तुकाराम गाथा — अभंग 4501–4583
आकार
मांडणी
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥1॥
देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥2॥
कळला हा देव तया साच खरा । गाइऩ वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥3॥
ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥4॥
जाणवेल देव गौिळयांच्या भावें । तुका ह्मणे सेवे संचित हें ॥5॥
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥1॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाइऩवरी आणिक गाइऩ ॥2॥
गाइऩ दवडुनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरि बांधा त्या ही ॥3॥
त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडएांतुनि ॥4॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥5॥
नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥6॥
मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥7॥
तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥1॥
करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥2॥
दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥3॥
नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥4॥
मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥5॥
तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥6॥
निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥7॥
तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥1॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥2॥
नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥3॥
द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥4॥
वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥5॥
द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥6॥
तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥7॥
राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥8॥
तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥9॥
गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥10॥
त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस। झोंबतां हातांस खाय बळें ॥11॥
बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥12॥
पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥13॥
मांदीं मेळवुनी धणी दिली आह्मां। तुका ह्मणे जमा केल्या गाइऩ ॥14॥
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥1॥
थाट चाले गाइऩ गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥2॥
सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥3॥
तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥4॥
सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका ह्मणे जुगें घडी जाय ॥5॥
जाय फाकोनियां निवडितां गाइऩ । आपलाल्या सोयी घराचिये ॥1॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे॥2॥
गोविंदे वेधिलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥3॥
नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥1॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥2॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुिद्ध॥3॥
बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्तीं ॥4॥
चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥5॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥6॥
चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकिळक देव देखे ॥7॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥8॥
काया वाचा मनें पूजावे वैष्णव । ह्मणउनि भाव धरूनियां ॥9॥
यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥10॥
गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥11॥
पसरूनि मुख गििळयेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥12॥
संधि सारूनियां पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलांसी ॥13॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गििळला वोणवा आणीक तो ॥14॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥15॥
सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥16॥
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥1॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥2॥
आजि आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥3॥
न वंचत्या गाइऩ जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥4॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥5॥
गोपाळांसि ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥6॥
करी तुका ह्मणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥7॥
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥1॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥2॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥3॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥4॥
चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥5॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥6॥
जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥7॥
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥1॥
मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥2॥
ओवािळलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥3॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥4॥
कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥5॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥6॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥7॥
हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥8॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥9॥
दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥10॥
काय आतां यासि ह्मणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥1॥
माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥2॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥3॥
करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥4॥
तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥5॥
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥1॥
खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥2॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥3॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥4॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥5॥
सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥6॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥7॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥8॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाइऩल तो पाहा धरा चेंडू ॥9॥
चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥10॥
चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥11॥
पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥12॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥13॥
नव्हे काम बळ बुिद्ध नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥14॥
विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥15॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥16॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥17॥
या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥18॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥19॥
हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥20॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥21॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥22॥
सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥23॥
नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥24॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥25॥
लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥26॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥27॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥28॥
साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभािळलें ॥29॥
सांभािळलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें॥30॥
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥1॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥2॥
जळांत पाहातां हाडति या दृिष्ट । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥3॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥4॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥5॥
कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥6॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥7॥
जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥8॥
त्यासि नारायण ह्मणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥9॥
वरि जातां वरि पाहाती गोपाळ । ह्मणति सकळ आह्मी नेणों ॥10॥
नेणों ह्मणती हें करितोसि काइऩ। आह्मां तुझी आइऩ देइल सिव्या ॥11॥
आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टािळयेलें ॥12॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥13॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥14॥
तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥15॥
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥1॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥2॥
सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥3॥
बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बऱ्या बरें ॥4॥
बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥5॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥6॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥7॥
पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥8॥
न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥9॥
मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥10॥
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥1॥
जालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥2॥
देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥3॥
आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । ह्मणउनि ऐशी परि जाली ॥4॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि। शाहाणे तयांसि कळों आले ॥5॥
कळों आलें तीहीं काुंफ्द शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥6॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥7॥
सांगे आतां हरि तुह्मां आह्मां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥8॥
यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥9॥
परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका ह्मणे माता लोकपाळ॥10॥
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥1॥
काय ऐसें पाप होतें आह्मांपासीं । बोलती एकासी एक एका ॥2॥
एकांचिये डोळां असुं बाहएात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥3॥
जळतील एकें अंतर्बाहएात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥4॥
निवांत चि एकें राहिलीं नििंश्चत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥5॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥6॥
वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥7॥
सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥8॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥9॥
सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनि जाती ॥10॥
तिरीं माना घालूनियां उभ्या गाइऩ । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥11॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली। दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥12॥
यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥13॥
मायबाप तुका ह्मणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥14॥
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥1॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥2॥
मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥3॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥4॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥5॥
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥1॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥2॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥3॥
अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥4॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥5॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥6॥
मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥7॥
आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥1॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥2॥
आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥3॥
दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥4॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥5॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥6॥
चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका ह्मणे देवा कारण हें ॥7॥
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥1॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥2॥
उघवला खांब कदऩळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥3॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥4॥
विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥5॥
दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥6॥
पाहिलें पताौनि काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें जालें आतां ॥7॥
आतां हा उठोनि खाइऩल या बाळा । देइऩल वेल्हाळा माय जीव ॥8॥
जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥9॥
रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका ह्मणे ॥10॥
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेिष्टयेला ॥1॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥2॥
निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥3॥
एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥4॥
यथेष्ट भिक्षलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥5॥
आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥6॥
यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥7॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥8॥
विसरु न पडे संवगडएा गाइऩ । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥9॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥10॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥11॥
अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥1॥
आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि॥2॥
गडियांसि ह्मणे वैकुंठनायक । या रे सकिळक मजपाशीं ॥3॥
मजपाशीं तुह्मां भय काय करी । जविळ या दुरी जाऊं नका ॥4॥
कानीं आइकिले गोविंदाचे बोल । ह्मणती नवल चला पाहों ॥5॥
पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आिंळगिले ॥6॥
आल्या गाइऩ वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥7॥
लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥8॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥9॥
त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥10॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥11॥
दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश। तुका ह्मणे आस निरसली ॥12॥
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥1॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥
हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥3॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥4॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥5॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥6॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥7॥
जननी हे ह्मणे आहा काय जालें । शरीर रिक्षलें काय काजें ॥1॥
काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥2॥
हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥3॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥4॥
करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका ह्मणे ॥5॥
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥1॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥2॥
हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥3॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥4॥
थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥5॥
आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥6॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥7॥
नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥8॥
तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥9॥
सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥10॥
हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥11॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥12॥
मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका ह्मणे ॥13॥
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥1॥
बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥2॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥3॥
सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥4॥
लोक गेले कामा गाइऩपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥5॥
लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥6॥
आशेचे बांधले तुका ह्मणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥7॥
जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥1॥
येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥2॥
इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥3॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । ह्मणती गोपाळा बरें नव्हे ॥4॥
नव्हे तें चि करी न भे किळकाळा । तुका ह्मणे लीळा खेळे देव ॥5॥
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव ह्मणे तयां भेऊं नका ॥1॥
नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौिळयांसि ॥2॥
गौिळयांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥3॥
वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥4॥
नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका ह्मणे वरि भारवाही ॥5॥
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥1॥
अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥2॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुिद्ध िस्थर ॥3॥
बुिद्ध िस्थर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥4॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका ह्मणे तेणें दुःखी होती ॥5॥
दुःखी होती लोभें करावें तें काइऩ । उडतील गाइऩ म्हैसी आतां ॥1॥
आणीकही कांहीं होइऩल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितलें ॥2॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥3॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥4॥
क्रोध देवावरि धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥5॥
भाग त्या सुखाचे वांकडएां बोबडएां । आपलिया गडएां भाविकांसि ॥1॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥2॥
काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥3॥
खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥4॥
कवणाचें चाले तुका ह्मणे बळ । जयासी गोपाळ साहए जाला ॥5॥
तो या साच भावें न कळे चि इंद्रा । ह्मणउनि धारा घाली सिळा ॥1॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥2॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥3॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥4॥
लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥5॥
आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥6॥
यांचिया विचारें होणार ते काइऩ । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥7॥
वेडावलीं काय करावें या काळीं । ह्मणे वनमाळी गोपाळांसि ॥1॥
शिरी धरूं गोवद्धऩन उचलूनि । ह्मणे तुह्मी कोणी भिऊं नका ॥2॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोिळया ॥3॥
अशंकित चित्तें न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें ह्मणती चला ॥4॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥5॥
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥1॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥2॥
पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥3॥
आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥4॥
निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥5॥
दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥6॥
सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥7॥
कृपावंतें हाक दिली सकिळकां । माजिया रे नका राहों कोणी ॥1॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवद्धऩन उचलिला ॥2॥
लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काुंफ्दे रडे कोणी धाकें ॥3॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥4॥
तयाखालीं गाइऩ वत्सें आलीं लोक । पक्षी सकिळक जीवजाति ॥5॥
जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥6॥
जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका ह्मणे ॥7॥
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । किळकाळासि वास पाहों नेदी ।1॥
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥2॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळांचिये ॥3॥
शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥4॥
एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आह्मी ऐसे ॥5॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मीं आतां हात सोडा ॥6॥
हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥7॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥8॥
भार आह्मांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥9॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥10॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥11॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥12॥
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं॥1॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥2॥
भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥3॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥4॥
एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥5॥
आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥6॥
तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवद्धऩना राखियेलें ॥7॥
राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥8॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥9॥
सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥10॥
त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥11॥
लोकां कळों आला देव आह्मांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥1॥
शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥2॥
मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥3॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त जालें त्यांचें ॥4॥
त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥6॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥6॥
चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥7॥
समाधान त्यांचीं इंिद्रयें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥1॥
गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥2॥
काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥3॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥4॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥5॥
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥1॥
कळलें चि ऩाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥2॥
विसरु कामाचा तुका ह्मणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥3॥
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥1॥
सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥2॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥3॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाइऩ वत्स पशु जीवां ॥4॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥5॥
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥1॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥2॥
कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥3॥
भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥4॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥5॥
वत्सें गाइऩ पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥6॥
चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥7॥
तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥8॥
गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥9॥
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥1॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥2॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥3॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥4॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥5॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥6॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका ह्मणे ॥7॥
नाचतां देखिलीं गाइऩ वत्सें जन । वििस्मत होऊन इंद्र ठेला ॥1॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥2॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निविऩघ्न तें ॥3॥
विचारितां उचलिला गोवद्धऩन । अवतार पूर्ण कळों आला ॥4॥
आला गौिळयांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥5॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रह्मयासि ॥6॥
सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥7॥
समागमें गाइऩ वत्स पुण्यवंता । देह कुर्वािळतां अंगसंग ॥8॥
संग जाला मायबापां लोकपाळां । आिंळगिती गळा कंठाकंठ ॥9॥
करिते हे जाले स्तुती सकिळक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥10॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला॥11॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥12॥
नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥13॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥14॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥15॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचे ॥16॥
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥1॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥2॥
वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या॥3॥
सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा ह्मणे घरा ॥4॥
राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥5॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥6॥
त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥7॥
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥1॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकिळकां ॥2॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥3॥
सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥4॥
त्यां जाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥5॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकिळक नारायणें ॥6॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नांवा अनुसरे त्या ॥7॥
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे॥1॥
हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥2॥
आहे तुका ह्मणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार॥3॥
द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक॥1॥
देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥2॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥3॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥1॥
सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥2॥
जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले॥3॥
झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥4॥
बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥5॥
रूप पालटलें गुण नाम याति । तुका ह्मणे भूतीं देव जाला ॥6॥
जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृित्त उरली आहे ॥1॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥2॥
तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥3॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥4॥
भेदें तुका ह्मणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥5॥
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥1॥
भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥2॥
जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥3॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥4॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥5॥
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥1॥
दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥2॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥3॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥4॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका ह्मणे ॥5॥
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥1॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥2॥
वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥3॥
नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥4॥
कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥5॥
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥1॥
ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥2॥
लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥3॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥4॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥5॥
काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥6॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥7॥
चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥1॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥2॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥3॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥4॥
चुकवुनि जन्म देइऩल आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥5॥
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥1॥
दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥2॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥3॥
भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकिळक मथुरेचे ॥4॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥5॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥6॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका ह्मणे ॥7॥
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥1॥
ॠिद्धसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपित्त सर्वां घरीं ॥2॥
घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्त्तन नरनारी ॥3॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥4॥
गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥5॥
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥1॥
वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥2॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका ह्मणे ऐसी िब्रदावळी॥3॥
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥1॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥2॥
कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥3॥
जातों येतों आह्मी देवाचे सांगांतें । तुका ह्मणे गात देवनाम ॥4॥
पद 4503

पद 4504

पद 4505

पद 4506

पद 4507
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥1॥
थाट चाले गाइऩ गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥2॥
सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥3॥
तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥4॥
सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका ह्मणे जुगें घडी जाय ॥5॥
पद 4508
जाय फाकोनियां निवडितां गाइऩ । आपलाल्या सोयी घराचिये ॥1॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे॥2॥
गोविंदे वेधिलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥3॥
पद 4511
नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥1॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥2॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुिद्ध॥3॥
बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्तीं ॥4॥
चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥5॥
तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥6॥
चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकिळक देव देखे ॥7॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥8॥
काया वाचा मनें पूजावे वैष्णव । ह्मणउनि भाव धरूनियां ॥9॥
यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥10॥
गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥11॥
पसरूनि मुख गििळयेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥12॥
संधि सारूनियां पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलांसी ॥13॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गििळला वोणवा आणीक तो ॥14॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥15॥
सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥16॥
पद 4512
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥1॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥2॥
आजि आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥3॥
न वंचत्या गाइऩ जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥4॥
पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥5॥
गोपाळांसि ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥6॥
करी तुका ह्मणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥7॥
पद 4514
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥1॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥2॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥3॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥4॥
चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥5॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥6॥
जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥7॥
पद 4515
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥1॥
मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥2॥
ओवािळलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥3॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥4॥
कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥5॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥6॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥7॥
हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥8॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥9॥
दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥10॥
पद 4516
काय आतां यासि ह्मणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥1॥
माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥2॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥3॥
करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥4॥
तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥5॥
पद 4517
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥1॥
खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥2॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥3॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥4॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥5॥
सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥6॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥7॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥8॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाइऩल तो पाहा धरा चेंडू ॥9॥
चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥10॥
चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥11॥
पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥12॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥13॥
नव्हे काम बळ बुिद्ध नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥14॥
विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥15॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥16॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥17॥
या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥18॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥19॥
हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥20॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥21॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥22॥
सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥23॥
नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥24॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥25॥
लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥26॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥27॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥28॥
साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभािळलें ॥29॥
सांभािळलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें॥30॥
पद 4518
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥1॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥2॥
जळांत पाहातां हाडति या दृिष्ट । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥3॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥4॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥5॥
कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥6॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥7॥
जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥8॥
त्यासि नारायण ह्मणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥9॥
वरि जातां वरि पाहाती गोपाळ । ह्मणति सकळ आह्मी नेणों ॥10॥
नेणों ह्मणती हें करितोसि काइऩ। आह्मां तुझी आइऩ देइल सिव्या ॥11॥
आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टािळयेलें ॥12॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥13॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥14॥
तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥15॥
पद 4519
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥1॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥2॥
सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥3॥
बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बऱ्या बरें ॥4॥
बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥5॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥6॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥7॥
पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥8॥
न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥9॥
मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥10॥
पद 4520
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥1॥
जालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥2॥
देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥3॥
आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । ह्मणउनि ऐशी परि जाली ॥4॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि। शाहाणे तयांसि कळों आले ॥5॥
कळों आलें तीहीं काुंफ्द शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥6॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥7॥
सांगे आतां हरि तुह्मां आह्मां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥8॥
यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥9॥
परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका ह्मणे माता लोकपाळ॥10॥
पद 4521
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥1॥
काय ऐसें पाप होतें आह्मांपासीं । बोलती एकासी एक एका ॥2॥
एकांचिये डोळां असुं बाहएात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥3॥
जळतील एकें अंतर्बाहएात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥4॥
निवांत चि एकें राहिलीं नििंश्चत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥5॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥6॥
वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥7॥
सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥8॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥9॥
सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनि जाती ॥10॥
तिरीं माना घालूनियां उभ्या गाइऩ । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥11॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली। दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥12॥
यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥13॥
मायबाप तुका ह्मणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥14॥
पद 4522
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥1॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥2॥
मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥3॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥4॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥5॥
पद 4523
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥1॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥2॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥3॥
अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥4॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥5॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥6॥
मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥7॥
पद 4524
आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥1॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥2॥
आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥3॥
दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥4॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥5॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥6॥
चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका ह्मणे देवा कारण हें ॥7॥
पद 4525
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥1॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥2॥
उघवला खांब कदऩळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥3॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥4॥
विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥5॥
दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥6॥
पाहिलें पताौनि काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें जालें आतां ॥7॥
आतां हा उठोनि खाइऩल या बाळा । देइऩल वेल्हाळा माय जीव ॥8॥
जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥9॥
रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका ह्मणे ॥10॥
पद 4527
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेिष्टयेला ॥1॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥2॥
निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥3॥
एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥4॥
यथेष्ट भिक्षलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥5॥
आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥6॥
यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥7॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥8॥
विसरु न पडे संवगडएा गाइऩ । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥9॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥10॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥11॥
पद 4528
अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥1॥
आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि॥2॥
गडियांसि ह्मणे वैकुंठनायक । या रे सकिळक मजपाशीं ॥3॥
मजपाशीं तुह्मां भय काय करी । जविळ या दुरी जाऊं नका ॥4॥
कानीं आइकिले गोविंदाचे बोल । ह्मणती नवल चला पाहों ॥5॥
पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आिंळगिले ॥6॥
आल्या गाइऩ वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥7॥
लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥8॥
कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥9॥
त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥10॥
याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥11॥
दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश। तुका ह्मणे आस निरसली ॥12॥
पद 4529
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥1॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥
हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥3॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥4॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥5॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥6॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥7॥
पद 4530
जननी हे ह्मणे आहा काय जालें । शरीर रिक्षलें काय काजें ॥1॥
काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥2॥
हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥3॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥4॥
करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका ह्मणे ॥5॥
पद 4531
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥1॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥2॥
हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥3॥
गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥4॥
थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥5॥
आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥6॥
नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥7॥
नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥8॥
तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥9॥
सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥10॥
हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥11॥
सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥12॥
मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका ह्मणे ॥13॥
पद 4533
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥1॥
बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥2॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥3॥
सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥4॥
लोक गेले कामा गाइऩपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥5॥
लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥6॥
आशेचे बांधले तुका ह्मणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥7॥
पद 4534
जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥1॥
येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥2॥
इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥3॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । ह्मणती गोपाळा बरें नव्हे ॥4॥
नव्हे तें चि करी न भे किळकाळा । तुका ह्मणे लीळा खेळे देव ॥5॥
पद 4535
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव ह्मणे तयां भेऊं नका ॥1॥
नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौिळयांसि ॥2॥
गौिळयांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥3॥
वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥4॥
नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका ह्मणे वरि भारवाही ॥5॥
पद 4536
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥1॥
अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥2॥
मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुिद्ध िस्थर ॥3॥
बुिद्ध िस्थर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥4॥
लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका ह्मणे तेणें दुःखी होती ॥5॥
पद 4537
दुःखी होती लोभें करावें तें काइऩ । उडतील गाइऩ म्हैसी आतां ॥1॥
आणीकही कांहीं होइऩल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितलें ॥2॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥3॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥4॥
क्रोध देवावरि धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥5॥
पद 4538
भाग त्या सुखाचे वांकडएां बोबडएां । आपलिया गडएां भाविकांसि ॥1॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥2॥
काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥3॥
खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥4॥
कवणाचें चाले तुका ह्मणे बळ । जयासी गोपाळ साहए जाला ॥5॥
पद 4541
तो या साच भावें न कळे चि इंद्रा । ह्मणउनि धारा घाली सिळा ॥1॥
घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥2॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥3॥
विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥4॥
लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥5॥
आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥6॥
यांचिया विचारें होणार ते काइऩ । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥7॥
पद 4542
वेडावलीं काय करावें या काळीं । ह्मणे वनमाळी गोपाळांसि ॥1॥
शिरी धरूं गोवद्धऩन उचलूनि । ह्मणे तुह्मी कोणी भिऊं नका ॥2॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोिळया ॥3॥
अशंकित चित्तें न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें ह्मणती चला ॥4॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥5॥
पद 4543
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥1॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥2॥
पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥3॥
आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥4॥
निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥5॥
दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥6॥
सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥7॥
पद 4544
कृपावंतें हाक दिली सकिळकां । माजिया रे नका राहों कोणी ॥1॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवद्धऩन उचलिला ॥2॥
लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काुंफ्दे रडे कोणी धाकें ॥3॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥4॥
तयाखालीं गाइऩ वत्सें आलीं लोक । पक्षी सकिळक जीवजाति ॥5॥
जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥6॥
जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका ह्मणे ॥7॥
पद 4545
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । किळकाळासि वास पाहों नेदी ।1॥
पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥2॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळांचिये ॥3॥
शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥4॥
एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आह्मी ऐसे ॥5॥
ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मीं आतां हात सोडा ॥6॥
हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥7॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥8॥
भार आह्मांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥9॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥10॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥11॥
यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥12॥
पद 4547
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं॥1॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥2॥
भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥3॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥4॥
एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥5॥
आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥6॥
तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवद्धऩना राखियेलें ॥7॥
राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥8॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥9॥
सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥10॥
त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥11॥
पद 4548
लोकां कळों आला देव आह्मांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥1॥
शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥2॥
मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥3॥
कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त जालें त्यांचें ॥4॥
त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥6॥
सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥6॥
चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥7॥
पद 4549
समाधान त्यांचीं इंिद्रयें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥1॥
गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥2॥
काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥3॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥4॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥5॥
पद 4550
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥1॥
कळलें चि ऩाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥2॥
विसरु कामाचा तुका ह्मणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥3॥
पद 4552
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥1॥
सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥2॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥3॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाइऩ वत्स पशु जीवां ॥4॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥5॥
पद 4554
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥1॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥2॥
कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥3॥
भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥4॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥5॥
वत्सें गाइऩ पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥6॥
चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥7॥
तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥8॥
गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥9॥
पद 4555
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥1॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥2॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥3॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥4॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥5॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥6॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका ह्मणे ॥7॥
पद 4556
नाचतां देखिलीं गाइऩ वत्सें जन । वििस्मत होऊन इंद्र ठेला ॥1॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥2॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निविऩघ्न तें ॥3॥
विचारितां उचलिला गोवद्धऩन । अवतार पूर्ण कळों आला ॥4॥
आला गौिळयांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥5॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रह्मयासि ॥6॥
सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥7॥
समागमें गाइऩ वत्स पुण्यवंता । देह कुर्वािळतां अंगसंग ॥8॥
संग जाला मायबापां लोकपाळां । आिंळगिती गळा कंठाकंठ ॥9॥
करिते हे जाले स्तुती सकिळक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥10॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला॥11॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥12॥
नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥13॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥14॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥15॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचे ॥16॥
पद 4557
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥1॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥2॥
वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या॥3॥
सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा ह्मणे घरा ॥4॥
राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥5॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥6॥
त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥7॥
पद 4558
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥1॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकिळकां ॥2॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥3॥
सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥4॥
त्यां जाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥5॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकिळक नारायणें ॥6॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नांवा अनुसरे त्या ॥7॥
पद 4559
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे॥1॥
हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥2॥
आहे तुका ह्मणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार॥3॥
पद 4562
द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक॥1॥
देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥2॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥3॥
पद 4563
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥1॥
सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥2॥
जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले॥3॥
झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥4॥
बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥5॥
रूप पालटलें गुण नाम याति । तुका ह्मणे भूतीं देव जाला ॥6॥
पद 4564
जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृित्त उरली आहे ॥1॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥2॥
तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥3॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥4॥
भेदें तुका ह्मणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥5॥
पद 4565
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥1॥
भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥2॥
जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥3॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥4॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥5॥
पद 4567
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥1॥
दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥2॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥3॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥4॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका ह्मणे ॥5॥
पद 4570
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥1॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥2॥
वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥3॥
नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥4॥
कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥5॥
पद 4571
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥1॥
ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥2॥
लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥3॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥4॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥5॥
काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥6॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥7॥
पद 4572
चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥1॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥2॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥3॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥4॥
चुकवुनि जन्म देइऩल आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥5॥
पद 4573
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥1॥
दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥2॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥3॥
भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकिळक मथुरेचे ॥4॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥5॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥6॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका ह्मणे ॥7॥
पद 4575
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥1॥
ॠिद्धसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपित्त सर्वां घरीं ॥2॥
घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्त्तन नरनारी ॥3॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥4॥
गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥5॥
पद 4578
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥1॥
वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥2॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका ह्मणे ऐसी िब्रदावळी॥3॥
पद 4581
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥1॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥2॥
कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥3॥
जातों येतों आह्मी देवाचे सांगांतें । तुका ह्मणे गात देवनाम ॥4॥
परिचय
संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग 4501 ते 4583. तुकारामांचे अभंग हे वारकरी संप्रदायाचा प्राण मानले जातात — विठ्ठलभक्ती, संतसंगती, नामस्मरण आणि परखड आत्मपरीक्षण हे त्यांचे विषय.
॥ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ॥
संदर्भ 1
- तुकाराम गाथा — mr.wikisource.org
मराठी विकिस्रोत आवृत्ती. या विभागातील 59 अभंग येथे दिले आहेत; 24 अभंगांचा मूळ पाठ विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध नसल्याने वगळला आहे.
परवाना: CC BY-SA 4.0 — Text adapted from Wikimedia projects, licensed CC BY-SA 4.0. Adaptations must be shared alike.
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.