥
पद 4213
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥
अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥
गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥
तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥
पद 4214
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥1॥
सकुमार मूतिऩ श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥
लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥2॥
चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥3॥
तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥4॥
पद 4215
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥1॥
विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥
जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ 2॥
तुका ह्मणे अवघा वोणवा गीिळला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥3॥
पद 4216
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥1॥
नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥
होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥2॥
वोणव्याच्या रागें गििळशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥3॥
पद 4217
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥1॥
शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥
गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥2॥
कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गििळयेलें ॥3॥
तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥4॥
पद 4218
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥1॥
बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होइऩल पोिळली नारायणा ॥ध्रु.॥
बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥2॥
घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥3॥
तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥4॥
पद 4219
एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥1॥
वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥
ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥2॥
तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥3॥
पद 4220
एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥1॥
गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥
ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥2॥
तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥3॥
पद 4221
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥1॥
ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥
निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥2॥
चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥3॥
पद 4223
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥1॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥
जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥2॥
तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥3॥
दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥4॥
भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥5॥
माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥6॥
ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥7॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥8॥
तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥9॥
पद 4224
कामाचा अंकित कांतेतें प्राथिऩत । तूं कां हो दुिश्चत्त निरंतर ॥1॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥
त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥2॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥3॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥4॥
ताइऩत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥5॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥6॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जािळया फुलें ॥7॥
तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥8॥
पद 4225
उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥1॥
एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥
परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥2॥
तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥3॥
पद 4227
सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥1॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
चुकला हा भार । तयाची च येरझार ॥2॥
तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास॥3॥
पद 4228
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥1॥
यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥2॥
अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥3॥
पद 4229
ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥1॥
न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
चोरटएासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥2॥
तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान॥3॥
पद 4230
पािळयेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥1॥
बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥2॥
तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण॥3॥
पद 4231
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो॥1॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥2॥
बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥3॥
दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥4॥
मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥5॥
तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥6॥
पद 4232
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥1॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइऩल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥2॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥3॥
भल्या बुऱ्या मारी । होतां कोणी न निवारी ॥4॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥5॥
तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥6॥
पद 4233
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥1॥
निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥2॥
तुका ह्मणे जडबुिद्ध । कर्मशुद्धी सांडवीं ॥3॥
पद 4234
गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥1॥
मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥2॥
तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥3॥
पद 4235
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥1॥
न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥2॥
तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे॥3॥
पद 4236
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥1॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥2॥
तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥3॥
पद 4237
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा॥1॥
कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥
रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥2॥
तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥3॥
पद 4238
होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥1॥
संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस॥ध्रु.॥
नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥2॥
तुका ह्मणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥3॥
पद 4239
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी॥1॥
अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥
विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥3॥
पद 4240
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥1॥
तो ही येथें कामा नये । नकाऩ जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥2॥
तुका ह्मणे दांभिक तो । नकाऩ जातो स्वइच्छा ॥3॥
पद 4241
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥1॥
सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥2॥
तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥3॥
पद 4242
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥1॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे॥2॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥3॥
तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥4॥
पद 4244
तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस॥1॥
मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥2॥
सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥3॥
पद 4246
जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥1॥
केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥
हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥2॥
तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी॥3॥
पद 4247
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नकाऩ द्वारीं॥1॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥
बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥2॥
तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥3॥
पद 4248
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥1॥
ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥3॥
आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥4॥
तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥5॥
पद 4249
आमुचें दंडवत पायांवरि डोइऩ । व्हावें उतराइऩ ठेवूनियां॥1॥
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥2॥
तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥3॥
पद 4251
तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥1॥
सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥
काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥2॥
उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडािळतां ॥3॥
तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥4॥
पद 4254
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥1॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें॥ध्रु.॥
तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥2॥
तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥3॥
पद 4256
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥1॥
बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥
तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥3॥
पद 4257
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥1॥
मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥
मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥2॥
तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥3॥
पद 4258
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥1॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
अधमाचें चित्त दुिश्चत्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥2॥
गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥3॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥4॥
तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥5॥
पद 4259
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥
शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥
तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥
पद 4260
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥1॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥
पद 4263
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाइऩच्या पति पांडुरंगा ॥1॥
चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥
तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥
पद 4264
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥1॥
तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥
काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥2॥
तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥3॥
पद 4268
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दुऱ्हावला ॥1॥
ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥
मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥2॥
हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥4॥
पद 4269
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥1॥
तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥
कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥2॥
तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥3॥
तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥4॥
पद 4270
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥1॥
जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥2॥
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥3॥
तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥4॥
पद 4271
तुज केलिया नव्हे ऐसें काइऩ । डोंगराची राइऩ क्षणमात्रें॥1॥
मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥
सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥2॥
दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥3॥
तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥4॥
पद 4272
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥1॥
अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥
सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥2॥
स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥3॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥4॥
पद 4273
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी॥1॥
जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥
लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥
मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥3॥
तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥4॥
4274. पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥1॥
सोइऱ्याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥
बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥2॥
श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥3॥
नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥4॥
हातें मोऱ्या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥5॥
सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥6॥
हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥7॥
पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥8॥
देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥9॥
गाइऩला देखोनी बदबदां मारी । घोडएाची चाकरी गोड लागे ॥10॥
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥11॥
तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥12॥
पद 4275
आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥1॥
मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥
वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥2॥
तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें॥3॥
पद 4276
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥1॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥3॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥3॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥4॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥5॥
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥6॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥7॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥8॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥9॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥10॥
तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥11॥
4277. नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥1॥
सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥
आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥2॥
तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥3॥
पद 4278
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥1॥
विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥
देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥2॥
ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥3॥
तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥4॥
पद 4279
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥1॥
वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥
ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥2॥
ऐशालागीं मन वोळगे अहनिऩशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥3॥
तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥4॥
पद 4280
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥1॥
काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृिष्ट जाली ॥ध्रु.॥
आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥2॥
तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥3॥
पद 4281
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥1॥
चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥2॥
नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥3॥
तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥4॥
पद 4283
बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं॥1॥
आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥3॥
पद 4285
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥1॥
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
चंद्रामृतें तृिप्तपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥2॥
अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥3॥
तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥4॥
पद 4286
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीतिऩ महाद्वारीं वानूं तुझी ॥1॥
पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥
साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥2॥
तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥3॥
पद 4287
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु॥1॥
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥2॥
तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥3॥
पद 4288
कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा॥1॥
काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥
तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥2॥
तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥3॥
पद 4289
तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा॥1॥
आतां न धरावें दुरी । बोल येइऩल ब्रीदावरी ॥ध्रु.॥
पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥2॥
तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥3॥
पद 4291
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥1॥
त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥
ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी॥2॥
आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे॥3॥
केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥4॥
करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥5॥
तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥6॥
पद 4292
मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥1॥
आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥2॥
तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥3॥
पद 4293
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥1॥
अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥
त्याचा होइऩन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥2॥
तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥3॥
पद 4294
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥1॥
वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें॥ध्रु.॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥2॥
व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥3॥
तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥4॥
पद 4295
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥1॥
तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा॥ध्रु.॥
तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥2॥
विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥3॥
तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥4॥
पद 4296
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥1॥
तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥2॥
तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥3॥
पद 4298
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥
भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
मिराबाइऩसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥2॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥
आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥4॥
पद 4300
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥1॥
कावऑयाचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥
क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥2॥
तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥3॥
पद 4301
मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पििळतां रस कैंचा ॥1॥
वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥
नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥2॥
नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥3॥
पद 4302
धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं॥1॥
धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥
माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥2॥
एके हातीं धरली दाढी । घे कुऱ्हाडी दुजे हातीं ॥3॥
येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥4॥
तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥5॥
पद 4303
निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥1॥
निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥2॥
तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥3॥
पद 4304
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुिद्धभेद॥1॥
जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण॥2॥
निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥3॥
पद 4307
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥1॥
ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥2॥
तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥3॥
पद 4310
स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥1॥
चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥
शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥2॥
तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥3॥
पद 4311
आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥1॥
पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥
भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥2॥
नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥3॥
पद 4312
सद्गूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥1॥
उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं॥2॥
नमस्कारीं त्याला सद्गुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥3॥
पद 4313
सद्गूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥1॥
हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥2॥
बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥3॥
पद 4314
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥1॥
देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥2॥
बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥3॥
पद 4315
सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥1॥
फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥
शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥2॥
तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥3॥
पद 4317
चरणीं नमन सद्गूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥1॥
गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काऑया नाथिला महाबळी ॥ध्रु.॥
ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनादऩन ॥2॥
तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥3॥
पद 4318
सद्गूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि॥1॥
ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥
कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥2॥
तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥3॥
पद 4319
डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना॥1॥
परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥
डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥2॥
परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते॥3॥
ब्राह्मणें ब्राह्मणा सद्गू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥4॥
तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥5॥
पद 4321
कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा॥1॥
चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥
लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥2॥
तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥3॥
ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥4॥
पद 4323
न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥1॥
खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले॥ध्रु.॥
भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥3॥
पद 4324
अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे॥1॥
ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥
स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥2॥
तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥3॥
पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनादऩन ॥4॥
तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आइऩ तो चि विठो ॥5॥
पद 4325
ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥
असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥
तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥
पद 4326
किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास॥1॥
तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥
तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥3॥
पद 4327
कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥1॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥
ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥2॥
एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥3॥
तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥4॥
पद 4328
उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥1॥
पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥
खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥2॥
तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥3॥
पद 4329
पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥1॥
या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥
धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥2॥
केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥3॥
दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥4॥
दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥5॥
तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥6॥
पद 4330
पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥1॥
कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥
मृित्तकेचे घट जाले नानापरी । मृित्तका अवधारीं एकपणें ॥2॥
तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥3॥
पद 4331
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥1॥
भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृित्त थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥
निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥2॥
सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥3॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥4॥
पद 4334
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाइऩन पवित्र पांडुरंग ॥1॥
दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥
तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥2॥
चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाइऩन निधान पांडुरंग ॥3॥
पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाइऩन निरंतरा पांडुरंगा ॥4॥
साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥5॥
सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥6॥
आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥7॥
नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥8॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥9॥
पद 4336
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥1॥
ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥
नाम प्रऱ्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥2॥
नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥3॥
नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥4॥
नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥5॥
नाम जाणे शुकमूतिऩ । जाणे राजा परििक्षती ॥6॥
नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥7॥
पद 4337
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥1॥
करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥
सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥2॥
पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥3॥
विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥4॥
पद 4338
किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥1॥
नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥2॥
तुका ह्मणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥3॥
पद 4339
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥1॥
जिव्हाऑयाचा काठी उबाऑयाच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥
तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥2॥
तुका ह्मणे ऐसी नोवऱ्याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥3॥
पद 4340
न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥1॥
चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥
काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥2॥
तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥3॥
पद 4341
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥1॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥2॥
तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥3॥
पद 4342
विधवेसि एक सुत । अहनिऩशीं तेथें चित्त ॥1॥
तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥
सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति॥3॥
पद 4345
व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥1॥
पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥
अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥2॥
तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे॥3॥
पद 4346
पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥1॥
ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥
गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥2॥
उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥3॥
गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥4॥
खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥5॥
पद 4347
आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥1॥
पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाइऩ आमुचि माता ॥ध्रु.॥
भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥2॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥3॥
पद 4348
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी॥1॥
तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥
जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥2॥
तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥3॥
पद 4349
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥1॥
मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥
बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥2॥
तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं॥3॥
पद 4350
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥1॥
रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥2॥
तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा॥3॥
पद 4351
सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥1॥
सर्वांगें तो सवाौत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥
ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥2॥
तुका ह्मणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा॥3॥
पद 4353
जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥1॥
नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥
येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥2॥
तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥3॥
पद 4355
पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।
तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥
देव्हाऱ्यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥
पद 4356
ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥1॥
लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा॥ध्रु.॥
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥2॥
केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥3॥
नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥4॥
तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥5॥
पद 4358
संचित तैशी बुिद्ध उपजे मनामधीं । सांगितलें सििद्ध नव जाय ॥1॥
ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥2॥
घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥3॥
पद 4359
कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥1॥
तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥
अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥2॥
तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥3॥
पद 4360
धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥1॥
चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥2॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥3॥
तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥4॥
पद 4361
पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥1॥
तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥
आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥3॥
पद 4362
सोडियेल्या गाइऩ नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥1॥
सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाइऩ वनामाजी ॥ध्रु.॥
गाइऩगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥2 ॥
काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥3॥
गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥4॥
तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥5॥
तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥6॥
पद 4363
ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृिप्त जाली ॥1॥
मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । वििस्मत विधाता देखोनियां ॥ध्रु.॥
दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । वििस्मत मानसीं सुरवर ॥2॥
देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥3॥
तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥4॥
पद 4364
आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥1॥
श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥
होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥2॥
अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥3॥
तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥4॥
पद 4365
एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥1॥
एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥
हाता हात हाणे लाही । पळतां घाइऩ चुकविती ॥2॥
तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥3॥
पद 4366
चला वळूं गाइऩ । दूर अंतरल्या भाइऩ ॥1॥
खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥
गाइऩ हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥2॥
तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥3॥
पद 4367
नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥1॥
हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥2॥
तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥3॥
पद 4369
जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥1॥
गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥2॥
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥3॥
पद 4372
आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥1॥
यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥
सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥2॥
तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥3॥
पद 4373
भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥1॥
मन बुिद्ध जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥
कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥2॥
तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥3॥
पद 4374
कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥1॥
ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥
तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥2॥
तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥3॥
पद 4375
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥
लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥
तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥
पद 4376
सांवळें सुंदर पाहे दृिष्टभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥1॥
मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाइऩसवें सदा ॥ध्रु.॥
मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥2॥
वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा॥3॥
पद 4377
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी॥1॥
कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥
जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥2॥
मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें॥3॥
मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥4॥
तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥5॥
पद 4378
पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥1॥
पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥
कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।2॥
मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥3॥
तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥4॥
पद 4380
ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥1॥
पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥
आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥2॥
तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥3॥
पद 4382
शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥1॥
काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥
जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा॥3॥
पद 4383
माझें परिसावें गाऱ्हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥1॥
माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥
सबाहएअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥2॥
तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा॥3॥
पद 4385
देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥1॥
एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥
बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥2॥
पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥3॥
तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥4॥
पद 4386
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥1॥
निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥2॥
नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥3॥
तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥4॥
पद 4389
येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥1॥
येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥
न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥2॥
तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाइऩ । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥3॥
पद 4390
कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥1॥
शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाइऩ॥ध्रु.॥
क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥2॥
तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावइऩन॥3॥
पद 4393
अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥1॥
तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥
मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥2॥
तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥3॥
पद 4394
आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥1॥
पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेिक्षलें न सोडीं मी ॥ध्रु.॥
कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥2॥
तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥3॥
पद 4395
बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥1॥
तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥
ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥2॥
तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥3॥
पद 4396
पंचािग्नसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥1॥
सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥
सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥2॥
वाटतें सेवटीं जालासि निष्ठ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥3॥
पद 4397
तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥1॥
बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥
मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥2॥
अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥3॥
अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥4॥
ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥5॥
तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥6॥
पद 4398
काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥1॥
नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥
आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥2॥
तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥3॥
पद 4400
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥1॥
अगा विश्वव्यापका जनादऩना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मदऩना कंसाचिया ॥ध्रु.॥
अगा सवाौत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥2॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥3॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥4॥
अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका ह्मणे ॥5॥
पद 4403
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाइऩची पावेल ॥1॥
श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥
जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥2॥
तुका ह्मणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥3॥
पद 4404
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥1॥
काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥
अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥2॥
तुका ह्मणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥3॥
पद 4405
हें चि मागणें विठाबाइऩ । पायीं ठेवूनियां डोइऩ ॥1॥
शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥
मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृित्त जडो ॥2॥
तुका ह्मणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥3॥
पद 4406
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥1॥
तुजलागीं दानें तुजलागीं तीथॉ । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥
सकळ चित्तवृित्त दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥2॥
तुका ह्मणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥3॥
पद 4407
पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥1॥
कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥
वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥2॥
नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥3॥
तुका ह्मणे भेटी देइप नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥4॥
पद 4408
पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥1॥
अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥
तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥2॥
नारद प्रऱ्हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥3॥
अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥4॥
धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥5॥
जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥6॥
तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥7॥
पद 4409
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्तीं ॥1॥
तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥
आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥2॥
आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया॥3॥
तुका ह्मणे देइप चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥4॥
पद 4410
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥1॥
अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥3॥
पद 4411
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥1॥
नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुह्मांस फुकाचें हें ॥ध्रु.॥
संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥2॥
तुका ह्मणे आह्मीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥3॥
पद 4412
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥1॥
बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥
बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥2॥
ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥3॥
पद 4413
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥1॥
सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया॥ध्रु.॥
करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा॥2॥
जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥3॥
तुका ह्मणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥4॥
पद 4414
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥1॥
शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥
इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥2॥
तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥3॥
तुका ह्मणे देइप दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रह्मादिकां ॥4॥
पद 4416
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आह्मां अनाथांच्या माहेरा ये ॥1॥
भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥
आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥2॥
वाटे चित्तीं काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥3॥
तुका ह्मणे माझे पुरवीं मनोरथ । येइऩ गा न संवरीत पांडुरंगा ॥4॥
पद 4417
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥1॥
नामाचा प्रताप िब्रदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥2॥
माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥3॥
तुका ह्मणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥4॥
पद 4419
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥1॥
होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥2॥
तुका ह्मणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥3॥
पद 4421
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून॥1॥
कोण करील माझें साहे । चित्तीं विचारूनि पाहें ॥ध्रु.॥
तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥2॥
तुका ह्मणे निका । भवसिंधु तारक नौका ॥3॥
पद 4422
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज॥1॥
आहें अमंगळ दुर्बळ । होइप दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥
बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥2॥
तुका ह्मणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥3॥
पद 4423
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥1॥
गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥
काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥2॥
तुका ह्मणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥3॥
पद 4424
अगा पंढरीच्या राया । वेगीं येइप तूं सावया ॥1॥
दीनबंधु तुझें नाम । देइप आपुलें आह्मां प्रेम ॥ध्रु.॥
जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥2॥
तुका ह्मणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥3॥
पद 4426
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥1॥
आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥
काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥2॥
लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥3॥
तुका ह्मणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥4॥
पद 4427
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥1॥
काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥
न लभे व्रततीर्थदानीं। तें या विठ्ठलदर्शनीं ॥2॥
साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥3॥
तुका ह्मणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥4॥
पद 4428
गव्हांच्या घुगऱ्या । नाचण्यांच्या पुऱ्या । बऱ्या त्या चि बऱ्या । पाधाणी त्या पाधाणी ॥1॥
काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥
रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥2॥
तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥3॥
पद 4429
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥1 ॥
ह्मणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥
लोभिक तें लोभा लावी। बांधल्या गोवी वांचूनि ॥2॥
तुका ह्मणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥3॥
पद 4430
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥1॥
नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥2॥
तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥3॥
पद 4431
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥1॥
सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥
आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥2॥
पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥3॥
करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥4॥
स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥5॥
पद 4432
अवघ्या कोल्हएांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥1॥
भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥
कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥2॥
दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥3॥
पद 4433
तुझे ह्मणों आह्मां । मग उणें पुरुषोत्तमा ॥1॥
ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥
कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥2॥
तुका ह्मणे परीस । सांपडल्या उपवास॥3॥
पद 4435
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥1॥
तेथें आह्मीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥
ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥2॥
तुका ह्मणे आह्मी किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥3॥
पद 4436
डोिळयांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥1॥
काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥
आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥2॥
तुका ह्मणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥3॥
पद 4439
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥1॥
नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥2॥
शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥3॥
तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥4॥
पद 4444
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥1॥
दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥
छाटी भगवी मानसीं ।व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥2॥
तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥3॥
पद 4445
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ 1 ॥
डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥
न वजिऩतां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥2॥
तुका ह्मणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥3॥
पद 4446
आपटा संवदड रानचारा । दसऱ्याचा होय तुरा॥1॥
तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥
मृित्तकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥2॥
तुका ह्मणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥3॥
पद 4447
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल॥1॥
नाम वाचे श्रवण कीिर्त्त । पाउलें चित्तीं समान ॥ध्रु.॥
कीर्त्तनाचा समारंभ । निदपभ सर्वदा ॥2॥
तुका ह्मणे स्वरूपसििद्ध । नित्य समाधि हरिनामीं ॥3॥
पद 4448
आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥1॥
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥
आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥2॥
येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥3॥
रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥4॥
पद 4449
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥1॥
ऐसें आह्मां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥
बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥2॥
तुका ह्मणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥3॥
पद 4450
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥1॥
तुझ्या नामबळें तरले पतित । ह्मणोनि माझें चित्त तुझे पायीं ॥2॥
तुका ह्मणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥3॥
पद 4452
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥1॥
तूं अखंड दुिश्चत्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥2॥
तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥3॥
पद 4454
बाइऩल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥1॥
सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥
जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥2॥
न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥3॥
फजित केलें जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं॥4॥
गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥5॥
तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥6॥
पद 4458
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निद।व ॥1॥
देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥
नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥2॥
साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे॥3॥
दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥4॥
तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥5॥
पद 4460
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येइऩल काळा फोडों डोइऩ ॥1॥
तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥
येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होइऩल तें दुरि शृंगारिलें ॥2॥
तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥3॥
पद 4461
होइप आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥1॥
आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तइप सकळ चिंता ॥ध्रु.॥
अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥2॥
तुका ह्मणे जालें एक चि वचन । केलिया कीर्त्तन आराणुक ॥3॥
पद 4463
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥1॥
काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥
काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥2॥
तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥3॥
पद 4464
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥1॥
दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥
जातीचें मी हीन न कळे भजन । ह्मणोनि संतचरण इच्छीतसें ॥2॥
तुका ह्मणे मज ह्मणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥3॥
पद 4465
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥1॥
शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥
शिवास नामाचा आधार । केला किळकाळ किंकर ॥2॥
मरण जालें काशीपुरी। तेथें नाम चि उद्धरी ॥3॥
तुका ह्मणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥4॥
पद 4468
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साहए होय ॥1॥
उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साहए करी ॥ध्रु.॥
शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साहए करी ॥2॥
असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥3॥
तुका ह्मणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥4॥
पद 4469
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥1॥
बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥
क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥2॥
सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥3॥
तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा॥4॥
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥5॥
ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥6॥
प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥7॥
सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥8॥
तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥9॥
पद 4471
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥1॥
माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥
माझें दुःख जरी ऐकशील सइऩ । ह्मातारा तो बाइऩ खोकतसे ॥2॥
खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥3॥
पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥4॥
जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥5॥
पूर्व सुकृताचा हा चि बाइऩ ठेवा । तुका ह्मणे देवा काय बोल ॥6॥
पद 4472
स्वामीच्या सामथ्यॉ । चाले बोलिला पुरुषार्थ ॥1॥
पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥
देव ज्यासी साहए । तेणें केलें सर्व होय ॥2॥
तुका ह्मणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥3॥
पद 4474
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आह्मां दिनानाथें रिक्षयेलें ॥1॥
यम नेतां तुह्मां रक्षील हें कोण । तुह्मां धन्यधन्य कोण ह्मणती ॥ध्रु.॥
संतसज्जनमेळा पवित्र संतकीतिऩ । त्यांनीं उत्तम िस्थति सांगितली ॥2॥
तें चि धरोनि चित्तीं तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥3॥
पद 4475
देवासी पैं भांडों एकचित्त करूनि । आह्मांसि सज्जनीं सांगितलें ॥1॥
आह्मां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥
तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आह्मां देशवटी देवो सुखें ॥2॥
देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥3॥
चित्तीं धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥4॥
तुका ह्मणे सर्व देवाची नष्टाइऩ । आह्मी सुखें डुलतसों ॥5॥
पद 4477
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥1॥
धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥
भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥2॥
तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥3॥
गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥4॥
तुका ह्मणे हातीं । न धरितां गमाविती ॥5॥
पद 4478
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥1॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥
दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥2॥
कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥3॥
तुका ह्मणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥4॥
पद 4479
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग॥1॥
हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥2॥
गोब्राह्मणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका ह्मणे ॥3॥
पद 4480
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभािळली भूमि शुद्ध ॥1॥
उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय ह्मुण ॥ध्रु.॥
खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥2॥
हातींचा हिरोनि घातला पोटासी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥3॥
ओंव्या प्रारंभ 231 अभंग 3
पद 4484
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥1॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥2॥
कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥3॥
आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥4॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥5॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥6॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥7॥
संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥8॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥9॥
करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥10॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥11॥
चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥12॥
पद 4485
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥1॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥2॥
सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥3॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥4॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥5॥
गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप॥6॥
आपेंआप बेडएा तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥7॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥8॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥9॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥10॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥11॥
पद 4487
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥1॥
खेळविला जिंहीं अंतर्बाहएसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥2॥
दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥3॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥4॥
ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥5॥
विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥6॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥7॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥8॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥9॥
पद 4489
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥1॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥2॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥3॥
माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥4॥
जैसा तैसा आहे अंतर्बाहएात्कारीं । ह्मणउनि चोरी नसंपडे ॥5॥
नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥6॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥7॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥8॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥9॥
भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥10॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका ह्मणें भावें चाड एका ॥11॥
पद 4491
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥1॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समपिऩलें ॥2॥
समथॉ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे॥3॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाइऩ चारी ॥4॥
गाइऩ चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥5॥
काय गौिळयांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाइऩ पशु ॥6॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥7॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥8॥
परी याचि तुह्मी आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥9॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥10॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥11॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥12॥
तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वर्म दावी सोपें ॥13॥
पद 4494
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौिळयांच्या ॥1॥
यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥2॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥3॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रूप ॥4॥
रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥5॥
लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥6॥
कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥7॥
पद 4495
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥1॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥2॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥3॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥4॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥5॥
बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥6॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥7॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौिळयांसी ॥8॥
सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥9॥
तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥10॥
दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥11॥
आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥12॥
मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥13॥
लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥14॥
भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥15॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥16॥
हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥17॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥18॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥19॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥20॥
नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥21॥
अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥22॥
पद 4496
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥1॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥2॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग॥3॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौिळयांची ॥4॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥5॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौिळयांचें ॥6॥
गौिळयांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥7॥
पद 4498
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥1॥
ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥2॥
वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥3॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥4॥
याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥5॥
लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥6॥
अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥7॥
नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥8॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥9॥
आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥10॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥11॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥12॥
बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥13॥
पद 4499
तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥1॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥2॥
याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥3॥
ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥4॥
विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥5॥
कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥6॥
विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥7॥
एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥8॥
खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥9॥
चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥10॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥11॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥12॥
त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥13॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥14॥
पद 4500
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥1॥
एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥2॥
जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥3॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥4॥
लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥5॥
लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥6॥
व्याही भाइऩ हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥7॥
एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥8॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाइऩ ॥9॥
लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥10॥
त्यांणीं मृित्तकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥11॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥12॥
विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥13॥
यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥14॥
खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥15॥
तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥16॥
तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥17॥
काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी॥18॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती॥19॥
धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती॥20॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥21॥
बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥22॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥23॥
वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥24॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती॥25॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥26॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥27॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला॥28॥
परिचय
संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग 4201 ते 4500. तुकारामांचे अभंग हे वारकरी संप्रदायाचा प्राण मानले जातात — विठ्ठलभक्ती, संतसंगती, नामस्मरण आणि परखड आत्मपरीक्षण हे त्यांचे विषय.
॥ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ॥
संदर्भ 1
- तुकाराम गाथा — mr.wikisource.org
मराठी विकिस्रोत आवृत्ती. या विभागातील 220 अभंग येथे दिले आहेत; 80 अभंगांचा मूळ पाठ विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध नसल्याने वगळला आहे.
परवाना: CC BY-SA 4.0 — Text adapted from Wikimedia projects, licensed CC BY-SA 4.0. Adaptations must be shared alike.
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.