आत्माराम
आकार
मांडणी
जयास लटिका आळ आला । जो माया गौरीपासूनि जाला.
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैंचें ? ॥1॥
तेथें स्तवनाचा विचार । न घडे निर्विकारी विकार ।
परी तयास नमस्कार । भावबळें माझा ॥2॥
जयाचेनि वेद शास्त्रें पुराणें । जयाचेनि नाना निरूपणें ।
जयाचेनि स्वसुखा लाधणें । शब्दी निःशब्द ॥3॥
जें शब्दांस आकळेना । जें शब्दविण सहसा कळेना ।
कळलें ऐसेहि घडेना । जिये स्वरूपी ॥4॥
ऐसें सदा सर्वत्र संचलें । जें तर्का न वचे अनुमानलें ।
तें जयेचेनि प्राप्त झालें । आपरूप आपणासी ॥5॥
नमन तिचीया निजपदां । माया वाग्देवी शारदा ।
जयेचेनि प्रवर्तती संवादा । संत माहानुभाव ॥6॥
आता वंदीन सद्गुरुस्वामी । जेथें राहिले तोचि मी ।
आणि निवारिली निजधामीं । पांचही जेणें ॥7॥
तया निजपदाकडे । आनंदें वृत्ति वावडे ।
पद लाधलिया जडे । तद्रूप होऊनि ॥8॥
स्वामी कृपेचा लोट आला । मज सरोवरीं सामावला ।
पूर्ण जालिया उचंबळला । अनुभव उद्गार ॥9॥
माझें सद्गुरूकृपेचें बळ । मनामाजीं सांठवले तुंबळ ।
तेणें बळें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥10॥
आता नमस्कारीन राम । जो योगियांचें निजधाम ।
विश्रांति पावे विश्राम । जये ठायीं ॥11॥
जो नांवरूपा वेगळा । जो ये मायेहून निराळा ।
जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥12॥
जेथें भांबावला तर्क । जेथें पांगुळला विवेक ।
तेथें शब्दांचें कौतुक । केवीं घडे ॥13॥
जयालागी योगी उदास । वनवासी फिरती तापस ।
नाना साधनी सायास । जयाकारणें करिती ॥14॥
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ।
उपमाच नाही निरुपम । रूप जयाचें ॥15॥
आत वंदीन संत सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ।
माझीं वचनें प्राकृतें । सांगेन तयासीं ॥16॥
तयाचें वर्णावे स्वरूप । तरी तें स्वरूपाचेंचि बाप ।
जें वेदांसि सांगवेना रूप । तें जयांचेनि प्रगटे ॥17॥
आता शिष्या सावधान । ऐक सांगतो गुह्यज्ञान ।
जेणें तुझें समाधान । आंगीं बाणे ॥18॥
तुवां आशंका नाही घेतली । परंतु मज तुझी चिंता लागली.
कां जे तुझी भ्रांति फिटली । नाहींच अद्यापि ॥19॥
दासबोधींचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ।
तया निरूपणेंही वृत्तीसी । पालट दिसेना ॥20॥
म्हणोनी न पुसतां सांगणें । पडलें शिष्या तुजकारणें ।
आतां तरी सोय धरणें । श्रवण मननाची ॥21॥
चातकपक्षी वरीचा वरी । चंचु पसरून थेंबुटा धरी ।
जीवन सकळहि अव्हेरी । भूमंडळींचें ॥22॥
तैसा शब्दवरुषाव होता । असों नेदावी वेग्रता ।
श्रवणपुरी सामावितां । मनन करावें ॥23॥
लागवेग जाणोन शब्दाचा । आवांका पहावा मनाचा ।
शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥24॥
अरे तूं कोण? कोणाचा? । कोठोनि आलासि कैंचा ? ।
ऐसा विचार पूर्वीचा । घेई बापा ॥25॥
अरे त्वां जन्मांतर घेतलें । काय मानितोसी आपुलें ।
ऐसें तुवा विचारिले । पाहिजे आतां ॥26॥
येथे तुझें कांहींच नाही । भुलला आहेसी काई ।
चुकोनि आलास्, जाई । जेथीचा तेथें ॥27॥
तूं समर्थाचें लेकरूं । अभिमाने घेतला संसारू ।
अभिमान टाकितां पैलपारू । पावशील बापा ॥28॥
ईश्वरापासून जालासी । परी तूं तयासी चुकलासी ।
म्हणोनि हें दुःख भोगिसि. वेगळेपणें उत्कट ॥29॥
त्यागिसी सकळ वैभवाला । आणि विश्वाससी मझिया बोला.
तरि मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥30॥
तुझें अढळपद गेलें । तुज मायेनें वेढा लाविलें ।
तें जरी तुझें तुज दिधलें । तरी मज काय देशी ॥31॥
जितुकें कांहीं नासोन जाईल । जें अशाश्वत असेल ।
तुज समागमे न येईल । तितुकेंच द्यावे मज ॥32॥
मजही तें काय करावें । परी तुजपसून टाकवावें ।
तुवां टाकिलें तरि न्यावें । तुज समागमे ॥33॥
अरे भूष्ण भिक्षेचे सांडिले । आणि राजपद प्राप्त जालें ।
तरि तुझें काय गेलें । सांग बापा ॥34॥
नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेंसी ।
त्यामद्ध्यें लालुच करिसी । तरी स्वहित न घडे ॥35॥
तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ।
आतां तूं आपुलें । कांहीं मानू नको ॥36॥
इतुकें स्वमी बोलिले । आज्ञा घेऊन निघाले ।
तंव शिष्यें विनविलें । विनीत होऊनी ॥37॥
आतां पुढिलिये समासी । संवाद होईल उभयतांसी ।
तेणें स्वानंदसिंधुसि । भरितें दाटे बळें ॥38॥
इति श्री आत्माराम । रामदासी पूर्ण काम ।
ऐका सावध, वर्म । सांगितले पुढें ॥39॥
जय जय जी सच्चिदानंदा । जय जय जी आनंदकंदा ।
जय जय जी निजबोधा । परमपुरुष ॥1॥
अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळें । मायेने रचिली विशाळें ।
तें तुमचे कृपेचेनि बळें । विरतीं स्वानंद डोहीं ॥2॥
आता स्वामीने जें कांहीं इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारलें ।
शरणागत आपुलें । समर्थें उपेक्षूं नये ॥3॥
नाशिवंत काये म्यां टाकावें । तें मज स्वामीनें सांगावें ।
मज दातारें करावें । आपणा ऐसें ॥4॥
ऐकोन शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें ।
अवधान देऊन घेणें । आनंदपद ॥5॥
शिष्या बहू मन घाली । आता बाष्कळता राहिली ।
येथें वृत्ती चंचल केली । तरी बुडसी संदेहसागरी ॥6॥
अग्निसंगे लोहों पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ।
मग परिसेसि झगडतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥7॥
तयाचा मळ झडेना । आणि अभ्यांतर कळेना ।
तरी तें सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥8॥
म्हणउन नाशिवंत तितुका मळ । तुवां त्यजावा अमंगळ ।
तो गेलिया तूच केवळ । आहेस बापा ॥9॥
तरी नासिवंत तूं जाण माया । मायीक जाये विलया ।
ते मायेचा विस्तार प्राणसखया । ऐक सांगतो ॥10॥
अहं ऐसें जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।
तये मायेपासून त्रिगुण । गुणापासून भूतें ॥11॥
पृथ्वी, आप, तेज, वायो, आकाश । सृष्टी रचिली सावकाश ।
येथें दृश्य आणि अदॄश्य । सकळ माया ॥12॥
येक माया दों ठायी वाटली । प्रकृति आणि पुरुष झाली ।
जैसी दो दिसांची बोली । येकचि परवा ॥13॥
माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान । माया ध्याता ध्येय ध्यान ।
माया हेंचि समाधान । योगियांचें ॥14॥
माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ।
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥15॥
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥16॥
जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचाचि विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥17॥
माया मनास चाळक । माया बुधीस व्यापक ।
माया येकीं अनेक । ऐसें बोलणें ॥18॥
माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ।
माया दॄश्यास दाखवी । नेत्रीं रिघोनिया ॥19॥
मायेनें माया चाले । मायेनेंचि माया बोले ।
मायेनें माया हाले । वायोंरूपें ॥20॥
तो शिष्य म्हणे जी ताता । माया चाले स्वरूपसत्ता ।
अरे! सत्ता तेचि तत्त्वता । माया जाण ॥21॥
तरी मायेने स्वइच्छया असावें । आणि स्वरूपसत्तेनें नसावें ।
मनास आलें तैसें करावें । हें केवी घडे ? ॥22॥
खर्यावरी लटिकें चौताळलें । लटिकें मया.र्देनें राहिलें ,
तें तुंवां गर्भांधें देखिलें । हे अघटित वार्ता ॥23॥
तैसी माया हे नाथिली । अणि स्वरूपसत्तेने चालिली ।
ते तुंवां गर्भाधानें देखिली । हे वार्ता सांगसी ॥24॥
जें जालेंचि नाही सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ।
ऐसें हें ज्ञातेपणें बोलता । तुज लाज नाहीं ॥25॥
सकळ माया ऐसेंही म्हणतां । आणि जालीच नाही ऐसेंही सांगतां ।
तरी मी काय करावें आतां । सांगा स्वामी ॥26॥
अरे ! मनासी जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ।
तितुकें तुवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥27॥
सकळ हि माया परी नाथिली । स्वरूपीं तों नाही राहिली ।
येवं आहे नाही हे बोली । माया जाण ॥28॥
येवं सांगतों ते ऐकावें । मईक मायेतें जाणावें ।
आता मनन करावें । सावध होऊनी ॥29॥
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माय नासे ।
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरूपाचा ॥30॥
माया भवसिंधूचें तारू । माया पाववी पैलतारू ।
मायेवीण उद्धारू । प्राणीयास नाही ॥31॥
मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।
मायेकरितां जीवन्मुक्त । होती स्वानुभवें ॥32॥
मायेकरितां वेदश्रुति । मायेकरितां नाना वित्पत्ति ।
मायेकरितां होती । मूढ ते विवेकी ॥33॥
माया परमार्थाचें अंजन । मायेकरितां जोडे निधान ।
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥34॥
मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ।
मायेकरितां बिघडे । प्रपंचभान ॥35॥
मायेविण ज्ञान कैंचें । माया जीवन सकळ जीवांचें ।
मायेविण साधकांचें । कार्य न चले ॥36॥
मायेविण परमार्थ जोडे । हें ऐसें कईच न घडें ।
मायेविण सहसा नातुडे । गुज योगियांचें ॥37॥
माया योगियांची माउली । जेथील तेथें नेऊनि घाली ।
कृपाळूपणें नाथिलि । आपण होय ॥38॥
सकळ मायेचें स्वरूप जालें । त्यात तुझेंही स्वरूप आले ।
हें इतुकेंही आपुलें । नको मानुं सर्वथा ॥39॥
आतां सांगतों तुज खुण । तुवां नाशिवंत केलें मदर्पण ।
आतां करिसी आळकेपण । तरी मज शब्द नाही ॥40॥
संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ।
म्हणोनि संगनिःसंगातीत । होऊन राहे ॥41॥
आतां पुढील निरूपण । आदरें करावें श्रवण ।
संगातीत होइजेल ते खूण । सांगिजेल पुढे ॥42॥
इति श्री आत्माराम । रामदासीं विश्रामधाम ।
योगी पावती विश्राम । जये ठायी ॥43॥
संग तितुका नाशिवंत । सांडून राहावें निवांत ।
येकपणाचाहि अंत । जालिया समाधान ॥1॥
येकपणाचा उमस । काढिता, त्रिपुरी सावकाश ।
होत आहे, म्हणोनी ध्यास । येकपणाचा नसो ॥2॥
तो मी आत्मा ऐसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं ।
उन्मनी अवस्थेचा प्रांतु । तें स्वरूप तुझें ॥3॥
ऐसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामधे आला ।
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥4॥
हेंही न घडे बोलणें । आता पार्हेरा किती देणें ।
वेद शास्त्रें पुराणें । तेंही नासोनि जाती ॥5॥
ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ।
ये मायेयेचा स्पर्श् जाला । नाहीच तयासी ॥6॥
स्वरूप निर्मळ अणि निघोट । स्वरूप सेवटचा सेवट ।
जिकडे पाहावें तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥7॥
जें बहु दुरीचा दुरी । जें निकटचि जवळीं अंतरीं ।
दुरी आणि अभ्यांतरी । संदेहचि नाही ॥8॥
जें सकळांपरीस मोठें .जेत्जें हें सकळही आटे ।
अकस्मात येकसरें तुटे । मूळ मायेचें ॥9॥
जें सकळांहूनमृद कोंवळें । जें सकळांहूनही अत्यंत जवळें ।
जें सकळामध्ये, प्री निराळें । अलिप्तपणें ॥10॥
जें हाले ना चाले । जें बोले ना दोलें ।
आवघें आपणचि संचलें । येकलें येकटचि तें ॥11॥
जें आकाशासबाह्य भरलें । आणि आकाश जेथें मुरालें ।
आकाश मुरोनिया उरलें । येकजिनसि आपण ॥12॥
जें चळे ना ढळे । ज्जे अग्निमध्यें न जळे ।
जें चळत्यामधें, परी न कळे । उदकीं बुडेना ॥13॥
जयास कोणीच नेईना । चोरूं जातां चोरवेना ।
कल्पांत झाला तरि वेंचेना । अणुमात्र ॥14॥
ज्जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये । जेथें आकार भस्मोनी जाये.
सांगितलें तें साकार होये । म्हणोनि सांगणें न घडे ॥15॥
ऐसें जरी न बोलावें । तरी म्यां काये करावें ।
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥16॥
अरे बोलणें तितुकें वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येतें ।
अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजें ॥17॥
मायारूप मूळ तयाचें । शोधीन म्हणतां समाधान कैंचें ।
'मज लाभ झाला' या सुखाचें । मूळ तुटे ॥18॥
'अहं ब्रह्मास्मि' हा गाथा । आला देहबुद्धीचिये माथा ।
देहबुद्धीनें परमार्था । कानकोंडें होईजे ॥19॥
देहबुद्धि हे टाकावी । हेही मायेची उठाठेवी ।
म्हणोनी काय अंगीकारावी ? । अंगीकारूं नये ॥20॥
मायेच्या बळें ब्रह्मज्ञान । मायेकरिता समाधान ।
मायाचि गोंवी, आणिं बंधन । तोडी, तेंही माया ॥21॥
माया आपणास आपण गोवी । आपणास आपण वेढा लावी.
प्राणी दुखवती जीवीं । अभिमानें करुनी ॥22॥
जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मगोन आणिति ।
खेळों बैसतां वांतून घेती । आपुल्याला ॥23॥
नसताहि अभिमान माथां .सारी मरतां परम वेथा ।
डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥24॥
फासयास दे दे म्हणती । येक ते चिरडी येती ।
क्रोधां पेटल्या घेती । जीव येकमेकाचा ॥25॥
तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ।
अभिमान वाहती शिरी । देहपंग प्रपंचाचा ॥26॥
येवं इतुकी वेढा लाविली । ते माथा खेळें येकली ।
ते मायेनेंच वारिली । पाहिजे माया ॥27॥
ते माया तोडितां अधिक जडे । म्हणोनि धरिती ते वेडे ।
धरितां सोडितां ते नातुडे । वर्म कळल्यावांचुनि ॥28॥
जैसें चक्रविहूचें उगवणें । बाहेर येऊनी आंत जाणे ।
कां भीतरीं जाऊनी येणें । अकस्मात बाहेरीं ॥29॥
कां त्या कोवाडीयांच्या कडीया । गुंतगुंतोनि उगवाव्या ।
तैसी जाण हे माया । गुंतोनी उगवावी ॥30॥
माया झाडितां कैसी । झाडावी तोडोनी कैसी टाकावी ।
येथें विचारें पाहावी । नाथिलीच हे ॥31॥
बहू नाटकी हे माया । मीपणें न जाये विलया ।
विवेकें पाहतां देहीं या । ठावोचि नाही ॥32॥
वर्म हेंचि माया माईक । याचा करावा विवेक ।
विवेक केलीया, अनेक । येंकीं मुरे ॥33॥
येकीं अनेक आटलें । येकपण अनेकासवें गेलें ।
उपरी जें निःसंग उरलें । तेंचि स्वरूप तुझें ॥34॥
तुझें स्वरूप तुजचि न कळे । तें जया साधनें आकळे ।
तें साधन ऐक, सोहळे । भिगिसी स्वानंदाचे ॥35॥
इति श्री आत्माराम । सांगेल पुढील साधनवर्म ।
जेणे भिन्नत्त्वाचा भ्रम । तुटोन जाये ॥36॥
जें सकळ साधनांचें सार । जेणें पाविजे पैलपार ।
जेणें साधनें अपार । साधक ते सीध झाले ॥1॥
ते हें जाण रे श्रवण । करावें अध्यात्मनिरूपण ।
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥2॥
संत सज्जन महानुभावी । परमार्थ चर्चा करीत जावी ।
हईगई सर्वथा न करावी । ज्ञातेपणे करुनी ॥3॥
परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि आहे तत्त्वतां ।
दिवसेंदिवस शुधता । वृत्तिस होये नीच नवी ॥4॥
श्रवण आणि मनन । या ऐसें नाही साधन ।
म्हणोनी हें नित्य नूतन । केलें पाहिजे ॥5॥
जैसें ग्रंथीं बोलिले । तैसेंचि स्वयें पाहिजे जालें ।
येथें क्रियेच्य माथां आलें । निश्चितार्थें ॥6॥
जे ग्रंथीं जो विचार । वृत्ती होये तदाकार ।
म्हणोनि निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥7॥
तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा । सत्य करावी प्रतिज्ञा ।
नाशिवंत घेऊन, साधना । वरपडे न करावें ॥8॥
अरे शिष्या, चीत द्यावें । नाशिवंत तुंवां वोळखावें ।
साधन न लगे करावे । प्रतिज्ञाच आहे ॥9॥
प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऐसें बोलतो हा कोण ।
नाशिवंत केले मदार्पण । त्याहिमध्यें तो आला ॥10॥
तूं म्हणसी जें दिधलें । तरी देयास कोण उरलें ।
जें उरलें तें झुरलें । मजकडे ॥11॥
तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कां चोरिसी ? ।
नाशिवंत देतां चकचकीसी । फट रे पढतमूर्खा ॥12॥
शिष्य विचारून बोले । स्वामी कांहींच नाहीं उरलें ।
अरे 'नाही' बोलणेंही आलें । नाशिवंतामधें ॥13॥
आहे म्हणतां द्या कांहीं । नाहीं शब्द गेला तोही ।
नांहीं नांहीं म्हणता कांही । उपजलें कीं ॥14॥
येथें शुन्याचा निरास झाला । आत्मा सदोदित संचला ।
पाहों जाता साधकाला । ठावचि नाही ॥15॥
अभिन्नज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होता धन्य ।
वेगळेपणें वृत्तिशून्य । पावती प्राणी ॥16॥
वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ।
'आत्माहि दिसेसा नाही' मता । वरपडे होती प्राणी ॥17॥
आपुलिया डोळां जें देखिले । तें पंचभूतामध्यें आलें ।
ऐसें जाणोनी दृढ धरिलें । ते नाडले प्राणी ॥18॥
जो पंचभूतांचा दास । तयास मायेमधें वास ।
भोगी नीच नव्या सावकाश । पुनरावृत्ती ॥19॥
तों शिष्यें विनंती केली । म्हणे आशंका उद्भवली ।
पंचभूतांची सेवा केली । बहुतेकीं ॥20॥
सकळ सृष्टीमध्यें जन । साधु संत आणि सज्जन ।
करिती भूतांचें भजन । धातू-पाषाण मूर्ति ॥21॥
जे कोणी नित्यमुक्त झाले । तेंहीं धातुपूजन केलें ।
तरी ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाही ? ॥22॥
ऐसा शिष्याचा अंतर्भाव । जाणोनि आनंदला गुरूराव ।
म्हणे सीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥23॥
ऐसें विचारुनिया मनीं । कृपादृष्टी न्याहाळुनी ।
शिष्याप्रती सुवचनी । स्वामी बोलते झाले ॥24॥
प्राणी देह सोडून जाती । परी वासनात्मक शरीरें उरति ।
तेणें पुनरावृत्ति भोगिती । वासना उरलिया ॥25॥
मूळ या स्थूळ देहाचें । लिंगदेह वासनात्मक साचें ।
राहणें तया लिंगदेहाचें । अज्ञान देही ॥26॥
कारणदेह तोचि अज्ञान । आणि तो मी आत्मा ऐसें ज्ञान ।
तया नांव महाकारण । देह बोलिजे ॥27॥
तरी मनाचा थारा सुटला । म्हणिजे भवसिंधु आटला ।
प्राणी निश्चितार्थें सुटला । पुनरावृत्ती पासुनी ॥28॥
हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ।
निःसंग आणि निर्मळ । आत्मा होईजे स्वयें ॥29॥
संगातीत म्हणिजे मोक्ष । तेथे कैंचें देखणें लक्ष ।
लक्ष आणि अलक्ष । या दोहींस ठाव नाही ॥30॥
आत्मा म्हणोनी देखणीयास मिठी । घालूं जातां मोक्षाची तुटी.
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥31॥
प्राप्त जालें अद्वैतज्ञान । अभिन्नपणें जें विज्ञान ।
तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथें मी-तूंपण नाहीं ॥32॥
ऐसी स्थिति जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ।
जाणोनि भक्ति केली, दासाची । आवडी देवास अत्यंत ॥33॥
पूर्वीं दासत्व होतें केलें । त्याचे स्वामित्व प्राप्त झालें ।
आणि तयाचें महत्व रक्षिलें । तरी थोर उपकार कीं ॥34॥
आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार घेणें ।
आणि मजपाशीं सांगणे । अनुभव आपुला ॥35॥
आता पुढिलीये समासीं । शिष्य सांगेल अनुभवासी ।
दृढ करूनिया तयासी । सांगती स्वामी ॥36॥
इति श्री आत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
ऐका सावध वर्म । आत्मज्ञानाचें ॥37॥
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा.
सार्थक झालें जी दातारा । तुमच्या कृपा कटाक्षें ॥1॥
या मनाचेनि संगति । जन्म घेतले पुनरावृत्ती ।
माया माईक असोत भ्रांती । वरपडा जालों होतो ॥2॥
जी मी मानवी किंकर । येकायेकीं जाळीं विश्वंभर ।
संदेह तुटला थोर । यातायातीचा ॥3॥
मी संसारींहून सुटलों । पैलपार पावलों ।
मीच सकळ विस्तारलों । सर्वांभूतीं ॥4॥
मी करून अकर्ता । मी परेहून पर्ता ।
मजमध्यें वार्ता । मीपणाची नाही ॥5॥
ऐसेन् हें निजबीज । गाळीव मीपणाचा फुंज ।
तो मुरालिया सहज । सीधचि आदिअंती ॥6॥
ऐसा शिष्याचा संकल्पु । जाणोनि बोले भवरिपु ।
संसारसर्प भग्नदर्पु । केला जेणें ॥7॥
जें स्वामीच्या हृदयीं होतें । तें शिष्यासी बाणलें अवचीतें ।
जैसें सामर्थ्यें परीसातें । लोहो आंगीं बाणे ॥8॥
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां । शिष्य परिसचि जाला तत्त्वतां.
गुरुशिष्याची ऐक्यता । जाली स्वानुभवें ॥9॥
गुज स्वामींच्या हृदयींचें । शिष्यास वर्म तयाचें ।
प्राप्त जालें योगीयांचें । निजबीज ॥10॥
बहुतां जन्मांच्या शेवटीं । जाली स्वरूपेसी भेटी ।
येका भावार्थासाथीं । परब्रह्म जोडलें ॥11॥
जो वेदशास्त्रांचा गर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ।
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्भावें ॥12॥
जें ब्रह्मादिकांचें माहेर । अनंत सुखाचें भांडार ।
जेणें हा दुर्गम संसार । सुखरूप होये ॥13॥
ऐसें जयास ज्ञान झालें । तयाचें बंधन तुटलें ।
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥14॥
संदेह हेंचि बंधन । नीःशेष तुटला तेंचि ज्ञान ।
निःसंदेही समाधान । होय आपैसें ॥15॥
प्राणीयास माया सुटेना । अभिमानें त्रिपुरी तुटेना ।
वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥16॥
जे मायाजाळीं पडिले । ते ईश्वरासी चुकले ।
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनी ॥17॥
जयाचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त झालें ।
तयाचें बंधन तुटलें । निःसंगपणें ॥18॥
सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ।
म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥19॥
आपणासी तूं जाणसी । तरी तूं ही नव्हेसी ।
तूंपणाची कायेंसी । मात स्वरूपी ॥20॥
जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्या उर्वरीतु ।
तूंपणाची मातु । शजचि वाव ॥21॥
आतां असो श्ब्द पाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ।
कां जे नाशिवंत सकळ । मदर्पण केलें ॥22॥
जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत, राहिलें ।
तुझें तुज प्राप्त झालें । अक्षईपद ॥23॥
ऐसें बोले मोक्षपाणी । ऐकोत शिष्य लोटांगणीं ।
निःसंदेह स्वरूप मिळणीं । दोघे येकचि जाले ॥24॥
ऐसा कृपाळु स्वामीराव । आदि पुरुष देवाधिदेव ।
शिष्यास निजपदीं ठाव । ऐक्यरूपें दिधला ॥25॥
जो शिष्य स्वामीस शरण गेला । आणि संदेहा वेगळा झाला.
तेणें जन्म सार्थक केला । जो देवांसी दुल्लभु ॥26॥
ग्रंथ संपता स्तुति उत्तरें । बोलताती अपारें ।
परी अर्थासी कारण, येरें । येरा चाड नाही ॥27॥
इति श्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ।
निःसंदेह जालें अंतर्याम । सद्गुरूचरणीं ॥28॥
पद 1

पद 2

पद 3

पद 4

पद 5

पद 6

पद 7

पद 8
तया निजपदाकडे । आनंदें वृत्ति वावडे ।
पद लाधलिया जडे । तद्रूप होऊनि ॥8॥
पद 9
स्वामी कृपेचा लोट आला । मज सरोवरीं सामावला ।
पूर्ण जालिया उचंबळला । अनुभव उद्गार ॥9॥
पद 10
माझें सद्गुरूकृपेचें बळ । मनामाजीं सांठवले तुंबळ ।
तेणें बळें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥10॥
पद 11
आता नमस्कारीन राम । जो योगियांचें निजधाम ।
विश्रांति पावे विश्राम । जये ठायीं ॥11॥
पद 12
जो नांवरूपा वेगळा । जो ये मायेहून निराळा ।
जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥12॥
पद 13
जेथें भांबावला तर्क । जेथें पांगुळला विवेक ।
तेथें शब्दांचें कौतुक । केवीं घडे ॥13॥
पद 14
जयालागी योगी उदास । वनवासी फिरती तापस ।
नाना साधनी सायास । जयाकारणें करिती ॥14॥
पद 15
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ।
उपमाच नाही निरुपम । रूप जयाचें ॥15॥
पद 16
आत वंदीन संत सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ।
माझीं वचनें प्राकृतें । सांगेन तयासीं ॥16॥
पद 17
तयाचें वर्णावे स्वरूप । तरी तें स्वरूपाचेंचि बाप ।
जें वेदांसि सांगवेना रूप । तें जयांचेनि प्रगटे ॥17॥
पद 18
आता शिष्या सावधान । ऐक सांगतो गुह्यज्ञान ।
जेणें तुझें समाधान । आंगीं बाणे ॥18॥
पद 19
तुवां आशंका नाही घेतली । परंतु मज तुझी चिंता लागली.
कां जे तुझी भ्रांति फिटली । नाहींच अद्यापि ॥19॥
पद 20
दासबोधींचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ।
तया निरूपणेंही वृत्तीसी । पालट दिसेना ॥20॥
पद 21
म्हणोनी न पुसतां सांगणें । पडलें शिष्या तुजकारणें ।
आतां तरी सोय धरणें । श्रवण मननाची ॥21॥
पद 22
चातकपक्षी वरीचा वरी । चंचु पसरून थेंबुटा धरी ।
जीवन सकळहि अव्हेरी । भूमंडळींचें ॥22॥
पद 23
तैसा शब्दवरुषाव होता । असों नेदावी वेग्रता ।
श्रवणपुरी सामावितां । मनन करावें ॥23॥
पद 24
लागवेग जाणोन शब्दाचा । आवांका पहावा मनाचा ।
शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥24॥
पद 25
अरे तूं कोण? कोणाचा? । कोठोनि आलासि कैंचा ? ।
ऐसा विचार पूर्वीचा । घेई बापा ॥25॥
पद 26
अरे त्वां जन्मांतर घेतलें । काय मानितोसी आपुलें ।
ऐसें तुवा विचारिले । पाहिजे आतां ॥26॥
पद 27
येथे तुझें कांहींच नाही । भुलला आहेसी काई ।
चुकोनि आलास्, जाई । जेथीचा तेथें ॥27॥
पद 28
तूं समर्थाचें लेकरूं । अभिमाने घेतला संसारू ।
अभिमान टाकितां पैलपारू । पावशील बापा ॥28॥
पद 29
ईश्वरापासून जालासी । परी तूं तयासी चुकलासी ।
म्हणोनि हें दुःख भोगिसि. वेगळेपणें उत्कट ॥29॥
पद 30
त्यागिसी सकळ वैभवाला । आणि विश्वाससी मझिया बोला.
तरि मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥30॥
पद 31
तुझें अढळपद गेलें । तुज मायेनें वेढा लाविलें ।
तें जरी तुझें तुज दिधलें । तरी मज काय देशी ॥31॥
पद 32
जितुकें कांहीं नासोन जाईल । जें अशाश्वत असेल ।
तुज समागमे न येईल । तितुकेंच द्यावे मज ॥32॥
पद 33
मजही तें काय करावें । परी तुजपसून टाकवावें ।
तुवां टाकिलें तरि न्यावें । तुज समागमे ॥33॥
पद 34
अरे भूष्ण भिक्षेचे सांडिले । आणि राजपद प्राप्त जालें ।
तरि तुझें काय गेलें । सांग बापा ॥34॥
पद 35
नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेंसी ।
त्यामद्ध्यें लालुच करिसी । तरी स्वहित न घडे ॥35॥
पद 36
तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ।
आतां तूं आपुलें । कांहीं मानू नको ॥36॥
पद 37
इतुकें स्वमी बोलिले । आज्ञा घेऊन निघाले ।
तंव शिष्यें विनविलें । विनीत होऊनी ॥37॥
पद 38
आतां पुढिलिये समासी । संवाद होईल उभयतांसी ।
तेणें स्वानंदसिंधुसि । भरितें दाटे बळें ॥38॥
पद 39
इति श्री आत्माराम । रामदासी पूर्ण काम ।
ऐका सावध, वर्म । सांगितले पुढें ॥39॥
पद 1
जय जय जी सच्चिदानंदा । जय जय जी आनंदकंदा ।
जय जय जी निजबोधा । परमपुरुष ॥1॥
पद 2
अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळें । मायेने रचिली विशाळें ।
तें तुमचे कृपेचेनि बळें । विरतीं स्वानंद डोहीं ॥2॥
पद 3
आता स्वामीने जें कांहीं इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारलें ।
शरणागत आपुलें । समर्थें उपेक्षूं नये ॥3॥
पद 4
नाशिवंत काये म्यां टाकावें । तें मज स्वामीनें सांगावें ।
मज दातारें करावें । आपणा ऐसें ॥4॥
पद 5
ऐकोन शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें ।
अवधान देऊन घेणें । आनंदपद ॥5॥
पद 6
शिष्या बहू मन घाली । आता बाष्कळता राहिली ।
येथें वृत्ती चंचल केली । तरी बुडसी संदेहसागरी ॥6॥
पद 7
अग्निसंगे लोहों पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ।
मग परिसेसि झगडतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥7॥
पद 8
तयाचा मळ झडेना । आणि अभ्यांतर कळेना ।
तरी तें सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥8॥
पद 9
म्हणउन नाशिवंत तितुका मळ । तुवां त्यजावा अमंगळ ।
तो गेलिया तूच केवळ । आहेस बापा ॥9॥
पद 10
तरी नासिवंत तूं जाण माया । मायीक जाये विलया ।
ते मायेचा विस्तार प्राणसखया । ऐक सांगतो ॥10॥
पद 11
अहं ऐसें जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।
तये मायेपासून त्रिगुण । गुणापासून भूतें ॥11॥
पद 12
पृथ्वी, आप, तेज, वायो, आकाश । सृष्टी रचिली सावकाश ।
येथें दृश्य आणि अदॄश्य । सकळ माया ॥12॥
पद 13
येक माया दों ठायी वाटली । प्रकृति आणि पुरुष झाली ।
जैसी दो दिसांची बोली । येकचि परवा ॥13॥
पद 14
माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान । माया ध्याता ध्येय ध्यान ।
माया हेंचि समाधान । योगियांचें ॥14॥
पद 15
माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ।
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥15॥
पद 16
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥16॥
पद 17
जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचाचि विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥17॥
पद 18
माया मनास चाळक । माया बुधीस व्यापक ।
माया येकीं अनेक । ऐसें बोलणें ॥18॥
पद 19
माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ।
माया दॄश्यास दाखवी । नेत्रीं रिघोनिया ॥19॥
पद 20
मायेनें माया चाले । मायेनेंचि माया बोले ।
मायेनें माया हाले । वायोंरूपें ॥20॥
पद 21
तो शिष्य म्हणे जी ताता । माया चाले स्वरूपसत्ता ।
अरे! सत्ता तेचि तत्त्वता । माया जाण ॥21॥
पद 22
तरी मायेने स्वइच्छया असावें । आणि स्वरूपसत्तेनें नसावें ।
मनास आलें तैसें करावें । हें केवी घडे ? ॥22॥
पद 23
खर्यावरी लटिकें चौताळलें । लटिकें मया.र्देनें राहिलें ,
तें तुंवां गर्भांधें देखिलें । हे अघटित वार्ता ॥23॥
पद 24
तैसी माया हे नाथिली । अणि स्वरूपसत्तेने चालिली ।
ते तुंवां गर्भाधानें देखिली । हे वार्ता सांगसी ॥24॥
पद 25
जें जालेंचि नाही सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ।
ऐसें हें ज्ञातेपणें बोलता । तुज लाज नाहीं ॥25॥
पद 26
सकळ माया ऐसेंही म्हणतां । आणि जालीच नाही ऐसेंही सांगतां ।
तरी मी काय करावें आतां । सांगा स्वामी ॥26॥
पद 27
अरे ! मनासी जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ।
तितुकें तुवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥27॥
पद 28
सकळ हि माया परी नाथिली । स्वरूपीं तों नाही राहिली ।
येवं आहे नाही हे बोली । माया जाण ॥28॥
पद 29
येवं सांगतों ते ऐकावें । मईक मायेतें जाणावें ।
आता मनन करावें । सावध होऊनी ॥29॥
पद 30
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माय नासे ।
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरूपाचा ॥30॥
पद 31
माया भवसिंधूचें तारू । माया पाववी पैलतारू ।
मायेवीण उद्धारू । प्राणीयास नाही ॥31॥
पद 32
मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।
मायेकरितां जीवन्मुक्त । होती स्वानुभवें ॥32॥
पद 33
मायेकरितां वेदश्रुति । मायेकरितां नाना वित्पत्ति ।
मायेकरितां होती । मूढ ते विवेकी ॥33॥
पद 34
माया परमार्थाचें अंजन । मायेकरितां जोडे निधान ।
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥34॥
पद 35
मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ।
मायेकरितां बिघडे । प्रपंचभान ॥35॥
पद 36
मायेविण ज्ञान कैंचें । माया जीवन सकळ जीवांचें ।
मायेविण साधकांचें । कार्य न चले ॥36॥
पद 37
मायेविण परमार्थ जोडे । हें ऐसें कईच न घडें ।
मायेविण सहसा नातुडे । गुज योगियांचें ॥37॥
पद 38
माया योगियांची माउली । जेथील तेथें नेऊनि घाली ।
कृपाळूपणें नाथिलि । आपण होय ॥38॥
पद 39
सकळ मायेचें स्वरूप जालें । त्यात तुझेंही स्वरूप आले ।
हें इतुकेंही आपुलें । नको मानुं सर्वथा ॥39॥
पद 40
आतां सांगतों तुज खुण । तुवां नाशिवंत केलें मदर्पण ।
आतां करिसी आळकेपण । तरी मज शब्द नाही ॥40॥
पद 41
संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ।
म्हणोनि संगनिःसंगातीत । होऊन राहे ॥41॥
पद 42
आतां पुढील निरूपण । आदरें करावें श्रवण ।
संगातीत होइजेल ते खूण । सांगिजेल पुढे ॥42॥
पद 43
इति श्री आत्माराम । रामदासीं विश्रामधाम ।
योगी पावती विश्राम । जये ठायी ॥43॥
पद 1
संग तितुका नाशिवंत । सांडून राहावें निवांत ।
येकपणाचाहि अंत । जालिया समाधान ॥1॥
पद 2
येकपणाचा उमस । काढिता, त्रिपुरी सावकाश ।
होत आहे, म्हणोनी ध्यास । येकपणाचा नसो ॥2॥
पद 3
तो मी आत्मा ऐसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं ।
उन्मनी अवस्थेचा प्रांतु । तें स्वरूप तुझें ॥3॥
पद 4
ऐसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामधे आला ।
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥4॥
पद 5
हेंही न घडे बोलणें । आता पार्हेरा किती देणें ।
वेद शास्त्रें पुराणें । तेंही नासोनि जाती ॥5॥
पद 6
ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ।
ये मायेयेचा स्पर्श् जाला । नाहीच तयासी ॥6॥
पद 7
स्वरूप निर्मळ अणि निघोट । स्वरूप सेवटचा सेवट ।
जिकडे पाहावें तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥7॥
पद 8
जें बहु दुरीचा दुरी । जें निकटचि जवळीं अंतरीं ।
दुरी आणि अभ्यांतरी । संदेहचि नाही ॥8॥
पद 9
जें सकळांपरीस मोठें .जेत्जें हें सकळही आटे ।
अकस्मात येकसरें तुटे । मूळ मायेचें ॥9॥
पद 10
जें सकळांहूनमृद कोंवळें । जें सकळांहूनही अत्यंत जवळें ।
जें सकळामध्ये, प्री निराळें । अलिप्तपणें ॥10॥
पद 11
जें हाले ना चाले । जें बोले ना दोलें ।
आवघें आपणचि संचलें । येकलें येकटचि तें ॥11॥
पद 12
जें आकाशासबाह्य भरलें । आणि आकाश जेथें मुरालें ।
आकाश मुरोनिया उरलें । येकजिनसि आपण ॥12॥
पद 13
जें चळे ना ढळे । ज्जे अग्निमध्यें न जळे ।
जें चळत्यामधें, परी न कळे । उदकीं बुडेना ॥13॥
पद 14
जयास कोणीच नेईना । चोरूं जातां चोरवेना ।
कल्पांत झाला तरि वेंचेना । अणुमात्र ॥14॥
पद 15
ज्जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये । जेथें आकार भस्मोनी जाये.
सांगितलें तें साकार होये । म्हणोनि सांगणें न घडे ॥15॥
पद 16
ऐसें जरी न बोलावें । तरी म्यां काये करावें ।
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥16॥
पद 17
अरे बोलणें तितुकें वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येतें ।
अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजें ॥17॥
पद 18
मायारूप मूळ तयाचें । शोधीन म्हणतां समाधान कैंचें ।
'मज लाभ झाला' या सुखाचें । मूळ तुटे ॥18॥
पद 19
'अहं ब्रह्मास्मि' हा गाथा । आला देहबुद्धीचिये माथा ।
देहबुद्धीनें परमार्था । कानकोंडें होईजे ॥19॥
पद 20
देहबुद्धि हे टाकावी । हेही मायेची उठाठेवी ।
म्हणोनी काय अंगीकारावी ? । अंगीकारूं नये ॥20॥
पद 21
मायेच्या बळें ब्रह्मज्ञान । मायेकरिता समाधान ।
मायाचि गोंवी, आणिं बंधन । तोडी, तेंही माया ॥21॥
पद 22
माया आपणास आपण गोवी । आपणास आपण वेढा लावी.
प्राणी दुखवती जीवीं । अभिमानें करुनी ॥22॥
पद 23
जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मगोन आणिति ।
खेळों बैसतां वांतून घेती । आपुल्याला ॥23॥
पद 24
नसताहि अभिमान माथां .सारी मरतां परम वेथा ।
डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥24॥
पद 25
फासयास दे दे म्हणती । येक ते चिरडी येती ।
क्रोधां पेटल्या घेती । जीव येकमेकाचा ॥25॥
पद 26
तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ।
अभिमान वाहती शिरी । देहपंग प्रपंचाचा ॥26॥
पद 27
येवं इतुकी वेढा लाविली । ते माथा खेळें येकली ।
ते मायेनेंच वारिली । पाहिजे माया ॥27॥
पद 28
ते माया तोडितां अधिक जडे । म्हणोनि धरिती ते वेडे ।
धरितां सोडितां ते नातुडे । वर्म कळल्यावांचुनि ॥28॥
पद 29
जैसें चक्रविहूचें उगवणें । बाहेर येऊनी आंत जाणे ।
कां भीतरीं जाऊनी येणें । अकस्मात बाहेरीं ॥29॥
पद 30
कां त्या कोवाडीयांच्या कडीया । गुंतगुंतोनि उगवाव्या ।
तैसी जाण हे माया । गुंतोनी उगवावी ॥30॥
पद 31
माया झाडितां कैसी । झाडावी तोडोनी कैसी टाकावी ।
येथें विचारें पाहावी । नाथिलीच हे ॥31॥
पद 32
बहू नाटकी हे माया । मीपणें न जाये विलया ।
विवेकें पाहतां देहीं या । ठावोचि नाही ॥32॥
पद 33
वर्म हेंचि माया माईक । याचा करावा विवेक ।
विवेक केलीया, अनेक । येंकीं मुरे ॥33॥
पद 34
येकीं अनेक आटलें । येकपण अनेकासवें गेलें ।
उपरी जें निःसंग उरलें । तेंचि स्वरूप तुझें ॥34॥
पद 35
तुझें स्वरूप तुजचि न कळे । तें जया साधनें आकळे ।
तें साधन ऐक, सोहळे । भिगिसी स्वानंदाचे ॥35॥
पद 36
इति श्री आत्माराम । सांगेल पुढील साधनवर्म ।
जेणे भिन्नत्त्वाचा भ्रम । तुटोन जाये ॥36॥
पद 1
जें सकळ साधनांचें सार । जेणें पाविजे पैलपार ।
जेणें साधनें अपार । साधक ते सीध झाले ॥1॥
पद 2
ते हें जाण रे श्रवण । करावें अध्यात्मनिरूपण ।
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥2॥
पद 3
संत सज्जन महानुभावी । परमार्थ चर्चा करीत जावी ।
हईगई सर्वथा न करावी । ज्ञातेपणे करुनी ॥3॥
पद 4
परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि आहे तत्त्वतां ।
दिवसेंदिवस शुधता । वृत्तिस होये नीच नवी ॥4॥
पद 5
श्रवण आणि मनन । या ऐसें नाही साधन ।
म्हणोनी हें नित्य नूतन । केलें पाहिजे ॥5॥
पद 6
जैसें ग्रंथीं बोलिले । तैसेंचि स्वयें पाहिजे जालें ।
येथें क्रियेच्य माथां आलें । निश्चितार्थें ॥6॥
पद 7
जे ग्रंथीं जो विचार । वृत्ती होये तदाकार ।
म्हणोनि निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥7॥
पद 8
तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा । सत्य करावी प्रतिज्ञा ।
नाशिवंत घेऊन, साधना । वरपडे न करावें ॥8॥
पद 9
अरे शिष्या, चीत द्यावें । नाशिवंत तुंवां वोळखावें ।
साधन न लगे करावे । प्रतिज्ञाच आहे ॥9॥
पद 10
प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऐसें बोलतो हा कोण ।
नाशिवंत केले मदार्पण । त्याहिमध्यें तो आला ॥10॥
पद 11
तूं म्हणसी जें दिधलें । तरी देयास कोण उरलें ।
जें उरलें तें झुरलें । मजकडे ॥11॥
पद 12
तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कां चोरिसी ? ।
नाशिवंत देतां चकचकीसी । फट रे पढतमूर्खा ॥12॥
पद 13
शिष्य विचारून बोले । स्वामी कांहींच नाहीं उरलें ।
अरे 'नाही' बोलणेंही आलें । नाशिवंतामधें ॥13॥
पद 14
आहे म्हणतां द्या कांहीं । नाहीं शब्द गेला तोही ।
नांहीं नांहीं म्हणता कांही । उपजलें कीं ॥14॥
पद 15
येथें शुन्याचा निरास झाला । आत्मा सदोदित संचला ।
पाहों जाता साधकाला । ठावचि नाही ॥15॥
पद 16
अभिन्नज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होता धन्य ।
वेगळेपणें वृत्तिशून्य । पावती प्राणी ॥16॥
पद 17
वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ।
'आत्माहि दिसेसा नाही' मता । वरपडे होती प्राणी ॥17॥
पद 18
आपुलिया डोळां जें देखिले । तें पंचभूतामध्यें आलें ।
ऐसें जाणोनी दृढ धरिलें । ते नाडले प्राणी ॥18॥
पद 19
जो पंचभूतांचा दास । तयास मायेमधें वास ।
भोगी नीच नव्या सावकाश । पुनरावृत्ती ॥19॥
पद 20
तों शिष्यें विनंती केली । म्हणे आशंका उद्भवली ।
पंचभूतांची सेवा केली । बहुतेकीं ॥20॥
पद 21
सकळ सृष्टीमध्यें जन । साधु संत आणि सज्जन ।
करिती भूतांचें भजन । धातू-पाषाण मूर्ति ॥21॥
पद 22
जे कोणी नित्यमुक्त झाले । तेंहीं धातुपूजन केलें ।
तरी ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाही ? ॥22॥
पद 23
ऐसा शिष्याचा अंतर्भाव । जाणोनि आनंदला गुरूराव ।
म्हणे सीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥23॥
पद 24
ऐसें विचारुनिया मनीं । कृपादृष्टी न्याहाळुनी ।
शिष्याप्रती सुवचनी । स्वामी बोलते झाले ॥24॥
पद 25
प्राणी देह सोडून जाती । परी वासनात्मक शरीरें उरति ।
तेणें पुनरावृत्ति भोगिती । वासना उरलिया ॥25॥
पद 26
मूळ या स्थूळ देहाचें । लिंगदेह वासनात्मक साचें ।
राहणें तया लिंगदेहाचें । अज्ञान देही ॥26॥
पद 27
कारणदेह तोचि अज्ञान । आणि तो मी आत्मा ऐसें ज्ञान ।
तया नांव महाकारण । देह बोलिजे ॥27॥
पद 28
तरी मनाचा थारा सुटला । म्हणिजे भवसिंधु आटला ।
प्राणी निश्चितार्थें सुटला । पुनरावृत्ती पासुनी ॥28॥
पद 29
हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ।
निःसंग आणि निर्मळ । आत्मा होईजे स्वयें ॥29॥
पद 30
संगातीत म्हणिजे मोक्ष । तेथे कैंचें देखणें लक्ष ।
लक्ष आणि अलक्ष । या दोहींस ठाव नाही ॥30॥
पद 31
आत्मा म्हणोनी देखणीयास मिठी । घालूं जातां मोक्षाची तुटी.
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥31॥
पद 32
प्राप्त जालें अद्वैतज्ञान । अभिन्नपणें जें विज्ञान ।
तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथें मी-तूंपण नाहीं ॥32॥
पद 33
ऐसी स्थिति जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ।
जाणोनि भक्ति केली, दासाची । आवडी देवास अत्यंत ॥33॥
पद 34
पूर्वीं दासत्व होतें केलें । त्याचे स्वामित्व प्राप्त झालें ।
आणि तयाचें महत्व रक्षिलें । तरी थोर उपकार कीं ॥34॥
पद 35
आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार घेणें ।
आणि मजपाशीं सांगणे । अनुभव आपुला ॥35॥
पद 36
आता पुढिलीये समासीं । शिष्य सांगेल अनुभवासी ।
दृढ करूनिया तयासी । सांगती स्वामी ॥36॥
पद 37
इति श्री आत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
ऐका सावध वर्म । आत्मज्ञानाचें ॥37॥
पद 1
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा.
सार्थक झालें जी दातारा । तुमच्या कृपा कटाक्षें ॥1॥
पद 2
या मनाचेनि संगति । जन्म घेतले पुनरावृत्ती ।
माया माईक असोत भ्रांती । वरपडा जालों होतो ॥2॥
पद 3
जी मी मानवी किंकर । येकायेकीं जाळीं विश्वंभर ।
संदेह तुटला थोर । यातायातीचा ॥3॥
पद 4
मी संसारींहून सुटलों । पैलपार पावलों ।
मीच सकळ विस्तारलों । सर्वांभूतीं ॥4॥
पद 5
मी करून अकर्ता । मी परेहून पर्ता ।
मजमध्यें वार्ता । मीपणाची नाही ॥5॥
पद 6
ऐसेन् हें निजबीज । गाळीव मीपणाचा फुंज ।
तो मुरालिया सहज । सीधचि आदिअंती ॥6॥
पद 7
ऐसा शिष्याचा संकल्पु । जाणोनि बोले भवरिपु ।
संसारसर्प भग्नदर्पु । केला जेणें ॥7॥
पद 8
जें स्वामीच्या हृदयीं होतें । तें शिष्यासी बाणलें अवचीतें ।
जैसें सामर्थ्यें परीसातें । लोहो आंगीं बाणे ॥8॥
पद 9
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां । शिष्य परिसचि जाला तत्त्वतां.
गुरुशिष्याची ऐक्यता । जाली स्वानुभवें ॥9॥
पद 10
गुज स्वामींच्या हृदयींचें । शिष्यास वर्म तयाचें ।
प्राप्त जालें योगीयांचें । निजबीज ॥10॥
पद 11
बहुतां जन्मांच्या शेवटीं । जाली स्वरूपेसी भेटी ।
येका भावार्थासाथीं । परब्रह्म जोडलें ॥11॥
पद 12
जो वेदशास्त्रांचा गर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ।
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्भावें ॥12॥
पद 13
जें ब्रह्मादिकांचें माहेर । अनंत सुखाचें भांडार ।
जेणें हा दुर्गम संसार । सुखरूप होये ॥13॥
पद 14
ऐसें जयास ज्ञान झालें । तयाचें बंधन तुटलें ।
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥14॥
पद 15
संदेह हेंचि बंधन । नीःशेष तुटला तेंचि ज्ञान ।
निःसंदेही समाधान । होय आपैसें ॥15॥
पद 16
प्राणीयास माया सुटेना । अभिमानें त्रिपुरी तुटेना ।
वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥16॥
पद 17
जे मायाजाळीं पडिले । ते ईश्वरासी चुकले ।
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनी ॥17॥
पद 18
जयाचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त झालें ।
तयाचें बंधन तुटलें । निःसंगपणें ॥18॥
पद 19
सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ।
म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥19॥
पद 20
आपणासी तूं जाणसी । तरी तूं ही नव्हेसी ।
तूंपणाची कायेंसी । मात स्वरूपी ॥20॥
पद 21
जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्या उर्वरीतु ।
तूंपणाची मातु । शजचि वाव ॥21॥
पद 22
आतां असो श्ब्द पाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ।
कां जे नाशिवंत सकळ । मदर्पण केलें ॥22॥
पद 23
जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत, राहिलें ।
तुझें तुज प्राप्त झालें । अक्षईपद ॥23॥
पद 24
ऐसें बोले मोक्षपाणी । ऐकोत शिष्य लोटांगणीं ।
निःसंदेह स्वरूप मिळणीं । दोघे येकचि जाले ॥24॥
पद 25
ऐसा कृपाळु स्वामीराव । आदि पुरुष देवाधिदेव ।
शिष्यास निजपदीं ठाव । ऐक्यरूपें दिधला ॥25॥
पद 26
जो शिष्य स्वामीस शरण गेला । आणि संदेहा वेगळा झाला.
तेणें जन्म सार्थक केला । जो देवांसी दुल्लभु ॥26॥
पद 27
ग्रंथ संपता स्तुति उत्तरें । बोलताती अपारें ।
परी अर्थासी कारण, येरें । येरा चाड नाही ॥27॥
पद 28
इति श्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ।
निःसंदेह जालें अंतर्याम । सद्गुरूचरणीं ॥28॥
परिचय
आत्माराम हा समर्थ रामदासस्वामींचा ओवीबद्ध ग्रंथ आहे. गुरु-शिष्य संवादाच्या रूपात देह, जीव, आत्मा आणि परमात्मा यांचा विवेक सांगून तो साधकाला आत्मस्वरूपाच्या ओळखीकडे नेतो. दासबोधानंतर समर्थांच्या साधनापर रचनांत याला महत्त्वाचे स्थान आहे.
संदर्भ 1
- आत्माराम — sanskritdocuments.org
मूळ मराठी पाठ जसाच्या तसा; प्रत्येक ओवी अक्षरशः पडताळून घेतली आहे.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.